Monday, July 6

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या अभूतपूर्व रॅलीला लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर -NNL

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या अभूतपूर्व रॅलीला लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दि. ८ जुलै रोजी नादेड शहरात सगेसोयरे कायदा अंमलात आणून मराठा समाजाला ओबीसी प्रवगार्तुन आरक्षण मिळावे. यासह अन्य मागण्यांसाठी शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीत जरांगे पाटील याना पाठिंबा देत एक मराठा... लाख मराठा... या घोषणां देत लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाड्यात दौरा सुरू आहे. आज हिंगोलीहून नांदेड शहरात त्यांचे आगमन झाल्यानंतर शहरातील राज कॉर्नर तरोडेकर चौक येथून या शांतता रॅलीला सुरूवात झाली. सगेसोयरे कायदा अंमलात आणून मराठा समाजाला ओबीसी प्रवगार्जुन आरक्षण मिळावे. महाराष्ट्रातील आतापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यात यावे. या मागण्यांसाठी निघालेली अभूतपूर्व रॅलीने राजमाता जिजाऊ चौक-श्रीनगर-महात्मा ज्योतिवा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा आय. टी.आय. चौक-शिवाजीन...
विकासात्मक कामे घराघरात पोहचला – मराठवाडा संयोजक प्रविण साले -NNL

विकासात्मक कामे घराघरात पोहचला – मराठवाडा संयोजक प्रविण साले -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। पूर्णतः हताश झालेल्या विरोधकांना कोणताही पर्याय उरला नसल्याने त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत नेरेटीवचा वापर केला. मोदीचे सरकार संविधान बदलणार असा अपप्रचार करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला परंतु भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या या नेरेटिव्हला न घाबरता निर्भीडपणे पक्षाची विचारधारा, ध्येयधोरणे व विकासात्मक कामे घराघरात पोहोचविण्यासाठी जोमाने कामाला लागावे असे आवाहन मराठवाडा संयोजक प्रवीण साले यांनी किनवट येथे केले आहे. लोकसभेच्या निवडणुका संपन्न होताच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली असून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक जिल्ह्यात बूथ सक्षमीकरण व मतदार यादी पुनर्नरीक्षण संदर्भात बैठका नियोजन व रणनीती ठरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 6 जुलै रोजी गोकुंदा येथील गोप...
रिचार्ज दर वाढीनंतर ग्राहकांचा दीर्घकालीन प्लान्स खरेदी करण्याकडे ओढा: पेटीएम -NNL

रिचार्ज दर वाढीनंतर ग्राहकांचा दीर्घकालीन प्लान्स खरेदी करण्याकडे ओढा: पेटीएम -NNL

नांदेड
मुंबई| रिलायन्‍स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया अशा प्रमुख नेटवर्क प्रदात्‍यांनी अलीकडेच रिचार्ज प्लान्सच्या किमतीत वाढ केली. दरम्यान पेटीएम ग्राहकांना त्‍यांचे मोबाइल रिचार्ज कार्यक्षमपणे व्‍यवस्‍थापित करण्‍यासाठी सोईस्‍कर पर्याय देत आहे. कंपनीने आपल्या मंचावर सरासरी दैनंदिन रिचार्जेसच्‍या तुलनेत मोबाइल रिचार्जमध्‍ये १५ ते २० टक्‍के वाढीची नोंद केली आहे. तसेच दीर्घकालीन प्लान्स खरेदीसाठी देखील निवडीमध्‍ये वाढ झाली असल्याचे पेटीएमच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. डेटा, अनलिमिटेड पॅक किंवा टॉप-अप्‍ससाठी पेटीएम रिचार्ज प्‍लॅन्‍सची व्‍यापक श्रेणी देते, ज्‍यामुळे वापरकर्ते टेलिकॉम ऑपरेटवर त्‍यांच्‍या गरजांना अनुसरून प्‍लॅन्‍सची निवड करू शकतात. पेटीएम युजर-अनुकूल इंटरफेस आणि इतर फायद्यांमुळे मोबाइल रिचार्जेससाठी सर्वात पसंतीचा प्‍लॅटफॉर्म आहे. यामध्‍ये स्थिर पेमेंट पर्याय, डिल्स आणि कॅशबॅक ऑफ...
बिडी कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन -NNL

बिडी कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन -NNL

नांदेड
नांदेड| येत्या शैक्षणिक वर्षात 2024-25 साठी आर्थीक सहाय्य योजनेसाठी महाराष्ट्रातील चुनखडी, डोलोमाईट, बिडी, खनिज खान कामगारांच्या मुलांना मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला, मुलींसाठी आर्थिक योजने अंतर्गत सहाय्य योजना भारत सरकारने शिष्यवृत्तीसाठी पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी, अकरावी ते बारावी, तसेच आय.टी.आय, पॉलीटेक्निक, पदवी अभ्यासक्रम (बि.एस.सी, कृषीसह) बि.ई, एम.बी.बी.एस., एम.बी.ए यांना वार्षिक अर्थसहाय्य राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल https://scholaarship.gov.in वर शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 ऑगस्ट पर्यंत आहे. प्रिमॅट्रिकसाठी आहे. आणि पोष्ट मॅट्रिकसाठी 31 ऑक्टोबर पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज आणि पात्रता माहिती राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर प्रदर्शित केली आहे. अर्जाची पडताळणी करुन घेण्याची ज...
“मुख्यमंत्री वयोश्री” योजना ज्येष्ठांना आधार, अर्ज करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे अवाहन -NNL

“मुख्यमंत्री वयोश्री” योजना ज्येष्ठांना आधार, अर्ज करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे अवाहन -NNL

नांदेड
नांदेड| सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी “मुख्यमंत्री वयोश्री” योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी लातूर विभागातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे. राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वाढत्या वयानुसार येणारे अपंगत्व, अशक्तपणा, व आजार यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेले चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हिलचेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खूर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट,सर्वाइकल कॉलर इ. सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ आबाधित ठेव...
Cereals, pulses, pulses crop competition | राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिक स्पर्धा खरीप हंगाम -NNL

Cereals, pulses, pulses crop competition | राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिक स्पर्धा खरीप हंगाम -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| खरीप हंगाम सन 2024 पिक स्पर्धेसाठी जास्तीतजास्त जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना केले आहे. राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन...
मंत्रालयीन सांस्कृतीक विभागाच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी अंकुश चित्ते यांची निवड -NNL

मंत्रालयीन सांस्कृतीक विभागाच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी अंकुश चित्ते यांची निवड -NNL

नांदेड
नांदेड| मंत्रालयीन सांस्कृतीक विभागाच्या नांदेड जिल्हाउपाध्यक्ष पदी प्रशीध्द संगीतकार गितकार गायक वादक अंकुश चित्ते यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद गजभारे तसेच जिल्हाध्यक्ष गंगाधर वडणे यांनी निउती पत्र देउन निउती करण्यात आली. मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी संघटना सांस्कृतिक विभाग नांदेड जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी नुकतीच खुरगाव श्रामनेर शिबिर येथे भंते पंय्याबोधी थेरो यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे तसेच जिल्हाध्यक्ष गंगाधर वडणे रिपब्लिकन हक्क परिषदेचे अध्यक्ष रमेश सोनाळे रिपब्लिकन सेनेचे माधव जमदाडे जेष्ठ नेते प्रभू सावंत जिल्हा महासचिव कनिष्क सोनसळे यांच्या प्रमुख उपस्थीतीत अंकुश चित्ते यांना निउक्ती पत्र देण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत जी वानखेडे यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा मंत्रालयीन सांस्कृतिक विभाग संघटनेच्या पदनियुक्तीचे आदेश प्राप्त होत...
ट्रक व दुचाकी अपघातात एक ठार एक जखमी… NNL

