Thursday, May 14

सोशल वर्क

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Dr. Vaibhav Nakhate : डॉ. नखाते यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव आरोग्यप्रेमी नागरीकांकडुन सत्कार -NNL

Dr. Vaibhav Nakhate : डॉ. नखाते यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव आरोग्यप्रेमी नागरीकांकडुन सत्कार -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| तालुक्यातील सरसम येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी वैभव नखाते यांच्या आरोग्य सेवेची दखल घेत सकाळ माध्यम समुहाने नुकताच एका कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा गौरव करत सन्मान केल्याने डॉ नखाते यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत असुन आरोग्यप्रेमी नागरीकांकडुन त्यांचा सत्कार करण्यात आला. सरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. वैभव नखाते काही वर्षा पासुन आरोग्य सेवा करतात, नौकरी म्हणुन याकडे न पहाता रूग्णांना चांगल मार्गदर्शन करत चांगले उपचार करून पुढील उपचाराचा सल्ला, आरोग्यदायी योजनांचा लाभ कुठुन कसा घ्यायचा हे ही समजुन सांगतात.  लहान असो वा मोठा कुठलाही भेद ते करत नाहीत. त्यांच्या स्वभावामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांचा ओघही वाढलेला आहे. दवाखाण्यात हजर असतांना वेळेच बंधन न ठेवता ते सतत सेवा देतात. त्यांनी केलेल्या उपचारातुन हजारो रूग्ण व्याधीमुक्त झाले आहेत. यामुळे डॉ...
Water in low lying areas : सखल भागात पाणी शिरल्यामुळे अडचणीत असलेल्या शेकडो नागरिकांना लायन्सचा डबा -NNL

Water in low lying areas : सखल भागात पाणी शिरल्यामुळे अडचणीत असलेल्या शेकडो नागरिकांना लायन्सचा डबा -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| अतिवृष्टीमुळे नांदेड शहरातील सखल भागात पाणी शिरल्यामुळे अडचणीत असलेल्या शेकडो नागरिकांना सर्वात आधी धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लायन्सचा डबा पुरविल्यामुळे दिवसभर उपाशी असलेल्या पूरग्रस्तांना दिलासा मिळाला. गोदावरी काठावर असलेल्या नांदेड शहराला पुराने वेढले आहे.अनेक घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे स्थलांतरण करण्यात आले. सोमवारी चूल पेटलेली नसल्यामुळे सर्वजण उपाशी होते.संध्याकाळपर्यंत कोणतीही मदत मिळाली नव्हती. सर्वात आधी लायन्स परिवार मदतीसाठी धावून आला.गुडघ्यावर पाण्यात जाऊन श्रावस्ती नगर, शनी मंदिर परिसर या भागात वरण भात भाजी पोळी व बुंदीचा समावेश असलेले लायन्सचे डबे वाटप करण्यात आले. यासाठी दिलीप ठाकूर, शिवाजीराव पाटील, सुरेश शर्मा, संतोष भारती, विलास वाडेकर, प्रसाद देशपांडे, सुबोध बोंबिलवार, मनीषा अग्रवाल, निशा अग्रवाल यांनी परिश्रम घेतले. पूर संपेपर्यंत ला...
Vamandada Kardak ; महाकवी वामनदादा कर्डक यांचा जयंती सोहळा उत्साहात – NNL

Vamandada Kardak ; महाकवी वामनदादा कर्डक यांचा जयंती सोहळा उत्साहात – NNL

सोशल वर्क, नांदेड
नांदेड | अनु.जाती/जमाती/विजा -भज /इ.मा.व./वि.जाप्र /शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी  संघटना मंत्रालय मुंबई भारत वानखेडे प्रणित शाखा सांस्कृतीक  नांदेड जिल्हाच्या वतीने  महाकवी वामनदादा कर्डक यांचा जयंती सोहळा  दि.३१ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात करण्यात आला असून यावेळी शहरी व ग्रामीण नामवंत कलावंतांना मी भिम क्रांतिचा नारा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.  पीपल्स कॉलेज येथील नरहर कुरुंदकर सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमास धर्मगुरू भदंत पय्यांबोधी थेरो यांची प्रमुख उपस्थिती होती तर उद्घाटक म्हणून संगीता डक यांच्या हस्ते उद्घाटन झाले अध्यक्षस्थानी संघटनेचे महासचिव डॉ उत्तमराव सोनकांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे प्रवक्ता सुभाष लोणे, सांस्कृतिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे,माधव जमदाडे, डॉ विलास भद्रे आदिंची उपस्थिती होती. यावेळी सर्वप्रथम भ.तथागत बुध्द डॉ बाब...
Saint Shiromani Sena Maharaj : हिमायतनगर येथे संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी -NNL

Saint Shiromani Sena Maharaj : हिमायतनगर येथे संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने श्री परमेश्वर मंदिरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी सभागृहात संत सेना महाराजांच्या प्रतिमेला पैशापगार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 31 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका शाखेच्या वतीने श्री परमेश्वर मंदिरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, ओबीसी नेते दिलीप राठोड, शिक्षक सचिन कळसे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेतला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित नाभिक समाज बांधवांना मार्गदर्शन करताना महावीर श...
full rain ; भर पावसात १८ भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिसी व छत्री प्रदान- NNL

full rain ; भर पावसात १८ भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिसी व छत्री प्रदान- NNL

सोशल वर्क, नांदेड
नांदेड| शहरात अतिवृष्टी होत असताना देखील सेवा कार्यात खंड पडू नये म्हणून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी भर पावसात १८ भ्रमिस्टांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे, शंभर रुपयाची बक्षिसी व छत्री देऊन कायापालट केला. जगा वेगळा या उपक्रमाने पाचव्या वर्षात प्रवेश केल्यामुळे दिलीप ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कडाक्याची थंडी असो अथवा मुसळधार पाऊस दिलीप ठाकूर यांचा कायापालट हा उपक्रम कधी रद्द झाला नाही. रविवारच्या रात्रीपासूनच संतत धार सुरू होती. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे कायापालट उपक्रम राबविण्यात येतो.यासाठी खा.अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री ...
Ballipola festival; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत ३७ गावात सोमवारी बैलपोळा सण साजरा होणार -NNL

Ballipola festival; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत ३७ गावात सोमवारी बैलपोळा सण साजरा होणार -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेडl नांदेड ग्रामीण स्टेशन हद्दीत असलेल्या अनेक गावात सोमवारी २ सप्टेंबर रोजी बैलपोळा सण होणार असून पोलीस बंदोबस्त प्रत्येक गावात देण्यात आला असून विष्णुपूरी, धनेगाव, गोपाळचावडी या तिन गावात मंगळवारी बैलपोळा सण साजरा होणार आहे. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जवळपास ३७ गावात सोमवारी २ सप्टेंबर रोजी बैलपोळा सण साजरा होणार, या निमित्ताने उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार, महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड बंदोबस्त साठी गावनिहाय देण्यात आले आहेत अशी माहिती गोपनिय शाखेचे बालाजी दंतापल्ले यांनी दिली आहे....
heavy rains ; संततधार पावसातही म्हाडा काॅलनीतील तुंबणारा नाला केला कचरामुक्त, सुट्टीच्या दिवशीही भर पावसात मनपाच्या सफाई कामगारांची तत्परता – NNL

heavy rains ; संततधार पावसातही म्हाडा काॅलनीतील तुंबणारा नाला केला कचरामुक्त, सुट्टीच्या दिवशीही भर पावसात मनपाच्या सफाई कामगारांची तत्परता – NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेडl संततधार पावसातही म्हाडा काॅलनीतून मधोमध वाहणारा नाला कचरा अडकून तुंबतो,त्यामुळे नाल्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरते, पण रविवारी पहाटेपासूनच पाऊस सुरू झाला. रविवारी सुट्टी असतानाही मनपाचे सफाई कर्मचारी आनंदा पंडित, प्रल्हाद हैबतकर आणि रामा वाघमारे यांनी भरपावसात नवीन कौठा, म्हाडा कॉलनीत नेहमी तुंबणा-या नाल्यातील कचरा काढला आणि पाण्याचा प्रवाह मोकळा करून दिला. एरवी सफाई कामगारांच्या नावाने बोटं मोडली जात असतांना, लोकांच्या घरात पावसाचं पाणी घुसू नये म्हणून या सफाई कामगारांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे, महात्मा बसवेश्वर महाराज पुतळ्याजवळ असलेल्या म्हाडा काॅलनीच्या मधोमध नाला आहे,म्हाडा काॅलनीच्या वरच्या भागातून पावसाच्या पाण्याचा येवा वाढल्याने हलक्या पावसातही कच-यामुळे नाला तुंबतो आणि नाल्याच्या परिसरातील घरांमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान होत असते. या नाल्याची वेळोवेळी...
बाहेरगावाहून आलेल्या एसटीतील महिला प्रवाशांना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी शंभर छत्र्या दिल्या -NNL

बाहेरगावाहून आलेल्या एसटीतील महिला प्रवाशांना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी शंभर छत्र्या दिल्या -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। रविवारी सकाळपासूनच नांदेड शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्याची कल्पना नसल्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या एसटीतील महिला प्रवाशांना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी शंभर छत्र्या दिल्या असून अनपेक्षितपणे मोफत छत्र्या मिळाल्याचे पाहून भिजणाऱ्या महिलांनी समाधान व्यक्त केले. पावसात सर्वजण आराम करत असताना दिलीप ठाकूर यांनी समाजसेवेचा वसा सुरू ठेवत संतोष भारती यांच्यासोबत बसस्थानक गाठले. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नांदेड बस स्थानकावर एसटीतून उतरलेल्या महिला प्रवाशांची तारांबळ उडत होती. सोबत असलेल्या लहान मुलांना भिजण्यापासून वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न महिला करत होत्या. स्वतः जवळचे सामान घेऊन पावसात चालणे त्यांना अवघड होत होते. अशा परिस्थितीत दिलीप ठाकूर हे सर्वांना छत्री देत होते. अनोळखी व्यक्तीकडून छत्री घेण्यास काही भगिनी संकोच करीत होत्या. परंतु दिलीप ठाकूर यांनी त्यांना एका भावाक...
३ सप्टेंबर रोजी नांदेड येथे बंदासिंघ बहादूर मिलाप दीन साजरा करण्यात येणार- के के बावा -NNL

३ सप्टेंबर रोजी नांदेड येथे बंदासिंघ बहादूर मिलाप दीन साजरा करण्यात येणार- के के बावा -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। बाबा बंदा सिंग बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार बावा,संरक्षक मलकीतसिंग दाखा यांच्या पुढाकाराने 3 सप्टेंबर रोजी नांदेड येथे मिलाप दीन साजरा करण्यात येणार आहे. 1708 मध्ये 3 सप्टेंबर रोजी श्री गुरु गोविंदसिंघ जी महाराज आणि बाबा बंदा सिंघ बहादूर यांची नांदेड येथे भेट झाल्याचा दिवस हा मिलाप दीन म्हणून साजरा केला जातो. हा मिलाप दिन साजरा करण्यासाठी लुधियाना एक जत्था नांदेड येथे येणार आहे. बाबा बंदा सिंग बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार बावा यांनी आज येथे माहिती देताना सांगितले की, दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंग जी महाराज आणि बाबा बंदा सिंग बहादूर (माधो दास बैरागी) यांच्यातील ऐतिहासिक भेट ३ सप्टेंबर रोजी सकाळी सचखंड येथे श्री अखंड पाठ साहिबच्या भोगानंतर साजरी करण्यात येणार आहे. थाडी जत्थे, रागी, कवीशर, इतिहासकार यावेळी आपले ...
Golla Golewar Samaj Sangathan ; बाबाराव जरगेवाड यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल गोल्ला गोलेवार समाज संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा कडून जाहीर सत्कार -NNL

Golla Golewar Samaj Sangathan ; बाबाराव जरगेवाड यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल गोल्ला गोलेवार समाज संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा कडून जाहीर सत्कार -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर। गोल्ला गोलेवार समाज संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष व हिमायतनगर गोल्ला गोलेवार समाज संघटणा यांच्या मार्फत दि.31रोजी गोल्ला गोलेवार समाज बांधव बाबाराव जरगेवाड व‌ अभिषेक बकेवाड यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला आहे. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासाठी अनेक जिल्ह्यांत वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन चालू आहेत. याच ओबीसी आंदोलनात हिमायतनगर तालुक्यातील गोल्ला गोलेवार समाज बांधव युवा, तरूण तडफदार,कुशल संघटक व नैतृव गून संपन्न असणारे तरूण बाबाराव जरगेवाड हे हिमायतनगर तालुका ओबीसी अध्यक्ष असुन यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर तालुक्यात अनेक ओबीसी आंदोलन केले आहे. हिमायतनगर तालुक्याच्या ईतिहासात ओबीसी संघटणेच्या माध्यमातून, ओबीसी आरक्षणासाठी हिमायतनगर शहर बंद करणारे बाबाराव जरगेवाड हे एकमेव ओबीसी संघटनेचे अध्यक्ष ठरले आहेत. भोकर येथे ओबीसी योद्धे लक्ष्मनजी हाक्के साहेब यांच्या सभेला नांदेड जिल्ह्यां...
error: Content is protected !!