CCTV installed in Zilla Parishad School : ओम बाल गोपाळ गणेश मंडळ तर्फे जिल्हा परिषद शाळेत बसविलेल्या सी.सी.टी.व्ही. कैमेऱ्याचं लोकार्पण -NNL
हिमायतनगर| ओम बाल गोपाळ गणेश मंडळाच्या युवकानी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. शाळेतील गरजू, गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांसाठी गणेश मंडळांनी मागील तीन वर्षापासून दिलेली मदत फार मोठी आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याला व शिक्षकांच्या कार्य करण्याला स्फूर्ती मिळत आहे. असे गौरवउद्गार प्रभारी गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले यांनी व्यक्त करून युंवकांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली आहे.
ते दिनांक १४ रोजी येथील परमेश्वर गल्लीतील ओम बाल गोपाळ गणेश मंडळच्या सदस्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन वाचविलेल्या रक्कमेतून जि.प.के.प्रा.कन्या शाळेत बसविण्यात आलेल्या चार सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व युनिटचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व स्वागत गीताने करण्यात आले. सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व युनिटचा लोकार्पण सोहळा शाळा व्य...
