Thursday, May 14

सोशल वर्क

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Collector Abhijit Raut : भटक्या व विमुक्तांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग महत्वाचा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

Collector Abhijit Raut : भटक्या व विमुक्तांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग महत्वाचा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| रोजच्या जगण्यासाठी हातावर पोट घेवून संघर्ष करणाऱ्या भटक्या विमुक्तांना शासकीय योजनाचा लाभ मिळावा, त्यांना रहिवासी प्रमाणपत्रा सोबतच इतर सर्व प्रमाणपत्र मिळावेत यासाठी शासन- प्रशासन प्रयत्नशिल आहे. तसेच भटक्या विमुक्तांना शासकीय योजनांचा लाभ मिळून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग खूप महत्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आज महाराजस्व अभियानातर्गंत भटक्या व विमुक्त जातीतील लोकांना जातीचे प्रमाणपत्र, रहीवासी व शिधापत्रिका वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते तहसिल कार्यालयात झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, भटके व विमुक्त जाती जमातीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष देविदास हादवे, पारंपारिक वेशभुषा परिधान केलेले वासुदेव, गारुडी, मसणजोगी, जोशी, गोंधळी, पारधी, भोई समाजातील नागरिक आदीची उपस्थित...
Shivpuran Katha : नांदेडच्या शिवपुराण कथा कार्यक्रमात हिमायतनगरच्या महिलांचे श्रमदान -NNL

Shivpuran Katha : नांदेडच्या शिवपुराण कथा कार्यक्रमात हिमायतनगरच्या महिलांचे श्रमदान -NNL

सोशल वर्क, नांदेड
हिमायतनगर| नांदेड येथे प्रसिद्ध शिवपुराण कथाकार श्री प्रदिप मिश्रा यांच्या अमोघ वानीतून शिवपुराण कथा पारायण सोहळा संपन्न झाला. कथा पारायणाच्या सप्ताहात महाराष्ट्र राज्यासह परराज्यातील भाविक येथे दाखल झाले होते. बाहेरून येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या करीता अन्नदान, भोजनदान यासाठी अनेक स्वयंसेवी संघटना, धार्मिक नागरीक पुढे सरसावले आहेत. मानव सेवा हिच इश्वर सेवा मानून श्रमदानासाठी अनेक भाविक भक्त पुढे येत आहेत. त्यात हिमायतनगर येथील महिला भाविक सेवेसाठी तिथे दाखल होवून सेवेच्या कामात गुंतल्या होत्या. या धार्मिक कार्यात हिमायतनगर येथील सौ. सुनंदा दासेवार, रेखा मादसवार, लक्ष्मीबाई गुंडेवार, यशोदा मादसवार, रमाबाई मादसवार, प्रणिता रामदिनवार, निर्मला रच्चेवार, संगीता रच्चेवार, विद्या मारूडवार, रेखा दमकोंडवार, रंजना दासरवार, सुलोचना मारूडवार, लतिका दमकोंडवार, प्रेमला मारूडवार, ज्योती शर्मा...
ग्रामपंचायतीतील 15 लाखांपर्यंतची कामे आता कंत्राटदारामार्फत होणार -NNL

ग्रामपंचायतीतील 15 लाखांपर्यंतची कामे आता कंत्राटदारामार्फत होणार -NNL

नांदेड, सोशल वर्क
किनवट, परमेश्वर पेशवे। आतापर्यंत 15 लाखांपर्यंतची कामे विनानिविदा करण्यास ग्रामपंचायतींना परवानगी असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मान्यताप्राप्त नोंदणी असलेले सुशिक्षित बेरोजगार अभियंता, कंत्राटदार, मजूर सहकारी संस्थांना या कामांपासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे, त्यांनी उच्च न्यायालयात याविषयी दाद मागितली होती. त्या पार्श्वभूमीवर आता यापुढे 15 लाखांपर्यंतची कामेसुद्धा मान्यताप्राप्त कंत्राटदारांमार्फत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय म्हणजे सुशिक्षित बेरोजगार अभियंते, लहान कंत्राटदारांसाठी फायदेशीर असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे कंत्राटदार संघटनेने न्यायालयात धाव घेतल्यानंतर शासनाने हा निर्णय घेतला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून 12 नोव्हेंबर 2021 च्या निर्णयानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीला पंधराव्या वित्त आयोगांतर्गत शासननिधीतून 15 लाखांपर्यंतची सर्व कामे ...
Shiva Mahapurana story : शिव महापुराण कथेमध्ये धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून भाऊचा डबा तसेच छत्र्या वाटप -NNL

