नांदेडमहाराष्ट्र

youth festival ; आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला युवक महोत्सवाच्या जलशातून महामानवांच्या कार्याचा उजाळा – NNL

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्ञानतीर्थ-२०२४’आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या मुख्यमंचावर रविवार दि. २० ऑक्टोबर रोजी एकापेक्षा एक सरस असे जलशे स्पर्धकांनी सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या कार्याचा उजाळा स्पर्धक कलावंतांनी जलसातून सादर केला. दयानंद कला महाविद्यालयाच्या प्रियंका बनसोडे हिने गायलेल्या ‘वंदितो बा भीमा तुला’ ‘आहे कुणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला’ हा जलसा पहाडी आवाजातून सादर केला.

WhatsApp Image 2024 10 20 at 3.40.55 PM youth festival ; आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला युवक महोत्सवाच्या जलशातून महामानवांच्या कार्याचा उजाळा - NNL

या गीताला पसंती मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान जलसाच्या माध्यमातून मांडले. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर, भारतीय संविधान या विषयाला उजाळा दिला. यामध्ये आरती सांगवे, विशाखा गिरी, धम्मदीप सपकाळ, किरण कांबळे, ओमकार गायकवाड, अभिजीत सुतार या स्पर्धकांची साथ मिळाली. दयानंद विधी महाविद्यालयाच्या अपेक्षा डाके या स्पर्धकांने ‘जीवन सुधारण्या भीमराव आला’ हा जलसा गाऊन सादर केला. दयानंद कला महाविद्यालय लातूरच्या स्पर्धकांनी विचारांचा जलसा सादर करत व्हाट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियामुळे मानव कसा व्यस्त झाला आहे.

WhatsApp Image 2024 10 20 at 3.40.43 PM 1 1 youth festival ; आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला युवक महोत्सवाच्या जलशातून महामानवांच्या कार्याचा उजाळा - NNL

हे दाखवून दिले. माणूस प्रबोधन कार्यक्रमापासून दूर चालत असल्याची खंत व्यक्त केली. या जलसात अनमोल कांबळे, श्रीनिवास बिरदेव, रोहन गायकवाड, संदीप भोरे, वैष्णवी नाडे, स्नेहा शेवाळे, आदींचा सहभाग होता. वैष्णवी जगदाळे, दिव्या थोटे, अनिकेत चितळे, आनंद रामदासे इत्यादी यामध्ये सहभागी होते. श्री. शिवाजी महाविद्यालय कंधारच्या स्पर्धकांनी ‘दोनच राजे इथे जन्मले’ हा आंबेडकरी प्रबोधनात्मक जलसा सादर केला. या जलसामध्ये शाहीर घनश्याम पेटकर, विशाल वरपडे, अमोल वानखेडे, प्रिया कदम, रोहिणी लोंढे, सरस्वती वाघमारे, दिगंबर वंजे यांचा सहभाग होता.

WhatsApp Image 2024 10 20 at 3.40.59 PM 1 1 youth festival ; आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला युवक महोत्सवाच्या जलशातून महामानवांच्या कार्याचा उजाळा - NNL

यावेळी यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, युवक महोत्सवाचे आयोजक प्राचार्य डॉ. बालाजी गिरगावकर, प्राचार्य डॉ. सुनील हंबर्डे, डॉ.सोमनाथ पचलिंग, प्रा. प्रवीण मुळीक, डॉ. मामा जाधव, डॉ.कमलाकर चव्हाण, डॉ. ज्ञानदेव राऊत, डॉ. विजय भोपळे, डॉ. दिलीप पाईकराव, डॉ. रामचंद्र भिसे, डॉ.बालाजी भंडारे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ ज्ञानदेव राऊत यांनी केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!