Monday, July 6

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

स्वच्छतेचे दोन रंग अभियानाला जिल्ह्यात सुरुवात – NNL

स्वच्छतेचे दोन रंग अभियानाला जिल्ह्यात सुरुवात – NNL

नांदेड
नांदेड| आपल्‍या परिसरातील व घरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करण्यासाठी जिल्‍हयात आज सोमवार दिनांक ८ जुलै पासून स्वच्छतेचे दोन रंग अभियाला सुरुवात झाली आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत राज्य माहे डिसेंबर पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे. मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्‍यात आले आहे. प्रत्‍येक गावात ५ संवादकाची निवड करण्‍यात आली असून हे संवादक प्रत्‍येकाच्‍या घरी जावून संदेश देत आहेत. यात सरपंच, उपसरंपच, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छागृही, बचत गटातील महिला व गाव स्तरावरील स्वंयसेवक गृहभेटी करून स्वच्छतेचे महत्व पटवून देत आहेत. मुख्य कार्यकारी अ...
शांतता रॅली काडून अशांतता पसरवनाऱ्या संयोजकावर गुन्हे दाखल करा – NNL

शांतता रॅली काडून अशांतता पसरवनाऱ्या संयोजकावर गुन्हे दाखल करा – NNL

नांदेड
नांदेड| मराठा आरक्षणच्या मागणीसाठी शांतता रॅली काडून,नांदेड शहराचे विदृपिकरण व ध्वनीप्रदूषण कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करावे. अशी मागणी धडपडनाऱ्या आंबेडकरवादी लढावंय्या योद्धानीं नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. सोमवार ८ जुलै रोजी मराठा आरक्षण मागणीसाठी शांतता रॅली काढण्यात आली.या रॅलीचे जागरण करण्यासाठी नांदेड शहरातील चौका चौकात विना परवाना,अनधिकृत बॅनर होल्डिंग लावण्यात आले. बेकायदेशीर, नियमबाह्य बॅनर होल्डिंग लावून शांतता रॅलीचे नाटक करून,अशांतता पसरवणाऱ्या लोकांवर महानगर पालिका प्रशासनाने कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. मराठा बांधवाना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागणाऱ्या जरांगे पाटलाच्या सभेला दिलेल्या लाऊड स्पीकर परवानगीचे उल्लंघन करून,ध्वनीप्रदूषण केल्या प्रकरणी,संयोजकावर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे कर...
कंधार लोहा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडा बालाजी पाडागळे यांची पक्षश्रेष्ठी कडे मागणी – NNL

कंधार लोहा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडा बालाजी पाडागळे यांची पक्षश्रेष्ठी कडे मागणी – NNL

नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या जागावाटपा दरम्यान लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षास द्यावी अशी मागणी मा. आ . अमित विलासराव देशमुख ( मा. मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई ) यांच्या कडे निवेदनाद्वारे पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. कंधार - लोहा विधानसभा मतदारसंघ हा लातुर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातील जनता ही काॅग्रेस पक्षाच्या विचारसरणीला मानणारी आहे. स्वातंत्र्य काळापासून इंदिरा गांधी यांना मानणारा मतदार या भागात पहावयास मिळेल. शिराढोण, उस्माननगर हे सर्कल वीस पंचवीस वर्षांपूर्वी मुदखेड विधानसभा मतदारसंघात समाविष्ट होता. त्यावेळी या भागाचे नेते लि.माधवरावची पांडागळे साहेब यांनी रान पेटवून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यात सिंहाचा वाटा आहे. आज ...
अर्धवट रस्त्यावरील उखडलेल्या गिट्टीवर स्लिप होऊन दुचाकीचा अपघात -NNL

अर्धवट रस्त्यावरील उखडलेल्या गिट्टीवर स्लिप होऊन दुचाकीचा अपघात -NNL

नांदेड
हिमायतनगर। हिमायतनगर ते ढाणकीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे रस्त्यावर गिट्टी उघडी पडली आहे. तसेच पाऊस सुरू असल्यामुळे मुरूम आणि गिट्टीमुळे दुचाकी स्लिप होऊन सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पडल्याने दोघा जणाला गंभीर मार लागला आहे. असे अपघात नित्याचेच झाले असून, एखादा मेल्याशिवाय रस्त्याचे काम पूर्ण होणार नाही का..? असा संतप्त सवाल या भागातील शेतकरी संतोष गाजेवार यांनी व्यक्त करून तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करून द्या अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना पत्रकारांशी बोलताना दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या आणि नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या विदर्भ मराठवाड्याला जोडणारा सिरपल्ली - डोल्हारी - पळसपूर - हिमायतनगर या प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याच काम दोन वर्षांपासून अत्यन्त स...
दोन विधीसंघर्षग्रस्त बालका कडुन चोरीचे पाच गुन्हे उघड; स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई – NNL

दोन विधीसंघर्षग्रस्त बालका कडुन चोरीचे पाच गुन्हे उघड; स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई – NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करून आणलेला मुद्देमालासह स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना मुद्देमालासह अटक केली आहे. लहान वयात हि बालके चोरीच्या मार्गाला लागली असून, त्यांना असे प्रकार करण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाला विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. नांदेड जिल्हयात चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन कार्यवाही करण्यासंदर्भात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेडचे पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते. स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी आपले सहकारी सहा.पो.नि. संतोष शेकडे व पोउपनि साईनाथ पुयड यांचे पथकाला नांदेड जिल्हयात चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आनणे कमी रावण केले असता दिनांक 08/07/2024 रोजी संतोष शेकडे, सपोनि, साईनाथ पुयड पोउपनि स्थागुशा नांदेड यांचे टिमने नांदेड...
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार शिफारस पात्र कलाकारांना माहिती पाठविण्याचे आवाहन – NNL

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार शिफारस पात्र कलाकारांना माहिती पाठविण्याचे आवाहन – NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा गायन/संगीत क्षेत्रामध्ये उत्तम व प्रदीर्घ कार्य करणाऱ्या कलाकारास दरवर्षी प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप रुपये 10 लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सन 2023 व सन 2024 या वर्षीच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार निवड समितीची बैठक लवकरच आयोजित करण्यात येत आहे. यापूर्वी प्रदान करण्यात आलेल्या मान्यवर पुरस्कारार्थींची नावे पाठविण्यात येत आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराकरिता नांदेड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील पात्र कलाकारांच्या नावांची शिफारस (वैयक्तिक माहितीसह) 13 सप्टेंबर 1993 च्या शासन निर्णयात जोडलेल्या तपशीलाप्रमाणे mahaculture@gmail.com या ईमेल आयडीवर दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत पाठवावे. आलेल्या शिफारशी समितीसमोर ठेवण्यात येईल, असे आवाहन सहसंचालक, सांस्कृतिक का...
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी कॉ.गंगाधर गायकवाड – NNL

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी कॉ.गंगाधर गायकवाड – NNL

नांदेड
नांदेड| ७ जुलै रोजी सायंकाळी डॉ.अण्णा भाऊ साठे चौक येथील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडेरेशन मंडळ कार्यालयात समाजातील सर्व पक्षीय कार्यकर्ते व पुढाऱ्यांची बैठक जेष्ठ नेते सतीश कावडे यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाली. या बैठकीत साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे सार्वजनिक नांदेड जिल्हा जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी कॉ.गंगाधर गायकवाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष व जिल्हा कार्यकारणी निवडीसाठी घेण्यात आलेल्या या बैठकीस विविध राजकीय पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक ऑगस्ट रोजी सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या वतीने नांदेड शहरात आणि जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतीक कार्यक्रम राबविण्यात येत असतात व जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या कार्यकारणीच्या वतीने पुढील एक वर्षाचे...
आगामी विधानसभेची लगीन घाई माजी आ. प्रदीप नाईक यांनी तालुक्यात दिला भेटीगाठीवर जोर -NNL

