Thursday, May 14

सोशल वर्क

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Venkatesh Chaudhary ; व्यंकटेश चौधरी यांचे विक्रमी रक्तदान : २८ वर्षात केले तब्बल ५४ वेळा रक्तदान – NNL

Venkatesh Chaudhary ; व्यंकटेश चौधरी यांचे विक्रमी रक्तदान : २८ वर्षात केले तब्बल ५४ वेळा रक्तदान – NNL

Blog, सोशल वर्क
नांदेड | येथील प्रसिद्ध कवी, लेखक, निवेदक शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी आजवर ५३ वेळा रक्तदान केले आहे. २५ ऑगस्ट रोजी ते वयाच्या ५८व्या वर्षात पदार्पण करत असून जन्मदिवसाच्या निमित्ताने ते विक्रमी म्हणजे ५४ वे रक्तदान करणार आहेत. काही माणसांना दानाचं वेड असतं म्हणतात. इतरांच्या जीवनामध्ये उजेड पेरणं हा अशा अवलियाचा छंदच असतो जणू. १९९६ साली त्यांनी पहिल्यांदा मित्राच्या मुलीसाठी रूबी हॉस्पिटलमध्ये रक्तदान केले होते. तिथून त्यांची रक्तदानाची चळवळ सुरू झाली. पहिले दहा अकरा वर्षे त्यांनी वर्षातून चार वेळा रक्तदान केले. मग त्यासाठी त्यांना कोणताही मुहूर्त नसायचा. स्वतःचा वाढदिवस, लेकरांचा वाढदिवस, मित्रांचा वाढदिवस, देशाचा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, थोर नेत्यांचे जन्मदिवस इतकेच नाही तर तीन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर रस्त्यात कुठे रक्तदान शिबिर दिसले की तिथेही त्यांनी रक...
जिल्हाधिकारी कार्यालया समोर डीवायएफ आणि माकपच्या वतीने शहिद राजगुरू यांची जयंती साजरी -NNL

जिल्हाधिकारी कार्यालया समोर डीवायएफ आणि माकपच्या वतीने शहिद राजगुरू यांची जयंती साजरी -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। २४ ऑगस्ट हा क्रांतिकारक शहीद शिवराम हरी राजगुरू यांचा जन्मदिवस.त्यांची जयंती डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदेड तालुका कमिटीच्या वतीने उपोषणाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि.२४ रोजी साजरी करण्यात आली. शहीद राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड येथे झाला असून ते देशासाठी हसत हसत बलिदान देणारे महाराष्ट्रातील एकमेव क्रांतिकारक आहेत. ते शहीद भगतसिंग यांच्या क्रांतिकारी आंदोलनाचे प्रमुख क्रांतिकारक होते. त्यांची २४ ऑगस्ट रोजी जयंती. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय येथे शहीद भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रांतिकारी घोषणा देऊन शहिदांच्या जीवनावर विचार मांडण्यात आले. माकप,सीटू,जमसं आणि डीवायएफआय चे मागील २०० पेक्षा अधिक दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर विव...
युगकवी वामन दादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांचा उद्या संयुक्त जयंती सोहळा-NNL

युगकवी वामन दादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांचा उद्या संयुक्त जयंती सोहळा-NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। महाकवी वामनदादा कर्डक यांचा १९वा आणि आंबेडकरी कवी गायक प्रतापसिंग बोदडे यांचा संयुक्त जयंती सोहळा आज दि.२४ ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना "तुफानातले दिवे" हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून नामवंत गायकांचा गीत गायन कार्यक्रम या प्रसंगी ऐकावंयास मिळणार आहे. शहरातील कुसुम सभागृहामध्ये दुपारी ४ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फारूक अहमद राहणार आहेत. या जयंती सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एम. सायलू अण्णा म्हैसेकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष इंजी. प्रशांत इंगोले, मुख्य संयोजक संजय निवडंगे आणि निमंत्रक डॉ. विजय कांबळे यांनी दिली आहे. 'स्टार प्रवाह फेम' अंजली गडपाळे या कार्यक्रमाचे आकर्षण राहणार आहे. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त ...
traffic routes  ; शहरातील वाहतुक मार्गात बदल – NNL

traffic routes ; शहरातील वाहतुक मार्गात बदल – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड |  नांदेड शहरात मामा चौक, मैदान जुना कौठा, नांदेड येथे 23 ते 29 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये पंडीत प्रदिप मिश्रा (सिहोरवाले) यांचे उपस्थितीत शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवमहापुराण कथा कार्यक्रमास जिल्ह्यातील व परिसरातील भाविक मोठया प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कालावधीत शहरात व परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना व इतर रहदारीस अडथळा होणार नाही यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये 23 ते 29 ऑगस्ट 2024 पर्यत सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यत वाहतुकीच्या नियमाबाबत पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे. शिवमहापुराण कथा कार्यक्रमासाठी बाहेरुन येणारे वाहतुकीस बंद असलेले मार्ग कथा कार्यक्रमासाठी परभणी-वसमत-पुर्ण...
साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त राहुल नगर वाघाळा येथे विविध कार्यक्रम -NNL

साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त राहुल नगर वाघाळा येथे विविध कार्यक्रम -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड। साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्ताने शाहुनगर, राहुल नगर, वाघाळा साठे नगर, नविन नांदेड हाडको येथे २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ ध्वजारोहण, बालाजी पाटील पुयड पुणेगावकर यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी फारुक अहेमद ,व मान्यवरांच्यी उपस्थिती राहणार असून सायंकाळी ६ वाजता गायिका भक्ती भारती हिंगोली, पुजा गायकवाड,शाहीर व्यंकटी सोनटक्के यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सोहळ्याला समाज भुषण प्रा.रामचंद भरांडे, रावसाहेब पवार यांच्यी तर संजय पाटील पोगरे, सौ.बेबीताई जनार्धन गोपिले माजी नगरसेविका. वैजनाथ देशमुख, पप्पू गायकवाड ,आनंदा सोनकांबळ, माधव डोपंले ॲड.आनंदा सुर्यवशी, हरिशचंद्र एकनाथ गोपले सेवानिवृत्त सैनिक, दुभाष आत...
किनवट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित जागेवर बसविणे करिता उपोषण -NNL

किनवट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित जागेवर बसविणे करिता उपोषण -NNL

सोशल वर्क, नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा महाराजांच्या राज्याभिषेक दिनी म्हणजेच 6 जून 2023 रोजी ढोल ताशाच्या मिरवणुकीसह किनवट शहरात आणण्यात आला. पण 14 महिने उलटून गेले तरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीच्या प्रक्रियेला नगरपरिषद किनवटला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. प्रशासनाची परवानगी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्वरित पुतळा बसविण्यात यावा या मागणीसाठी. गजानन कोल्हे मा. उपसभापती पंचायत समिती किनवट, शाम रावसाहेब मगर रा.आंदबोरी (चि.) ता.किनवट, चंद्रकांत प्रकाश साळवे रा. मांडवा (कि.) ता. किनवट हे ज्येष्ठ मार्गदर्शक वैजनाथ करपुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद किनवट समोर आमरण उपोषणास बसले आहे. नगरपरिषद किनवटच्या अग्निशमन कार्यालयामध्ये बंदिस्त करून ठेवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित ठिकाणी बसविण्यात यावा यासाठी अनेक दिवसापासून शिवप्रेमी ...
गावातील स्वयंसेवकाच्या व मुलांच्या सहकार्याने भिंती झाल्या बोलक्या -NNL

गावातील स्वयंसेवकाच्या व मुलांच्या सहकार्याने भिंती झाल्या बोलक्या -NNL

नांदेड, सोशल वर्क
किनवट, परमेश्वर पेशवे। तालुक्यातील निराला तांडा या गावात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत जिल्हा परिषद शाळेमध्ये व गावामध्ये सुरू असलेले आमचे गाव उपक्रम राबविला जात आहे. गावातील सर्व मुलांना वाचन व गणिताच्या मूलभूत क्षमता प्राप्त झाल्या पाहिजे. गावातील सर्व घटक एका व्यासपीठावर येऊन गावामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी प्रथम संस्था गावातील सर्व मुलांसोबत हे उद्दिष्टे घेऊन काम करत आहे. यासाठी गावातील सरपंच आकाश राठोड व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश राठोड आणि मुख्याध्यापक शिरगुरवार सर व सर्व शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक आणि माता पालकांचे याकडे लक्ष आहे. तसेच प्रतिष्ठित नागरिक व समाजसेवक सुद्धा गावात सुरू असलेल्या आमचे गाव उपक्रमाला सहकार्य करत आहे. त्या अनुषंगाने निराला तांडा गावामध्ये सरपंचांच्या पुढाकाराने व स्वयंसेवकाच्या सहकाऱ्यांनी गावामध्ये अक्षर...
कर्तव्यदक्ष मनपा आयुक्तांनी घेतली प्रलंबीत कामाची दखल

