HomeनांदेडPreparation of 8 Kuntal Bundi Prasad : दहीहंडी काल्यासाठी 8 कुंटल बुंदी...

Preparation of 8 Kuntal Bundi Prasad : दहीहंडी काल्यासाठी 8 कुंटल बुंदी प्रसादाची तयारी; स्वयंसेवी महिला मंडळीं घेणार पैकींगसाठी पुढाकार

हिमायतनगर,अनिल मादसवार| वाढोणा येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2025 निमित्ताने येथील श्री परमेश्वर मंदिरात अखंड हरीनाम विनापारायण व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरु आहे. या सप्ताहात मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष बालगोपाल यांनी सहभाग घेतला आहे. या सप्ताहाचा समारोप दि ०३ मार्च सोमवारी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. यावेळी भाविकांना वितरित करण्यासाठी जवळपास 8 कुंटल बुंदीच्या प्रसाद राजस्थानी आचारी यांच्यामार्फत बनविला जात आहे.

मंदिरात सुरु असलेल्या अखंड हरिनाम, वीना पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, काकडा भजन, हरिपाठ उत्साहात होत आहे. या धार्मिक कार्यक्रमाला महिला पुरुषांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सप्ताहाचा सामारोप काल्याच्या कीर्तनाने होणार असून, दि.03 मार्च 2025 सोमवारी हभप. सोपान महाराज शास्री हिंगोली यांच्या मधुर वाणीतून काल्याचं कीर्तन होणार आहे. तत्पूर्वी शहरातील मुख्य रस्त्याने ग्रंथराज ज्ञानेश्वरीची भव्य कलश पालखी यात्रा टाळ मृदंगाच्या वाणीतून काढण्यात येणार आहे.

सप्ताहाला सुरुवात झाल्यापासून दररोज विविध समाज बांधवांच्या वतीने श्री परमेश्वर मंदिरात अन्नदान पंगतीचे आयोजन करण्यात आले असून, त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळतो आहे. सप्ताहातील विविध धार्मिक कार्यक्रमाचा समारोप दहीहंडी काल्याच्या कीर्तनाने होऊन प्रसादासाठी 8 कुंटल बुंदी बनविण्याच काम शुक्रवारी दुपारपासून सुरु करण्यात आले आहे. यासाठी राजस्थानी आचारी लावण्यात आला असून, बुंदी तयार झाल्यानंतर पैकींग करण्यासाठी महिला स्वयंसेवक मंडळी सहभागी होणार आहेत अशी माहिती महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली आहे.

IMG 20250228 131403 Preparation of 8 Kuntal Bundi Prasad : दहीहंडी काल्यासाठी 8 कुंटल बुंदी प्रसादाची तयारी; स्वयंसेवी महिला मंडळीं घेणार पैकींगसाठी पुढाकार

यावेळी सचिव अनंता देवकते, प्रकाश कोमावार, प्रकाश शिंदे, वामन बनसोडे, राजाराम झरेवाड, सौ.लताबाई मुलंगे, सौ. लताबाई पाध्ये, श्रीमती मथुराबाई भोयर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, एड.दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, लिपीक बाबुराव भोयर, रामराव सूर्यवंशी, सुभाष शिंदे, विठ्ठल ठाकरे, अनिल भोरे, मायंबा होळकर, रामभाऊ सूर्यवंशी, राजू गाजेवार, पिंटू चिंतावार, गणेश पाळजकर, गोविंद शिंदे, संतोष गाजेवार, श्याम पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण शिंदे, प्रवीण कोमावार, उदय देशपांडे, राम नरवाडे, दिलीप पार्डीकर, सतीश सोमशेटवार, लक्ष्मण डांगे, मारोती वाघमारे, आदींसह अनेकांची उपस्थीती होती. 

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments