Sunday, July 5

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Work with honesty : प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शकतेने कार्य करा : पालकमंत्री अतुल सावे

Work with honesty : प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शकतेने कार्य करा : पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| राज्य शासनाने जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत आज नांदेड जिल्ह्यात अनुकंपा व एमपीएससी मार्फत नियुक्त 378 उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. शासकीय सेवेत नियुक्त उमेदवारांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शकतेने कार्य करुन आपल्या कुटूंबाचा अभिमान, जिल्ह्याचा गौरव आणि राज्याचा सन्मान वाढवावा, अशी अपेक्षा राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी विविध विभागात नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. आज कुसूम सभागृहात अनुकंपासह एमपीएससीच्या 21 उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. उर्वरित उमेदवारांना संबंधित विभागाच्यावतीने आदेशाचे वितरण यावेळी...
Chief Minister Devendra Fadnavis : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या नामकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या नामकरणासाठीही लवकरच मान्यता मिळणार असल्याची  माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विमानतळाला  दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत राज्य शासनाचा इरादा बदललेला नाही आणि केंद्र शासनाचा देखील वेगळा विचार नाही. असे स्पष्टपणे नमूद करून  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ' केंद्र शासनाने विमानतळ बांधकामाला परवानगी देताना ' नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' अशा नावाने पूर्वी परवानगी दिली होती, त्यामध्ये नामविस्तार होऊन आता "लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमा...
Durga Mata Daud : हिमायतनगरात दुर्गामाता दौडीचा भव्य समारोप; पुष्पवृष्टीने स्वागत

Durga Mata Daud : हिमायतनगरात दुर्गामाता दौडीचा भव्य समारोप; पुष्पवृष्टीने स्वागत

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर (अनिल मादसवार) शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित श्री दुर्गामाता दौडचा आज विजयादशमीला थाटात समारोप करण्यात आला. घटस्थापनेपासून सुरू झालेली ही दौड सकाळी ५ वाजता कालिंका मंदिरापासून निघाली व शहरातील मुख्य रस्त्याने भव्य शोभायात्रा काढून परत मंदिराजवळ आली. दौडीदरम्यान ठिकठिकाणच्या चौकात महिला मंडळींनी भगव्या ध्वजाची आरती पूजन करून पुष्पवृष्टीतून दौडीच स्वागत केले. त्यामुळे संपूर्ण शहरात हिंदू संस्कृतीचे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. या दौडीचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य जनतेच्या मनात जागवणे तसेच देव–देश–धर्माची प्रेरणा युवकांमध्ये निर्माण करणे हा होता. समारोप शोभायात्रा दौडीत चिमुकल्यांच्या माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती समभाजी महाराजांची...
Chief Minister Devendra Fadnavis : पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी, असे निर्देश बँकाना दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकरी वर्ग सध्या अडचणीत आहे. हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळ, डाळी व आवश्यक वस्तूंचा संच वितरित करण्यात येत आहे. विहीर खचणे, शेतजमीन खरडून जाणे, यावर केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन, झालेल्या नुकसानीवरही राज्य शासन स्वतंत्र मदत करणार आहे. नुकसानीचे पंचनामे येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्र शासन...
Yellow alert issued : नांदेड जिल्ह्यासाठी ०१ ते ०४ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Yellow alert issued : नांदेड जिल्ह्यासाठी ०१ ते ०४ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १३:२२ वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ०१ ते ०४ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक ०१ ते ०४ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. या गोष्टी करा - विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घ...
Question mark on contractor : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची अचानक पाहणी ; रेल्वे स्थानक ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह

Question mark on contractor : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची अचानक पाहणी ; रेल्वे स्थानक ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र, हिंगोली
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर (MP Nagesh Patil Ashtikar's surprise inspection) यांनी हिमायतनगर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या अमृत भारत योजनेतील तब्बल 42 कोटी रुपयांच्या कामाची बुधवार दिनांक 01 ऑकटोबर रोजी अचानक भेट देऊन पाहणी केली. काही दिवसांपूर्वी स्थानकाच्या कामात थातूरमातूर व अंदाजपत्रकातील गंभीर अनियमितता होत असल्याचे वृत्त नांदेड न्यूज लाइव्हने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन खासदारांनी आज थेट पाहणी केली असता अनेक उणीवा उघड झाल्या. बुधवारी दुपारी 2.30 वाजता हिमायतनगर रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणीत केली असता दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेले सिमेंट काँक्रीट फोडून पुन्हा निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. लोखंडी गजाळी व साहित्यात कमी दर्जा दिसून आला. कोरोना काळापासून सुरू असलेले शेडचे काम अद्याप अपूर्ण असून, इमारतींचे नूतनीकरण फक्त जुनी भिंत...
pilgrimage site category ‘B’ : तिर्थक्षेत्र वर्ग ‘ब’ च्या मान्यतेसाठी मा. आमदार हंबर्डे यांचे यशस्वी प्रयत्न

pilgrimage site category ‘B’ : तिर्थक्षेत्र वर्ग ‘ब’ च्या मान्यतेसाठी मा. आमदार हंबर्डे यांचे यशस्वी प्रयत्न