Shiva Mahapurana story : शिव महापुराण कथेमध्ये धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून भाऊचा डबा तसेच छत्र्या वाटप -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| नांदेडच्या इतिहासात अभूतपूर्व ठरलेल्या आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेमध्ये धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून बाहेरगावाहून मुक्कामासाठी थांबलेल्या शेकडो भाविकांना भाऊचा डबा तसेच पाचशे छत्र्या वाटप करण्यात आल्या. या कथेसाठी दररोज लाखो भाविकांनी हजेरी लावली. शेवटच्या दिवशी तर पाच लाखापेक्षा जास्त भक्तांच्या उपस्थितीचा विक्रम झाला. दररोज रात्री दहा हजारापेक्षा जास्त शिवभक्त पेंडॉलमध्येच मुक्काम करत होते. त्या गर्दीत शिवभक्तांना डबे वाटण्यासाठी दिलीप ठाकूर, सुरेश लोट, सुरेश शर्मा, शिवा लोट, राजेशसिंह ठाकूर,शिवचरण लोट, प्रसाद जोशी, विलास वाडेकर यांनी अत्यंत परिश्रम घेतले. या सात दिवसात दिलीप ठाकूर यांच्या आवाहनानुसार अनेकांनी वरण भात भाजी पोळी असलेले भोजनाचे डबे दिले.२४ ऑगस्ट रोजी अन्नदान करणाऱ्यांमध्ये शिवप्रसाद राठी,ॲड. दिलीप ठाकूर ,श्...
Sardar Ravneet Singh Bittu  ; रेल राज्यमंत्री सरदार रवनीत सिंघ बिट्टूजी याना गुरु का खालसा संस्थेसह भाविकांचे निवेदन  – NNL

Sardar Ravneet Singh Bittu ; रेल राज्यमंत्री सरदार रवनीत सिंघ बिट्टूजी याना गुरु का खालसा संस्थेसह भाविकांचे निवेदन – NNL

Blog, नांदेड, सोशल वर्क
नांदेड| हजुर साहिब नांदेड येथून ऋषिकेशसाठी विशेष ट्रेन सुरू करण्यात यावी. ज्यामुळे गुरुद्वारा श्री हेमकुंड साहेब भाविकांना पाच धाम यात्रेचे दर्शन करण्याचे सोईचे होईल. या मार्गावर एकही ट्रेन नाही ह्या ट्रेनचा मार्ग दिल्ली, मेरठ, बिजनौर, हरिद्वार ,ऋषिकेश , देहरादून, श्री हेमकुंड साहेब, केदारनाथ ,बद्रीनाथ ,यमुनोत्री ,गंगोत्री, असा आहे. या शहरांना जाण्या येण्यासाठी ट्रेनचा लाभ मिळेल आणि उत्तर पासून दक्षिण पर्यंत एक संबंध प्रस्थापित होईल. हिंदू धर्मात पाच धामाचे देवभूमी म्हणण्यात येते सर्व भक्तांची ही इच्छा असते की पाच धामाला दर्शन करून आपला जीवन सफल करावे. देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी गोबिंद घाट ते हेमकुंड साहेब पर्यंत दर्शनासाठी रोपवे चे काम सुरू केले आहे. ज्यामुळे भाविकांना दर्शन करण्यासाठी सोपे जाईल शीख आणि हिंदू बांधवांच्या धार्मिक भ...
Biloli-Degalur ; बिलोली-देगलूर तालुक्यातील आढावा बैठका तुर्त लांबणीवर – NNL

Biloli-Degalur ; बिलोली-देगलूर तालुक्यातील आढावा बैठका तुर्त लांबणीवर – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड | बिलोली व देगलूर तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी 30 ऑगस्ट रोजी बिलोली तसेचदेगलूर येथे आयोजित आढावा बैठका (जनता दरबार) काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या असून 30 व 31 ऑगस्ट रोजीचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे. बिलोली-देगलूर तालुक्यातील विकास कामाबाबतचा आढावा घेण्यासाठी खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बिलोली आणि देगलूर येथे दुपारी 3 वाजता विकास कार्य आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव यादोन्ही बैठका तुर्त पुढे ढकलण्यात आल्या आहेत.बिलोली व देगलूर तालुक्यातील भाजपा-महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे....
हडको येथील सर्वपक्षीय शोकसभेत स्व.वसंतराव चव्हाण यांना श्रध्दांजली -NNL

