उस्माननगर। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतीच अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर करण्यात आली. , असून या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायत कार्यालयास परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष शिवशंकर मुकुंद काळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण हि योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्या नंतर लाडकी बहिण संबंधित केंद्रावर गर्दी उसळली आहे. महीला भगिनी व नातेवाईक कागदपत्रे या़ची जुळवाजुळव करण्यात मग्न झाले आहेत. सर्वसामान्य माणसाला किंमत मोजावी लागत आहे.जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय मध्ये संगणक ऑपरेटर असल्याने नागरिकांचे वेळ, पैसा वाचविण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फाॅर्म ( अर्ज) भरण्यासाठी फायद्याचे होईल.

जनतेची लुट न होता अधिकचे पैसे न जाता मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती कडे लेखी स्वरूपात आदेश देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मा. श्री. राजकुमार मुकावार , यांना देण्यात आले.यावेळी भाजपा राज व ग्रामविकास विभाग मराठवाडा सह संयोजक, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शिवशंकर काळे , माजी पं.स. सुधाकर सुर्यवंशी हाळदेकर यांची उपस्थिती होती.



