करियरनांदेड

CCTV installed in Zilla Parishad School : ओम बाल गोपाळ गणेश मंडळ तर्फे जिल्हा परिषद शाळेत बसविलेल्या सी.सी.टी.व्ही. कैमेऱ्याचं लोकार्पण -NNL

हिमायतनगर| ओम बाल गोपाळ गणेश मंडळाच्या युवकानी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. शाळेतील गरजू, गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांसाठी गणेश मंडळांनी मागील तीन वर्षापासून दिलेली मदत फार मोठी आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याला व शिक्षकांच्या कार्य करण्याला स्फूर्ती मिळत आहे. असे गौरवउद्गार प्रभारी गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले यांनी व्यक्त करून युंवकांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली आहे.

FB IMG 1728917752829 CCTV installed in Zilla Parishad School : ओम बाल गोपाळ गणेश मंडळ तर्फे जिल्हा परिषद शाळेत बसविलेल्या सी.सी.टी.व्ही. कैमेऱ्याचं लोकार्पण -NNL

ते दिनांक १४ रोजी येथील परमेश्वर गल्लीतील ओम बाल गोपाळ गणेश मंडळच्या सदस्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन वाचविलेल्या रक्कमेतून जि.प.के.प्रा.कन्या शाळेत बसविण्यात आलेल्या चार सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व युनिटचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व स्वागत गीताने करण्यात आले. सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व युनिटचा लोकार्पण सोहळा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण बिच्चेवार यांच्या उपस्थितीत प्रभारी गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले, परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटी उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ याच्या हस्ते करण्यात आला.

FB IMG 1728917774496 CCTV installed in Zilla Parishad School : ओम बाल गोपाळ गणेश मंडळ तर्फे जिल्हा परिषद शाळेत बसविलेल्या सी.सी.टी.व्ही. कैमेऱ्याचं लोकार्पण -NNL

हिमायतनगर शहरातील ओम बाल गोपाळ गणेश मंडळ, परमेश्वर गल्ली, हिमायतनगरच्या मंडळाकडून सलग तीन वर्षापासून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेत गणेश उत्सवामधून पैशांची बचत करून शाळेला भरीव मदत करण्याचे कार्य केले जात आहे. यावर्षी गणेश मंडळाच्या अध्यक्ष व सर्व सदस्यांनी मिळून शाळेसाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसून देण्याचा निर्धार केला. त्याला सत्यात उतरवीत मुलींच्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेमध्ये जवळपास 35 हजार रुपयाच्या खर्चुन सी.सी.टी.व्ही. बसून दिले आहेत. गणेश मंडळांच्या युंवकांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

FB IMG 1728917807356 CCTV installed in Zilla Parishad School : ओम बाल गोपाळ गणेश मंडळ तर्फे जिल्हा परिषद शाळेत बसविलेल्या सी.सी.टी.व्ही. कैमेऱ्याचं लोकार्पण -NNL

यावेळी श्री परमेश्वर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरशेठ श्रीश्रीमाळ यांनी देखील ओम बाल गोपाळ गणेश मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. याप्रसंगी मंचावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागनाथ अक्कलवाड, केंद्रप्रमुख श्री पांपटवार, रामराव सूर्यवंशी, विलास वानखेडे, संजय माने, गणेश मंडळाचे अध्यक्ष तेजस हरणे, उपाध्यक्ष प्रवीण वानखेडे शिवनेरी मित्र मंडळचे अध्यक्ष सुधाकर चिट्टेवार, किरण माने, गणेश पाळजकर, संतोष साबळकर, वैभव शिंदे, गजानन हरणे, सुमित हरणे, गोविंद शिंदे, गंगाधर वानखेडे, प्रदीप ढोणे, गणेश बोरेवार यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती व कन्या शाळा संपूर्ण स्टाफ तसेच अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाथा गंगुलवार सर यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक संजयजी चोले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

FB IMG 1728917764931 CCTV installed in Zilla Parishad School : ओम बाल गोपाळ गणेश मंडळ तर्फे जिल्हा परिषद शाळेत बसविलेल्या सी.सी.टी.व्ही. कैमेऱ्याचं लोकार्पण -NNL

एकीकडे अनेक गणेश मंडळाकडून डीजे व इतर अवास्तव खर्च करून व नाचगाण्यावर धांदगडधिंगा करून धार्मिक संस्कृतीला बाधा पोचविण्याचे काम करत आहेत. मात्र यास हिमायतनगरचे ओम बाळ गोपाळ गणेश मंडळ अपवाद ठरले असून, मंडळाने शैक्षणिक कार्यात भरीव मदत करून इतर गणेश मंडळापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!