आगामी विधानसभेची लगीन घाई माजी आ. प्रदीप नाईक यांनी तालुक्यात दिला भेटीगाठीवर जोर -NNL

नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे| आगामी काळात विधानसभेची लगीनघाई लक्षात घेऊन निवडणूक कधी लागेल याचा नेम नसल्याने माजी आमदार प्रदीप नाईक यांनी किनवट तालुक्यात भेटीगाठीवर जोर दिला. व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली. महाविकास आघाडीच्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करत लोकसभा निवडणुकी दरम्यान रात्रंदिवस एक करत महाविकास आघाडीचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना किनवट माहूर मतदार संघातून अधिक मताची बेरीज जुळवत अधिक मताने लीड देऊन निवडून आणले,अशा या किनवट माहूर मतदार संघात मतदारांशी संवाद साधण्यासाठी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी इस्लापूर शिवनी, कुपटी कोसमेट, कोल्हारी भिसी, पांगरी या गावांना भेटी देऊन मतदारांची संवाद साधत असता मोठ्या प्रमाणात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. माजी आमदार प्रदीप नाईक हे शिवणी येथे आले असता एक संयमी आणि विकासभिमुख नेता म्हणून त्यांच्याकडे ...
अबबब… चक्क गुगलवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय बदलला; अधिवेशनात चर्चा व्हावी -NNL

अबबब… चक्क गुगलवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय बदलला; अधिवेशनात चर्चा व्हावी -NNL

नांदेड, महाराष्ट्र, हिंगोली
हिमायतनगर /ढाणकी। अर्धापूर - माहूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय या नावाने अस्तित्वात आला हा मार्ग अर्धापूर - तामसा - आष्टी - जवळगाव - हरदडा - ढाणकी - फुलसावंगी पर्यंतच काम झाले. या मार्गाचे दोन वेगवेगळ्या निविदा निघाल्या एक अर्धापूर हिमायतनगर तर दुसरी हिमायतनगर फुलसावंगी या निविदा दैनिक गावकरी ह्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात काम मात्र अर्धापूर - घारापुर - बोरी - हरदडा - ढाणकी फुलसांवगी असे करण्यात आले आहे. गुगलवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय बदलला असल्याचे दिसून येत असून, मंजूर निविदेत दाखविलेला मार्ग अन्य ठिकणाहून कसा काय केला... याचं गौड बंगाल काय..? असा प्रश्न आता पुढे येऊ लागला आहे. मंजूर रस्त्याचे अपवाद फक्त मेट ते निगंनुर पाझर तलावापर्यंत डांबरी काम का झाले ? व कसे? हे देवालाच माहित. हा रस्ता क्रमांक 752 आय गुगल वर...
भदंत पंयाबोधी शांततेचे अग्रदूत – श्रीकृष्ण कोकाटे -NNL

भदंत पंयाबोधी शांततेचे अग्रदूत – श्रीकृष्ण कोकाटे -NNL

नांदेड
नांदेड| शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांसह धम्मगुरु भदंत पंयाबोधी थेरो यांनी मोलाची भूमिका निभावलेली आहे. अनेक वेळा शांतता कमिटीचे सदस्य या नात्याने त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे. बुद्ध विचारांचा प्रचार आणि प्रसार करतांना आजच्या काळातील ते शांततेचे अग्रदूत बनले आहेत, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. यावेळी भदंत पंयाबोधी थेरो व भिक्खू संघासह आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम, शास्त्रज्ञ डॉ. सिद्धार्थ जोंधळे, रमेशदादा सोनाळे, बापुराव गजभारे, देवराव खंदारे, डॉ. गंगाधर सोनकांबळे, प्रफुल्ल सावंत, प्रभू सावंत, इंजि. भरतकुमार कानिंदे, गोविंद दळवी, इंजि. प्रशांत इंगोले, विनायक गजभारे, कैलास सावते, सुभाष रायबोले, संदिप सोनकांबळे, विठल गायकवाड, उपप्राचार्य साहेबराव इंगोले प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, विलास वाठोरे, एस. एन. गोडबोले आदींची उपस्थि...
error: Content is protected !!