Tuesday, July 7

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Dhadak Morcha of Situ | सीटूचा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर धडकला -NNL

Dhadak Morcha of Situ | सीटूचा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर धडकला -NNL

नांदेड
नांदेड। दि.१० जुलै रोजी सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या नेतृत्वाखाली म.गांधी पुतळा येथून दुपारी एक वाजता धडक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आणि जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला. गगनभेदी घोषणा देत राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मोर्चात आशा आणि गटप्रवर्तक ताई मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या. राष्ट्रीय मागणी दिना निमित्ताने देशव्यापी मोर्चाची हाक सीटू कामगार संघटनेने दिली होती. सदरील मोर्चात खालील मागण्या करण्यात आल्या. आशा व गटप्रवर्तकांना किमान, कर्मचारी दर्जा व पेन्शन देण्यात यावे. गटप्रवर्तकांचे समायोजन करण्यात यावे. आशा व गटप्रवर्तक ताईंनी लोकसभा निवडणुकीत वरिष्ठाच्या आदेशानुसार कर्तव्य पार पाडले आहे परंतु बहुतांश कार्य केलेल्या ताईंना अद्याप निवडणूक भत्ता देण्यात आला नाही तो तात्काळ देण्यात यावा. राज्य स...
Gulabrao Patil | राज्यातील गट, समूह समन्वयकांना कायमस्वरूपी सेवेत घेणार – गुलाबराव पाटील -NNL

Gulabrao Patil | राज्यातील गट, समूह समन्वयकांना कायमस्वरूपी सेवेत घेणार – गुलाबराव पाटील -NNL

नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे। मागील अडीच वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाअतंर्गत जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असून गट व समूह समन्वयक कर्मचाऱ्यांना मानधन १३ हजारांवरून २५ हजार करण्यात आले. त्याचप्रमाणे राज्यातील ६१४ गट व समूह समन्वयक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. यावेळी मानधन वाढविल्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांचा दि.७ जुलै रोजी जळगाव येथे संघटनेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटना यांची रविवारी जळगाव येथे वार्षिक राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यातील सर्व गट संसाधन केंद्रातील गट समन्वयक व समूह समन्वयक कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे...
Rajyashri Shahu Maharaj | राज्यश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना पूर्वीप्रमाणे समाज कल्याण विभागाकडे ठेवण्यात यावी -NNL

Rajyashri Shahu Maharaj | राज्यश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना पूर्वीप्रमाणे समाज कल्याण विभागाकडे ठेवण्यात यावी -NNL

नांदेड
वडगाव/पोटा| राजश्री शाहू ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना ही महाराष्ट्रातील वयोवृद्ध साहित्यिक ज्येष्ठ कलावंत यांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून मानधन दिल्या जाते. परंतु पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय दिनांक 16 मार्च 2024 रोजी काढून सदर मानधन योजनेमध्ये सुधारणा करण्यात येऊन जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत सदस्य सचिव आहेत. परंतु शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2024 व शासन निर्णय दिनांक 16 मार्च 2024 यामध्ये जिल्हास्तरीय समिती कोणती ठेवावी याबाबत स्पष्टता नाही त्यामुळे दिनांक 16 मार्च 2024 काढलेला शासन निर्णय रद्द करून ही योजना पंचायत विभागाकडे वर्ग न करता समाज कल्याण विभागाकडे ठेवण्यात यावी अशी मागणी पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ महाराष्ट्र राज्य सं...
Action on tobacco sellers | कंधार शहरात 16 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही -NNL

Action on tobacco sellers | कंधार शहरात 16 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| कंधार शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 9 जुलै रोजी कंधार शहरात अचानकधाडी टाकून एकूण 16 तंबाखू विक्रेत्यांकडून 8 हजार 400 रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील व वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजु टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील, जिल्हा सल्लागार डॉ. उमेश मुंडे, दंत शल्यचिकित्सक डॉ. महेश पोकळे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक अरविंद वाटोरे व केस रजिस्ट्री सहाय्यक सुनील तोटेवाड तसेच कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव या...
Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात विशेष व्याख्यानाचे आयोजन -NNL

Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात विशेष व्याख्यानाचे आयोजन -NNL

नांदेड
नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रातर्फे सोमवार दि. १५ जुलै रोजी स. ११:०० वा. विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४ जुलै रोजी डॉ. शंकरराव चव्हाण यांची १०४ वी जयंती आहे. यानिमित्ताने सोमवार दि. १५ जुलै रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात विशेष व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानास ज्येष्ठ साहित्यिक व ‘आधुनिक भगीरथ: ना. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी गौरव ग्रंथ’ या ग्रंथाचे संपादक डॉ. सुरेश सावंत हे ‘ना. डॉ. शंकररावजी चव्हाण: व्यक्तित्व, नेतृत्व आणि कर्तृत्व’ या विषयावर संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे राहणार आहेत तर व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्रदादा चव्हाण, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिक...
Kusumtai Chavan Memorial Award | लुलेकर, खरे, बोरलेपवार व महल्ले दाम्पत्याला कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार घोषित -NNL

Kusumtai Chavan Memorial Award | लुलेकर, खरे, बोरलेपवार व महल्ले दाम्पत्याला कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार घोषित -NNL

नांदेड
नांदेड| राज्यातील एक प्रतिष्ठेचा सन्मान म्हणून नावारुपास आलेल्या कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांचे यंदाचे विजेते जाहीर झाले असून, त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक डॉ. निलेश खरे, प्रख्यात चित्रकार डॉ. नरेंद्र बोरलेपवार आणि 'फोर्ब्स'कडून गौरव झालेले उद्योजक दाम्पत्य पंकज महल्ले व सौ. श्वेता ठाकरे यांचा समावेश आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती तसेच दैनिक सत्यप्रभाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा येत्या रविवारी १४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड, नांदेड येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री भास्करराव पाटी...
Plantation | वृक्षमित्राचे कार्य कौतुकास्पद अतिरिक्त आयुक्त कदम – NNL

Plantation | वृक्षमित्राचे कार्य कौतुकास्पद अतिरिक्त आयुक्त कदम – NNL

नांदेड
नवीन नांदेड| नांदेड मनपा हद्दीत वृक्षमित्राचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका,गुरुद्वारा लंगर साहिब,नांदेड वृक्षमित्र फाऊंडेशन,नांदेड आयोजित हरित नांदेड अभियान-2024 महावृक्ष लागवड सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत १२० मोठया वृक्षाची लागवड कार्यक्रम प्रसंगी केले. हरित नांदेड अभियान अंतर्गत महावृक्ष १२० वृक्षाची लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे, सहायक आयुक्त मिर्झा बेग, कनिष्ठ अभियंता अरूण शिंदे,किरण सुर्यवंशी डॉ.नरेश रायेवार, यांच्या सह वृक्षमित्र,नागरीक महिला युवक उपस्थितीत होते. सुत्रसंचालन वृक्ष मित्र संतोष मुगटकर यांनी तर उपस्थित मान्यवराचे स्वागत सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त कदम यांनी सिडको परिसरात होत असलेल...
BSF jawan martyred | हडकोतील बीएसएफ जवान कामेश कदम यांना हरियाणात वीरमरण – NNL

BSF jawan martyred | हडकोतील बीएसएफ जवान कामेश कदम यांना हरियाणात वीरमरण – NNL

नांदेड
नांदेड| हडको येथील रहिवासी असलेले बीएसएफ जवान तथा नाईक पदावर कार्यरत असलेले कामेश विठ्ठलराव कदम (वय ४२) यांना ८ जुलै रोजी हरियाणात कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्या या वीरमरणामुळे संपूर्ण सिडको - हडकोत शोककळा पसरली आहे. हडको येथील रहिवासी कामेश कदम हे सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफमध्ये १६ जुलै २००३ रोजी रुजू झाले होते. आपल्या कर्तव्यकाळात नाईक पदावर पोहोचले होते. कामेश कदम यांनी आपल्या सीमा सुरक्षा दलातील आपल्या कर्तव्य कार्यकाळात दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, बांगलादेश बॉर्डर येथे सेवा बजावली होती. सध्या ते हरियाणा येथे कार्यरत होते. कामेश कदम ९ जुलै रोजी कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मंगेश कदम यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक म...
School nutrition | आयएफटीयू सलग्न प्रगतीशील शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे जिल्हा परिषदवर निदर्शने आंदोलन – NNL

School nutrition | आयएफटीयू सलग्न प्रगतीशील शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे जिल्हा परिषदवर निदर्शने आंदोलन – NNL

नांदेड
नांदेड| आज दि.10 जुलै 2024 रोजी प्रगतीशील शालेय पोषण आहार कामगाराचे निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकारी महिलांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. यानिदर्शने आंदोलनात मुख्य मागण्या म्हणजे शालेय पोषण आहार कामगारास शासकिय सेवेत सामावून घ्या, नाही तर 26 हजार रूपयेदरमहा मानधन द्या, इंधन बिल त्याच्या खात्यावर अदा करण्यात यावे, शासकीय करारनामा रद्द करावा, शालेय व्यवस्थापन समिती बरखास्त करावी, शालेय पोषण आहार कामगारास दिवाळी बोनस द्या व वर्षातून दोन ड्रेस द्या. शालेय पोषण आहार कामगारास गॅस शेगडी द्या व गॅस दुरूस्ती मॅकेनिक नेमावा, शाळा प्रांगण झाडने व झेंडा राखने बंद करावे, केळी, अंडी याचे मानधन शालेय पोषण आहार कामगाराच्या खात्यावर जमा करण्यात यावे यासह अनेक मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना निवेदन देण्य...
Mild earthquake tremors | नांदेड मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के ; नागरिकांनी घाबरून जाऊ नये – जिल्हाधिकारी – NNL

Mild earthquake tremors | नांदेड मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के ; नागरिकांनी घाबरून जाऊ नये – जिल्हाधिकारी – NNL

नांदेड
नांदेड| हिंगोली शहराचा केंद्रबिंदू असणाऱ्या आज सकाळी झालेल्या भूकंपाची रिश्टर स्केलवर 4.5 नोंद झाली आहे. हा अति सौम्य भूकंप असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. दि. 10 जुलै 2024 रोजी नांदेड शहर व नांदेडमधील सर्वच तालुक्यातून सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ व भूकंप संदर्भात अभ्यास करणाऱ्या भूकंपशास्त्र केंद्रीय विभागाकडून अधिक अभ्यास केला जात आहे. भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठ...
error: Content is protected !!