Free training for disabled | दिव्यांगानो मोफत संगणकिय व व्यावसायिक प्रशिक्षणाचा लाभ घ्या – NNL
नांदेड| दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. या प्रशिक्षणासाठी गरजू दिव्यांगानी प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन मिरज शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे अधिक्षक यांनी केले आहे.
प्रवेशासाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत
अभ्यासक्रमाचे नाव, शैक्षणिक पात्रता- सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथएम.एस. ऑफिस (संगणक कोर्स) किमान इयत्ता 8 वी पास, मोटार ॲन्ड आमेंचर रिवायडींग, सबमसिंबल पंप सिंगलफेज, (इलेक्ट्रीक कोर्स) किमान इयत्ता 9 वी पास. वय 16 ते 40 वर्षे, प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष, फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो.
सोई व सवलती- प...