हडको येथील सर्वपक्षीय शोकसभेत स्व.वसंतराव चव्हाण यांना श्रध्दांजली -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| नांदेडचे लोकप्रिय स्व. खा.वसंतरावजी चव्हाण यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आदींच्या उपस्थितीत सोमवार (दि. २६) रोजी हडको बसस्थानक येथे शोकसभा आयोजन करण्यात आले होती,यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, आदी राजकीय पक्षासह सामाजीक, शैक्षणिक, पत्रकारीता, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे सोमवार दि. २६ रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले,दरम्यान हडको बसस्थानक येथे सिडको वाघाळा ब्लाँक काँग्रेस कमिटीचे प्रभारी बापूसाहेब पाटील यांनी सोमवार (दि.२६) रोजी सर्वपक्षीय अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, नांदेड भाजयुमो माजी शहर अध्यक्ष संजय पाटील घोगरे, भारतीय कामगार...
सामाजीक बांधीलकी जोपासत पत्रकार धमने तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रुग्णांना फळे वाटप; केलं वृक्षारोपण -NNL

सामाजीक बांधीलकी जोपासत पत्रकार धमने तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रुग्णांना फळे वाटप; केलं वृक्षारोपण -NNL

सोशल वर्क, नांदेड
नवीन नांदेड| वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनाठायी खर्चाला फाटा देत सामाजीक बांधीलकी जोपासत ज्या समाजात आपण जन्म घेतो त्या सामाजाचे काही देणे लागतो ही भावना आपल्या डोळया समोर ठेऊन गेल्या पाच वर्षापासून आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्हाईस ऑफ मीडीया पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तथा गोपाळचावडी ग्राम पंचायत सदस्य प्र व संतोष कन्या प्राथमीक शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अनिल धमने यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजीक बांधीलकी जोपासत वाघाळा येथिल संतोष कन्या प्राथमिक शाळा येथे पहिली ते पाचवी पर्यंत च्या विद्यार्थी यांना प्रत्येकी एक वही एक पेन व एक सुचित्र बालमित्र उजळणी पुस्तक वाटप तर गोपाळचावडी येथील जिल्हा परिषद शाळा येथे पहीली ते चौथी पर्यंत च्या विद्यार्थी यांना प्रत्येकी वही पेन सुचित्र बालमित्र पुस्तक प्रत्येक विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपन तर प्राथ...
श्रावण मासानिमित्त आयोजित शिराळ ऑनलाईन सजावट आणि भव्य वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद -NNL

श्रावण मासानिमित्त आयोजित शिराळ ऑनलाईन सजावट आणि भव्य वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड/हदगाव| श्रावण मासानिमित्त हदगाव तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या नागपंचमी सणातील शिराळ ऑनलाईन सजावट स्पर्धेला माहोलानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तसेच भव्य वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला असून, या दोन्ही स्पर्धेचे बक्षीस वितरण आज हदगाव येथे करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्हा प्रभारी डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर यांच्या वतीने नागपंचमीनिमित्त शिराळ ऑनलाइन सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 21 स्पर्धकांनी भाग नोंदविला असून, त्या स्पर्धकांनी सुंदर अशा प्रकारची सजावट करून आणि विविध गाण्यांचा त्यात समावेश करून तो व्हिडिओ पाठवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तसेच दिनांक १९ रोजी भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्या आले होते. या स्पर्धेसही ९३ स्पर्धकांनी सहभाग घेल्याने दोन वेगवेगळ्...
Annabhau Sathe: शिक्षणाने माणूस तर अण्णाभाऊंच्या साहित्याने समाज घडला – प्रा.डॉ. वैजनाथ अनमुलवाड -NNL

Annabhau Sathe: शिक्षणाने माणूस तर अण्णाभाऊंच्या साहित्याने समाज घडला – प्रा.डॉ. वैजनाथ अनमुलवाड -NNL

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर| शिक्षणाने माणूस घडतो , आणि साहित्याने समाज घडतो. तर साहीत्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य लेखनीने सुसंस्कृत समाज घडला असे मत प्रा.डॉ.वैजनाथ अनमुलवाड (. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा शास्त्र विभाग) यांनी आपले मनोगतातून व्यक्त केले. कंधार तालुक्यातील उस्माननगर येथे दि .२२ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न ,लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी छ.शिवाजीमहाराज, क्रांतीविर उस्ताद लहूजी साळवे , डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .त्यानंतर क्रांतीध्वजाचे ध्वजारोहण उस्माननगर पोलीस स्टेशनचे पोलीस जमादार निल्लप्पा शिवपुजे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जयंती मंडळाकडून मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या प्रथ...
error: Content is protected !!