कर्तव्यदक्ष मनपा आयुक्तांनी घेतली प्रलंबीत कामाची दखल

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड। नवीन नांदेड भागातील पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्ट्रीट लाईट व रस्ते यासह मुलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित कामे चालू करण्यासाठी व वेळोवेळी निवेदन देऊन होत असलेले मनपा प्रशासनाने दुर्लक्ष व सातत्याने पाठपुरावा करून अखेर कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या मुळे अनेक कामे मार्गी लागण्यात यश आले आहे. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी नांदेड शहराचा विकास आराखडा तयार करून शेकडो कोटी रुपयांचा निधी नांदेड शहराच्या विकासासाठी आणला होता, मनपा प्रशासनाने टेंडर प्रक्रिया पूर्ण करून संबंधीत गुतेदार एजन्सी ला कार्यारंभ आदेश दिले होते. नेत्यांच्या हस्ते गाजावाजा करत उद्घाटनाचे नारळही फोडण्यात आले होते परंतु अधिकारी आणि गुतेदार मनमानी कारभारामुळे ही विकास कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत परिणामी विकास आराखडा काग दावरच राहीला, माजी नगरसेविका सौ. व...
Schedule caste/tribe classification and creamy layer should not be applied : अनुसूचित जाती/जमातीचे वर्गीकरण व क्रिमीलेअर लागू करू नये -NNL

Schedule caste/tribe classification and creamy layer should not be applied : अनुसूचित जाती/जमातीचे वर्गीकरण व क्रिमीलेअर लागू करू नये -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| सर्वोच्च न्यायालयाने दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी संविधानातील अनुसूचित जाती/जमातीच्या आरक्षणातील मूळ तरतुदीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वर्गीकरण करणे व क्रिमीलेअर लागू करणे असा संविधान विरोधी निर्णय दिला. वास्तविक संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूळ हेतू अति मागासवर्गीयांचा देशाच्या विकासात प्रत्यक्ष सहभाग व्हावा, त्यांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण देऊन त्यांना समानतेच्या मुख्य प्रवाहात आणावे, त्यासाठी त्यांनी 59 जात समुहाचा एक अनुसूचित जात प्रवर्ग, 43 जात समुहाचा अनुसूचित जमाती प्रवर्ग निर्माण केला. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वांना समानतेची संधी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच जाती-जातीमधील भेदभाव कमी व्हावा हा होता. परंतु दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी मा. उच्च न्यायालयाने संविधान निर्माते यांच्या उद्देशास हरताळ फासला असून अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गात उपवर्ग तयार करून जाती...
Nagnath Aylan ; नागरीकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे,पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने – NNL

Nagnath Aylan ; नागरीकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे,पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने – NNL

Blog, सोशल वर्क
नवीन नांदेड| नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पोलिस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी नवीन नांदेड़ सिडको येथील महावीर चौक परिसरातील नटराज गणेश मंदिर येथे शांतता समिती बैठकीत केले. सिडको परिसरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता रमाई आंबेडकर चौकात झालेल्या आईस्क्रीम विक्रेता यांच्या वर व हडको भागात झालेला दुध विक्रेत्यांवर तलवार हल्ला,या घटनेने परिसरात भयभीत वातावरण झाले होते,तात्काळ ग्रामीण पोलीसांनी आरोपीचा शोध घेऊन माळाकौठा परिसरात हवेत गोळीबार करून तिन आरोपींना तलवारी व चार चाकी वाहनांसह ताब्यात घेतले . घटनेचा अनुषंगाने 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी नटराज गणेश मंदिर सिडको परिसरात शांतता समीती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पोलिस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी नागरिक याना मार्गदर्शन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे,गुन्हेगाराचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी...
error: Content is protected !!