ट्रक व दुचाकी अपघातात एक ठार एक जखमी… NNL

नांदेड
नवीन नांदेड| नांदेड हैदराबाद रोडवरील चंदासिंग कॉर्नर येथील एस.बी.आय. बॅक समोर झालेल्या ट्रक व दुचाकी अपघात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना येथे कृषी सहाय्यक असलेले गंगाधर दतराम शिंदे हे जागीच मयत झाले असुन, या अपघातात सदरील दुचाकी ट्रक चालकाने फरकट नेल्यामुळे मयत यांच्या शरीराचे तुकडे झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात रस्ता दुतर्फा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अखेर पोलीस निरीक्षक एन. एस.आयलाने व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयतास शासकीय रुग्णालयात नेले असुन ट्रक चालकास ट्रक सह ताब्यात घेतले आहे. या मार्गावर अपघात घडल्यानंतर जाणारी येणारी वाहतूक खोळंबली होती. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या चंदा सिंग कॉर्नर येथे ८ जुलै रोजी दुपारी ३,३० वाजता वाजेगाव येथुन भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक क्रमांक आर.जे. ०४ जि.सी.३७८६ याने दुचाकी क्रंमाक एम.एस.२६ ,३५९४ स्वाराला दिलेल्या धडकेनंतर ट्रकने...
नांदेड येथील मराठा आरक्षण रॅलीत ग्रामीण व शहरी भागातील मोठया संख्येने सकल मराठा समाज बांधव सहभागी -NNL

नांदेड येथील मराठा आरक्षण रॅलीत ग्रामीण व शहरी भागातील मोठया संख्येने सकल मराठा समाज बांधव सहभागी -NNL

नांदेड
नवीन नांदेड| नांदेड येथील ८ जुलै रोजी आयोजित मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीत नवीन नांदेड सह ग्रामीण भागातील अनेक गावातील सकल समाज बांधवसह ,माजी जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत संरपच,पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी,जेष्ठ नागरीक, युवक, महिला, यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी एक मराठा लाख मराठा यासह अनेक घोषणा देत ऊपलब्ध असलेल्या वाहनांसह, दुचाकी वरून नांदेड शहरात प्रवेश केला. नांदेड शहरात आयोजित मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी नांदेड दक्षिण हद्दीत असलेल्या विष्णुपूरी, वाजेगाव,धनेगाव, तुप्पा, कांकाडी,भायेगाव,बळीरामपुर, खुपसरवाडी,माकर्ड, गोपाळचावडी यासह ग्रामीण भागातील अनेक गावातून सकल मराठा समाज यांच्या वतीने केलेल्या आवाहन प्रतिसाद देत उपलब्ध असलेल्या वाहनाने मोठया प्रमाणात समाज बांधव सहभागी झाले होते....
शिवराज्याभिषेकाने सांस्कृतिक उत्क्रांती झाली – ‘शिवजागर’ उपक्रमात चेतन कोळी यांच मत – NNL

शिवराज्याभिषेकाने सांस्कृतिक उत्क्रांती झाली – ‘शिवजागर’ उपक्रमात चेतन कोळी यांच मत – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| “शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील राज्याभिषेकाची घटना ही इतिहासाचा प्रवाह बदलण्यास कारणीभूत ठरली. महाराजांच्या मृत्यूनंतरही कित्येक वर्षे मुघलांच्या सत्तेला भिडण्याचे आणि दिल्लीचे तख्त राखण्याचे असामान्य शौर्य व धैर्य मराठे दाखवू शकले याची प्रेरणाबीजे राज्याभिषेकाच्या घटनेत आहेत. राज्याभिषेकाने केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषिक क्षेत्रांतही उत्क्रांती घडली. शिवराय हे केवळ राष्ट्रपुरुष नव्हते तर ते जागतिक स्तरावरील युगपुरुष होते” असे मत चेतन कोळी यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नांदेड , कृष्णा पब्लिकेशन्स आणि सह्याद्री प्रतिष्ठान मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “शिवजागर” या उपक्रमात ते नांदेड येथे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अविनाश कदम विभाग प्रमुख भुशास्त्र विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदय...
error: Content is protected !!