नांदेडराजकीयव्हिडीओ

candidate of Vanchit : अबबब..नांदेडच्या मतदारांनी वंचीतच्या उमेदवाराला चक्क नोटांचा हार घातला -NNL

नांदेड| जिल्ह्यातील लोहा विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून शिवा नरंगले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदार संघात पैसे देवून मतदान विकत घेता येते असा काहींचा समज झालेला आहे. हा समज मोडून काढण्यासाठी माळाकोळी येथील ग्रामस्थांनी चक्क वर्गणी गोळा करून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवा नरंगले या उमेदवाराला तब्बल 5 लक्ष 55 हजार रुपयांची आर्थिक मदत कार्यक्रम घेत केली आहे.

यातील 2 लाख 51 हजार रुपये हारा च्या रूपाने दिले आहेत तर उर्वरित पैसे बँक खात्यात दिले आहेत. आगामी काळातही 25 लक्ष रुपये देण्याचा संकल्प केला असल्याचे संयोजकांनी बोलून दाखवल आहे. मतदारांना पैशाने खरेदी करता येते हा समज मोडीत काढण्यासाठी हा उपक्रम राबवल्याच संयोजकांनी म्हटलं आहे, एकूणच आता लोहा विधानसभा निवडणुक ही मतदारांनी हातात घेतली असल्याचे पहावयास मिळाले आहे,

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button