Bhajan Competition ; राज्यसतरीय भजन स्पर्धेत परभणीचा संघ अव्वल

नांदेड। श्री स्वामी समर्थ मंदिर अन्नछत्राच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धा घेण्यात आली. यात राज्यभरातील विविध संघ सहभागी झाले होते. यात परभणीच्या संघाने पहिला पुरस्काराचा मान मिळविला.

जिंदमवाडीच्या भव्य प्रांगणात टाकलेल्या मंडपामध्ये स्पर्धेचे उद्घाटन पंडित बाबुरावजी उपलवाड, राजेंद्र हुरणे, सत्येंद्र जिंदम, पं. संजय जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी पंडित राम बोरगावकर लातूर, पंडित विश्वनाथ दाशरथी छत्रपती संभाजीनगर, पं. मिलिंद जोशी परभणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी दीपप्रज्वलनानंतर स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्राचे उपाध्यक्ष हेमंत गिते, विश्वस्त सुदेश मुक्कावार, श्रीनिवास चौधरी, संदीप गोडगिरे, अशोक साखरे, रवी कुमठेकर, प्रदीप तुप्तेवार यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विश्वस्त मंडळाचे माजी कार्याध्यक्ष अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर पत्रकार विजय बंडेवार यांनी सूत्रसंचालन केले. रमाकांत जोशी यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला.

उद्घाटनानंतर स्पर्धेला प्रारंभ झाला. महाराष्ट्रातून विविध भागातून अनेक मातब्बर भजन मंडळी स्पर्धेत सहभागी झाली होती. एकूण २२ स्पर्धक संघाने यामध्ये सहभाग घेतला होता. सकाळी दहा वाजता सुरू झालेली ही स्पर्धा रात्री आठ वाजेपर्यंत अव्याहतपणे चालू होती. एकापेक्षा एक दर्जेदार आणि सरस असे सादरीकरण प्रत्येक संघाने दिले. स्पर्धेचे परीक्षण लातूरचे पंडित राम बोरगावकर, छत्रपती संभाजी नगरचे पंडित विश्वनाथ दाशरथी व परभणीचे पंडित मिलिंद जोशी यांनी केले.

या स्पर्धेसाठी बक्षिसांची लयलूट करण्यात आली होती. प्रथम बक्षीस नंदकुमार चौधरी यांच्यातर्फे कैलासवासी माधव काशीराम चौधरी यांच्या स्मरणार्थ रुपये ७१ हजाराचे होते. तर द्वितीय बक्षीस ५१००० चे श्रीमती अरुणाताई लाभशेटवार यांच्यातर्फे कै. चंद्रशेखर विश्वंभरआप्पा लाभशेटवार यांच्या स्मरणार्थ होते. तर तृतीय ३१ हजाराचे बक्षीस राजेंद्र हुरणे यांनी त्यांचे वडील कैलासवासी विश्वनाथ आप्पा हुरणे यांच्या स्मरणार्थ ठेवलेले होते. याशिवाय प्रत्येकी ५००० चे उत्तेजनार्थ चार बक्षीसे होती. तर उत्कृष्ट अभंग गायक, उत्कृष्ट गवळण गायक उत्कृष्ट स्वामी समर्थांचे किंवा दत्तगुरूंचे भक्ती गीत गायक व उत्कृष्ट मृदंग किंवा तबलावादक यांच्यासाठी वैयक्तिक रुपये २१०० चे बक्षीस ठेवण्यात आले होते.

स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र या बक्षीसांसोबत ठेवण्यात आले होते तसेच स्पर्धेतील सहभागी संघातल्या प्रत्येक सदस्यांना सादरीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात आले. अटीतटीच्या झालेल्या या भजन स्पर्धेत प्रथम बक्षिसाचे मानकरी ठरले परभणीचे ओमकार भजनी मंडळ, तर द्वितीय ५१ हजाराचे बक्षीस नांदेडच्या नादब्रह्म संगीत विद्यालय भजनी मंडळाने पटकावले. तर ३१ हजाराचे तृतीय बक्षीस नागपूरच्या सुरसुरागिनी या महिला भजन मंडळाला मिळाले. उत्तेजनार्थ बक्षीस हे स्वरगंगा भजन मंडळ नागपूर, कलासाधक संगीत संच नांदेड संत सूरदास भजन मंडळ उदगीर आणि वागेश्वरी भजनी मंडळ लातूर यांना प्राप्त झाले.

विशेष वैयक्तिक पारितोषिकात मृदंग वादक गोपाळ महाराज आळंदी यांना मिळाले तर उत्कृष्ट गवळण गायकीचे बक्षीस अनुसया माता महिला भजनी मंडळ वेणी यांना मिळाले. माजीमंत्री डी. पी. सावंत तसेच ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी आणि सुप्रसिद्ध गायक पंडित बाबुरावजी उपलवाड यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

ही भजन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नियोजन समितीचे सदस्य भगवानराव देशमुख, दिवाकर मुगटकर, संजय जोशी, विलास गारोळे, रमाकांत जोशी, कृष्णा चौधरी, डॉ.प्रमोद देशपांडे, सौ. आनंदी विकास, विनोद राणे, रमाकांत चाटी, पत्रकार विजय जोशी, प्रा. जगदीश देशमुख, पंकज शिरभाते, अमोल मालेगावकर, सुशांत पांडे, गजानन कुलकर्णी, गणेश अण्णा, माधवी पाठक, विजय बंडेवार यांनी परिश्रम घेतले. भजन स्पर्धेसाठी आलेल्या संघांना चहा पाण्याची नाश्त्याची व भोजनाची चोख व्यवस्था श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्राच्या वतीने ठेवण्यात आली होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button