Homeक्राईमदोन विधीसंघर्षग्रस्त बालका कडुन चोरीचे पाच गुन्हे उघड; स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई...

दोन विधीसंघर्षग्रस्त बालका कडुन चोरीचे पाच गुन्हे उघड; स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई – NNL

दोन मो.सा., तिन मोबाईल व गुन्हे करतांना वापरलेली लोखंडी टॉमी असा एकुण 1,66,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

नांदेड| नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करून आणलेला मुद्देमालासह स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना मुद्देमालासह अटक केली आहे. लहान वयात हि बालके चोरीच्या मार्गाला लागली असून, त्यांना असे प्रकार करण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाला विशेष मोहीम राबवावी लागणार आहे.

नांदेड जिल्हयात चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन कार्यवाही करण्यासंदर्भात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेडचे पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते. स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी आपले सहकारी सहा.पो.नि. संतोष शेकडे व पोउपनि साईनाथ पुयड यांचे पथकाला नांदेड जिल्हयात चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आनणे कमी रावण केले असता दिनांक 08/07/2024 रोजी संतोष शेकडे, सपोनि, साईनाथ पुयड पोउपनि स्थागुशा नांदेड यांचे टिमने नांदेड शहरातील चोरी करणारे आरोपीचा शोध सुरु होता.

दरम्यान त्यांना मिळालेल्या गोपनिय माहीती प्रमाणे दोन संशईत विधीसंघर्षग्रस्त बालकांकडे त्यांचे नातेवाईका समक्ष विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांचे सांगणे प्रमाणे नांदेड शहरातील दोन मंदीर चोरी व तिन मोटार सायकल चोरी केल्याचे पंच व त्यांचे नातेवाईकांचे समक्ष कबुली दिली. त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाचे नातेवाईकांचे ताब्यातुन त्यांनी चोरी केलेली दोन मो.सा., तिन मोबाईल व गुन्हे करतांना वापरलेली लोखंडी टॉमी असा एकुण 1,66,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन रिपोर्टासह पो.स्टे. भाग्यनगर येथे देण्यात आला आहे. उघडकीस आलेल्या गुन्हयाची यादी खालील प्रमाणे.

IMG 20240708 165615 दोन विधीसंघर्षग्रस्त बालका कडुन चोरीचे पाच गुन्हे उघड; स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई - NNL

सदरची कार्यवाही ही श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, अबिनाश कुमार,अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, संतोष शेकडे, सपोनि, साईनाथ पुयड पोउपनि पोलीस अमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, रुपेश दासरवार, किशन मुळे, बंडु कलंदर, गणेश धुमाळ, विलास कदम, अनिल बिरादार, साहेबराव कदम, गजानन बयनवाड, महीला पोलीस अमलदार किरन बाबर, चालक शंकर केंद्रे यांनी पार पाडली असून, सदर पथकाचे पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments