नांदेड

जल जीवन मिशन योजनेच्या कामा मुळे दाहा फुटाच्या रस्त्यांची झाली पाऊलवाट -NNL

गुंडवळ ग्रां.प.चा अजब कारभार संबंधित टक्केवारीत मस्त

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। पाणीटंचाईवर मात करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनेचा राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यभर कामांचा शुभारंभ केला, त्या अंतर्गत गुंडवळ येथे हि काम करण्यात आले.

दलीत वस्ती मध्ये असलेला दहा फुटाचा सीमेंट रस्ता फोडून पाईप टाकण्यात आले. परंतु संबंधित ठेकेदाराने फोडलेला रस्ता सपाट न करता मोठ- मोठे दगड ठेवल्याने हा रस्ता केवळ पायवाट झाला असून साधी बैलगाडी हि जात नसल्याने गावक-याना अडचनीचा सामना करावा लागत आहे. ह्या कडे संबंधित टक्केवारी मुळे दुर्लक्ष करीत असल्याचा गावकरीचा आरोप आहे.

तालुक्यात अनेक गावात जलजिवन मिशनअंतर्गत पाण्याची टाकी व पाईप लाईनचे काम करण्यात आले. पाईप लाईनचे काम करतांना लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सिमेंटचे रस्ते संबधित कंत्राटदाराने फोडले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना त्या फुटलेल्या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. माहूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गुंडवळ येथे जलजीवन मिशनतंर्गत पाण्याची टाकीचे बांधकाम व पाईप लाईनचे काम सुरु करण्यात आले. पाण्याच्या पाईप लाईनसाठी गावातील अनेक गल्लीतील सिमेंट रस्ते संबधित कंत्राटदाराने फोडले.

फुटलेल्या सिमेंट रस्त्यावरुन सांडपाणी वाहते असून ह्यामुळे पावसाळ्यात साथ रोग पसरण्याची शक्यता आहे, रस्त्याकडे ग्रामसेवक तथा पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने फोडलेले रस्ते ग्राम पंचायतने संबधित कंत्राटदाराकडुना किमान माती मुरूम टाकून सपाट करुन घेणे बंधनकारक होते. मात्र ग्रामसेवक तथा पदाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्या फोडलेल्या नाली मुधुन निघालेले दगड पसरवुन कंत्राटदार मोकळे झाले आहे. आता त्या फुटलेल्या सिमेंट रस्त्यावरुन गावात सांडपाणी वाहत आहे. शासनाच्या विविध योजनेच्या निधीतील लाखो रुपये खर्च करून गावात सिमेंट रस्ते बांधण्यात आले. मात्र पाईप लाईनसाठी ते कंत्राटदाराने फोडल्याने त्याचा त्रास गावकऱ्यांना सोसावा लागत आहे. गुंडवळ येथे ग्रा. पं. च्या गलथन कारभारामुळे गावातील नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button