श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत केरोळी फाटा ते कूपटी दरम्यानचा रस्ता जवळपास दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाला होता. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना दळणवळणाची मोठी सोय झाली होती. परंतु रुई येथिल शेत संव्है न ५७ मधून ३०० ब्रॉस ची रॉयल्टी काढून हजारो ब्रॉस मुरूम उत्खनन केल्याने व अधिक भार क्षमता असलेल्या वहाणा द्वारे वाहतूक केले गेल्याने अल्पावधीतच या रस्त्याची दुरवस्था झाल्याचा आरोप या भागातील नागरीकांतुन केला जात आहे.


केरोळी हडसणी रस्त्यावरील रुई शिवारात येणारा शेत सर्वे न. ५७ शेत जमिनीतुन मुरुम उत्खननासाठी परवानगीचा सोपस्कार करुन समधित ठेकेदारांनी १० ते १२ हायवा ट्रकच्या साहाय्याने दिवस रात्र क्षमते पेक्षा अनेक पटीने मुरुम वाहतूक केली. सतत ५ दिवस रात्र जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याचा डांबरी थर उखडून काही ठिकाणी रस्ता चाळणीसारखा झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या बाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


सरकारने ग्रामीण भागासाठी चांगली सोय म्हणून हा रस्ता दिला होता. पण अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यांच्या अधिक भार क्षमता वाहतुकीमुळे अनेक वर्षे टिकणारा रस्ता दोन वर्षांतच उद्ध्वस्त झाला , असे या रस्त्याने येणार्या नागरीकांतून बोलल्या जात असुन स्थानिक नागरिक व शेतकरी यांनी प्रशासनाने याकडे तातडीने संबंधित मूरूम रॉयल्टी काढका-या ठेकेदारांवर कारवाई करावी व त्या मूरूम उत्खनन च्या ठिकानावर (रोव्हर) ईटियस मोजणी करावी मागणीसह रस्त्याची दुरुस्ती करून वाहतुकीस योग्य करावा, अशीही मागणी होत आहे.