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड| महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम बळीरामपूर नांदेड येथे महामानव श्रीसंत रोहिदास महाराजांच्या मंदिराची इ.स. 1983 मध्ये रितसरपणे स्थापना करण्यात आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना. श्री अशोकरावजी चव्हाण, व तत्कालीन पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय व खार जमीन तथा पालकमंत्री नांदेड चे रविशेठ पाटील यांचे अध्यक्षतेखाली दि. 12 ऑगस्ट 2009 रोजी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. सदरील बैठकीत शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मा.श्री भास्कररावदादा पाटील खतगांवकर खासदार नांदेड यांच्या केवळ पुढाकाराने श्री संत रोहिदास महाराज मंदिर ट्रस्ट बळीरामपूर ता.जि. नांदेड यास तिर्थक्षेत्र ‘क’ चा दर्जा देण्यात आला. ज्यासाठी इ.स. 1990 पासून सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले. त्यापूर्वी दि. 3 नोव्हेंबर 2008 रोजी आदरणीय श्रीमती प्र...
BSP to hold : १ आक्टोबर रोजी बसपाचे नांदेडला तीव्र धरणे आंदोलन

BSP to hold : १ आक्टोबर रोजी बसपाचे नांदेडला तीव्र धरणे आंदोलन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अणेक गावात तसेच नांदेड शहरात मालमत्ता आणि जीवीत नुकसान झाले. पण अद्यापही आर्थिक मदत वाटप करण्याची दखल मुद्दामहून शासन प्रशासनाने घेतली नाही, यामुळे १ आक्टोबर बुधवारी सकाळी ११ वाजता पासून दिवसभर बहुजन समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन (BSP to hold intense sit-in protest) मराठवाडा प्रभारी मनीष कावळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यासंबंधी अधिक माहिती अशीकी, पावसामुळे जनतेचे अतोनात नुकसान झाले.कुटूंबे उघड्यावर पडली.घराघरात पाणी शिरले.साहित्य वाहून गेले, व्यक्ती दागावल्या .जनावरे मृत्युमुखी पडली.शेतीचे अतोनात नुकसान झाले. एवढी मोठी आपत्ती येवूनही शासनाकडून गतवर्षी आणि याही वर्षी नुकसानीची कसलीही मदत दिली नाही. यासाठी हे धरणे आंदोलन असल्याचे...
Demand : नागपूर–मडगांव विशेष रेल्वेगाडीसाठी तृतीय साप्ताहिक सेवा व अतिरिक्त थांबे सुरु करण्याची मागणी

Demand : नागपूर–मडगांव विशेष रेल्वेगाडीसाठी तृतीय साप्ताहिक सेवा व अतिरिक्त थांबे सुरु करण्याची मागणी

नागपूर, नाशिक, महाराष्ट्र
नागपूर| विदर्भ–खान्देश–कोकण प्रांतातील नागरिकांसाठी फळ, फुल व शेतीमालाच्या वाहतुकीस प्राधान्य देण्यासाठी मध्य रेल्वेच्या गणेशोत्सव विशेष रेल्वेगाडी क्र. 01139/40 नागपूर–मडगांवसाठी तृतीय साप्ताहिक कायमस्वरूपी सेवा व चांदुर, मूर्तीजापूर, नांदुरा, बोडवड, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, पेण येथे अतिरिक्त थांबे सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण–सावंतवाडी (रजि.) च्या विदर्भ–खान्देश संपर्क प्रमुख वैभव बहुतूले यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री, पंतप्रधान, रेल्वे बोर्ड अध्यक्ष आणि मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक नागपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यांनी पाठविलेल्या निवेदनात नमूद आहे की, विशेष रेल्वेसेवा सुरु झाल्यास नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, नांदुरा, नाशिक, कोकण प्रांतातील धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना सोप्या प्रवासाची सोय होईल. तसेच फल, फुल व...
Maha Elgar Morcha : एसटीतून आरक्षणासाठी : बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Maha Elgar Morcha : एसटीतून आरक्षणासाठी : बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| हैदराबाद बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज हजारो बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडकला. पारंपारिक वेशभूषा , वाजंत्री यांच्या दाखल झालेल्या हजारो बंजारा बांधवांनी दिलेल्या जय सेवालाल च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. राज्य शासनाने आरक्षण दिले नाही तर हिवाळी अधिवेशनावर आणि मुंबई येथेही विशाल मोर्चा काढू असा इशारा मान्यवरांनी आपल्या मनोगत दिला आहे. जोपर्यंत राज्य सरकार हैदराबाद गॅझेटिअर नुसार एसटी अनुसूचित जमाती प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत बंजारा समाज स्वस्थ बसणार नाही असा एल्गार ही या निमित्ताने पुकारण्यात आला आहे. राज्य सरकारकडे बंजारा समाजाला एसटी तून आरक्षण देण्यासाठी आवश्यक असणारे सर्व पुरावे आहेत. हैदराबाद गॅजेटियर आहे यामध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून उल्लेख आहे . 10 जानेवारी 1950 सी प...
error: Content is protected !!