HomeनांदेडMild earthquake tremors | नांदेड मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के ; नागरिकांनी घाबरून...

Mild earthquake tremors | नांदेड मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के ; नागरिकांनी घाबरून जाऊ नये – जिल्हाधिकारी – NNL

नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त

नांदेड| हिंगोली शहराचा केंद्रबिंदू असणाऱ्या आज सकाळी झालेल्या भूकंपाची रिश्टर स्केलवर 4.5 नोंद झाली आहे. हा अति सौम्य भूकंप असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

दि. 10 जुलै 2024 रोजी नांदेड शहर व नांदेडमधील सर्वच तालुक्यातून सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ व भूकंप संदर्भात अभ्यास करणाऱ्या भूकंपशास्त्र केंद्रीय विभागाकडून अधिक अभ्यास केला जात आहे.

भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत, असे आवाहन अभिजीत राऊत यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments