भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत मागील अनेक वर्षांपासून आम आदमी पार्टीची सत्ता होती. आम म्हणजे सर्वसामान्य, आदमी म्हणजे माणूस ! सर्वसामान्य माणसांची पार्टी म्हणून आम आदमी पार्टीने नावलौकीक मिळविला होता. मोफत वीज, मोफत पाणी, चांगली आरोग्य सुविधा, चांगल्या सरकारी शाळा, महिलांना दरमहा आठशे रुपये अनुदान, महिलांना मोफत बस प्रवास, मोफत तीर्थक्षेत्र दर्शन ही आम आदमी पक्षाची म्हणजे आप सरकारची ठळक वैशिष्ट्य होती. भारतीय जनता पार्टीला हे सारे देखवत नव्हते. दुसरे कारण म्हणजे केंद्रात भाजपची सत्ता आणि दिल्लीत आपची सत्ता हे समीकरण भाजपच्या गळ्यात उतरत नव्हते, मग कसेही करुन, कांहीही करुन आपला पायउतार होण्यासाठी जे जे करता येईल ते ते करायचा भाजपने जणू चंग बांधला होता.


यासाठीच खोटा दारु घोटाळा रचण्यात आला. त्यात अगोदर मनीष सिसोदियाला अटकवण्यात आले. नंतर सत्येंद्र जैन व शेवटी खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अडकवून जेलमध्ये टाकण्यात आले. जेलमधून बाहेर आल्यावर केजरीवाल मुख्यमंत्रीपदी राहणार नाहीत अशी रणनीती आखण्यात आली. त्यामुुळेच आतिषी यांना मुख्यमंत्रीपदावर बसऊन केजरीवाल यांना घरुन कामकाज पहावे लागले, ते प्रभावी ठरु शकले नाही.
मिस्टर क्लीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या उच्च विद्याविभूषित प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य केलेल्या अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलीन करुन भाजपने प्रचाराचा प्रपोगोंडा केला.

एका खोट्याचा शंभर वेळा उच्चार केला तर ते खरे वाटते असे म्हणतात, तसेच कांही अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत झालेले दिसून येते. दिल्लीत एकूण मतदान ६०.५४ % झाले. त्यात एकूण मतदान झाले ९४ लाख ५१,५९४. दिल्ली वासियांनी ७० सीटसाठी बीजेपीला दिलेली मते ४४ लाख ७३,८९९. दिल्ली वासियांनी ७० सीटवर बीजेपीच्या विरोधात दिलेली एकूण मते ४९ लाख ३१,०८६. दिल्लीवासियांनी कुणालाही पसंद केले नाही म्हणजे नोटाला ५०,००० हून अधिक मतदान झाले.

याची एकूण गोळाबेरीज केली तर दिल्ली वासियांनी बीजेपीच्या विरोधात ज्यादा वोट दिले, तरीही बीजेपी ४८ सीट जिंकून पूर्ण बहुमताने सत्तेत आली ! आम आदमी पार्टीला ७० जागेवर एकूण मतदान ४१ लाख २३,७६० झाले. भाजप पेक्षा फक्त ३ लाख मतदान कमी झाले. कॉंग्रेसला ७० जागेवर एकूण ६ लाख ३३२ मते मिळाली पण एकही जागा जिंकता आली नाही.

बहुजन समाज पार्टीला ६८ सीटवर निवडणूक लढविल्या नंतर फक्त ५४,९४५ मते मिळाली. याचा अर्थ चाळीस वर्ष जुन्या बसपाच्या उमेदवारांना सरासरी फक्त आठशे मतदान झाले आहे. खा. चंद्रशेखर यांच्या एका वर्षापूर्वी स्थापन झालेल्या आजाद समाज पार्टीने १५ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्या सर्वांना मिळून फक्त ९०१७ (नऊ हजार सतरा) मते मिळाली. हे फारच हास्यास्पद आहे. आसपाच्या एका उमेदवारास सरासरी फक्त सहाशे मतदान झाले आहे. बहुजन समाज पक्षाच्या चाळीस वर्षाच्या तुलनेत एका वर्षाच्या आसपाने चांगलेच मतदान मिळविले असे म्हणून समाधान मानावे लागेल पण यातून बसपा आणि आसपाला कांहीही साध्य करता आले नाही. ही फार मोठी चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे.
खा. असदुद्दीन ओवैसी यांची पार्टी मजलिस Aimim ने फक्त २ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यांना एकूण ७३,०३२ मते मिळाली. त्यांचे सरासरी मतदान ३६,५१६ आहे, म्हणजे ते विजयाच्या जवळपास गेले होते. त्यांना अजून दहा पंधरा हजार जादा मते मिळाली असती तर त्यांचे दोनही उमेदवार विजयी झाले असते. एक आमदार तर नक्कीच निवडून आला असता.
बसपा आणि आसपाने देखिल आंथरुन पाहून पाय पसरले असते व आपसात ताळमेळ ठेऊन वेगवेगळ्या ठिकाणांहून निवडणूक लढवली असती तर प्रत्येकी पाच दहा आमदार नक्कीच निवडून आले असते. यामुळे दुहेरी फायदा हा झाला असता की पक्षाचे आमदार राहिले असते आणि भाजप कदापिही सत्तेत येऊ शकली नसती. बहन मायावती आणि खा. चंद्रशेखर या दोघांचाही अहंकार म्हणजे मला ना तुला घाल कुत्र्याला असा सिद्ध झाला आहे. यावर कार्यकर्त्यांनी चिंतन करावे एवढाच सल्ला देऊ शकतो. टिकाच करायची तर आणखीन भयंकर टिका करता येऊ शकते पण बहुजन समाजाचे खच्चीकरण होऊ नये म्हणून जास्तीचे लिहीत नाही.
अन्य छोट्या पार्टी व निर्दलीय उमेदवारांना एकूण ६५,०००+ मतदान झाले आहे. नोटाला मिळालेले ५०,०००+ तसेच आप+ कांग्रेस मिळून एकूण मतदान = ४७,२४,०९२ (भाजप पेक्षा २,५०,१९३ ज्यादा मतदान)
आप + कांग्रेस + मजलिस + बसपा + आसपा = ४८,६१,०८६ वोट (बीजेपी पेक्षा ३ लाख ८७ हजार ज्यादा मतदान) असे झाले असते तर आज नरेंद्र मोदी ज्या डरकाळ्या मारत आहेत, ते घडले नसते. २७ वर्षांनंतरही भाजपला दिल्लीचे दिल जिंकता आले नसते. थोडक्यात कांही निष्कर्ष काढण्यात येत आहेत. ते जवळपास योग्य आहेत का ते पहा…
१. आपच्या हातातील सिंहासन अंहकार व अतिउत्साहित झाल्यामुळे व कुणाशीच हातमिळवणी न केल्याने सोडून द्यावे लागले.
२. आप आणि कांग्रेस पार्टी इंडिया आघाडीत आहेत पण दिल्लीत दोघेही एकमेकांच्या विरोधात लढले. (१४ जागेवर एकट्या काँग्रेसमुळे आपचा पराभव झाला.) म्हणजे भाजपला बहुमत मिळाले नसते.
३. फक्त २ जागेवर मजबूतीने निवडणूक लढून ओवेसी यांची मजलिस Aimim पार्टी हिरो बनली आहे.
४. बसपाने ६८ जागेवर बिना रुप रेषा आणि रणनीति अभावी निवडणूक लढल्याने झिरो स्थिती निर्माण होऊ शकली.
५. आसपाने १५ जागा मजबूतीने न लढता नोटा पेक्षा कमी मतदान घेऊन आपली वैल्यू कमी करुन घेतली. आपले भविष्य अंधारात ढकलून टाकले.
६. तृणमुल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने आपला समर्थन दिले होते पण त्याचा परिणाम दिसून आला नाही.
७. दिल्ली भारताची प्रशासकीय राजधानी आहे. तिथे ८० % कर्मचारी आहेत. यांच्यासाठी केंद्र सरकारकडून निवडणुकीच्या काळात जाहिर झालेली कर सवलत भाजपसाठी फायद्याची ठरली अशी चर्चा आहे.
८. बसपाने आपले मुखपत्र बंद केले, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण बंद केले, मायावती कार्यकर्त्यांना भेटत नाहित, नेमलेले राज्य प्रभारी फक्त पैसे खाण्याचे काम करतात ही बसपाच्या पिछेहाटीची कारणे सांगितली जात आहेत.
९. दिल्लीत दलितांची संख्या भरपूर आहे पण अरविंद केजरीवाल त्यांना दुय्यम वागणूक देतात व मुसलमानांचेही खुलून समर्थन करीत नाहित असा आरोप केला जात आहे.
१०. मुसलमान प्रत्येक पक्षातून एकमेकांच्या विरोधात लढले, त्यामुळेच त्यांचे जास्त आमदार निवडून येऊ शकले नाहित. जे चार निवडून आले ते फक्त आपचे आहेत.
निष्कर्ष : दिल्लीवाल्यांना बीजेपीला सत्तेत आणायचे नव्हते व ते सत्तेत आलेही नसते पण अन्य सारे पक्ष वेगवेगळे लढले, यामुळेच भाजपच्या विजयाला विरोधी पक्षांतील बेकी कारणीभूत ठरली. त्यात मुख्य खलनायक ठरली ती काँग्रेस ! धन्यवाद !
– इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, संस्थापक, अ. भा. गुरु रविदास समता परिषद मो. ८५५४९९५३२०