उस्माननगर, माणिक भिसे। रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बैलगाडीतून शेताकडे जात असताना ती बैलगाडी उलटून झालेल्या अपघातात एका सात वर्षीय विद्यार्थी ठार …तर दोन विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना, डोलारा ता. लोहा शिवारात दि.१ डिसेंबर रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
डोलारा येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष माणिका शिंदे यांची सासरवाडी गावातच असून त्यांचा मुलगा रुद्र संतोष शिंदे वय ७ वर्ष व मुलगी पायल संतोष शिंदे वय १२ वर्ष, श्रेया बळीराम बेटकर वय १२ वर्ष अन्य पाच विद्यार्थी व विद्यार्थिनी रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सुट्टीचा. आनंद घालविण्यासाठी …..मोजमज्जा करण्यासाठी ….. पांडुरंग बळीराम बेटकर यांच्या शेताकडे बैलगाडीतून जात असताना उत्तराच्या ठिकाणी ही बैलगाडी अचानक उलटली.
गाडीचा लोखंडी पाळणा विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळला. त्यामुळे या अपघातात रुद्र संतोष शिंदे वय ७ वर्ष हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला . तेंव्हा शेजारील शेतकऱ्यानी धावा धाव करत गंभीर जखमी रुद्रला नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात पाठवले . मात्र उपचारा पूर्वीच या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे रुद्र हा वसंत ग्लोबल पब्लिक स्कूल कापसी गुंफा ता. लोहा येथील इंग्लिश मीडियममध्ये पहिलीत शिक्षण घेत होता . शाळेत सर्वात हुशार व आई वडिलांस एकुलता एक मुलगा होता . तसेच या अपघातात मयत रुद्र यांची सख्खी बहिण पायल संतोष शिंदे वय १२ वर्ष ही देखील जखमी झाली आहे यात श्रेया पांडुरंग बेटकर वय १२ वर्ष व अन्य पाच शाळकरी मित्र या बैलगाडीतून जात होते. मात्र त्यांना सुदैवाने किरकोळ दुखापत झाली रात्री रुद्र यांच्या पार्थिवावर डोलारा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. काळाने काळजा तुकडा हिरावून घेतल्याने डोलारा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील ,दोन बहिणी असा परिवार आहे .