Thursday, May 14

सोशल वर्क

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Talathi B. T. Shelke – निराधार महिलांचा छळ करणाऱ्या तलाठी बी.टी.शेळकेची हकालपट्टी करा व पीडित दलितांना घरकुल मंजूर करा! – NNL

Talathi B. T. Shelke – निराधार महिलांचा छळ करणाऱ्या तलाठी बी.टी.शेळकेची हकालपट्टी करा व पीडित दलितांना घरकुल मंजूर करा! – NNL

Blog, नांदेड, सोशल वर्क
नांदेड | संजय गांधी निराधार योजनेच्या शहरी विभागात वशिलेबाजीने वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले तलाठी बी.टी.शेळके यांची हकालपट्टी करा आणि मौजे सोमेश्वर ता.जि.नांदेड येथील दलित पीडितांना घरकुल मंजूर करा ह्या मागणीसाठी सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनचे सह सचिव कॉ.जयराज गायकवाड हे मागील तीन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहेत. प्रशासनात जबरदस्त छाप निर्माण करून वशिलेबाजीने अनेक वर्षांपासून संगायो मध्ये तलाठी या पदावर कार्यरत असलेले बी.टी.शेळके हे आर्थिक माया मिळविल्याशिवाय निराधारांना पात्र ठरवीत नाहीत. किंबहुना कुणाच्याही घरी प्रत्यक्षात जात नाहीत आणि पात्र मान्यता देतात. त्यांच्या विरोधात माकप सचिव कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दि.१४ मे आणि ११ जून २०२४ रोजी दोन वेगवेगळ्या लेखी तक्रारी देऊन त्यांची बदली माहूर किंवा किनवट येथे करण्याची मागणी केली होती....
शरद सोनटक्के यांच्या तत्परतेने मनोरुग्ण महिलेची रुग्णालयात तर तिच्या बाळाला केले शिशुगृहात दाखल -NNL

शरद सोनटक्के यांच्या तत्परतेने मनोरुग्ण महिलेची रुग्णालयात तर तिच्या बाळाला केले शिशुगृहात दाखल -NNL

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर, माणिक भिसे| शहरातील डॉक्टर लाईन भागामध्ये सार्वजनिक रस्त्यावर एक मनोरुग्ण महिला गोंधळ घालून तिच्याकडील एका लहान बाळाला मारहाण करत असल्याची माहिती मिळताच वजिराबाद पोलीस कर्मचारी शरद सोनटक्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिथे जाऊन सदर महिलेस ताब्यात घेऊन तिला उपचारासाठी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात तर तिच्या बाळाला शिशुगृहात दाखल केले आहे. सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त शहरात आज सर्वत्र महिलांचा पवित्र सण असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून ये-जा सुरू होती. यातच डॉक्टर लाईन भागात एक महिला गोंधळ घालत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांना सांगण्यात आली. त्यांनी लगलीच कर्तव्यावर दक्ष असलेल्या पोलीस कर्मचारी शरद सोनटक्के यांना व महिला कर्मचाऱ्यांना तिथे पाठवले. पोलिसांनी सदर महिलेस ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली असता ती मनोरुग्ण असल्याचे पोलिसांच्या लक्षात आ...
Protest march at Collectorate : आदिवासी समाजाचा 23 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा -NNL

Protest march at Collectorate : आदिवासी समाजाचा 23 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| सकल आदिवासी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी दि. 23 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संविधानिक संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, विधानसभेचे उपाध्यक्ष आ. नरहरी झिरवाळ, आ. किरण लहामठे, अ.भा. आदिवासी युवा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्कीभाऊ जाधव यांच्या प्रतिमेची अवहेलना करणार्‍या बोगस आदिवासींविरूद्ध अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा, डॉ. राजेंद्र भारूड यांच्या विरूद्ध जळगाव येथे दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा, जातवैधता प्रमाणपत्र समिती किनवटचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथून तात्काळ किनवट जि. नांदेड येथे स्थलांतरित करावे, सर्वोच्च न्यायालयाने 2017 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून राज्यात अधिसंख्य ठरलेल्या 12 हजार 500 पदांची विशेष भरती तात्काळ सुरू करावी, राज्यातील सर्व शासक...
Distribution of bicycles to female students by Rotary : रोटरीतर्फे विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप -NNL

Distribution of bicycles to female students by Rotary : रोटरीतर्फे विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| रोटरी क्लब नांदेड व रोटरी क्लब नंदिग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने डिस्ट्रिक्ट ३१३२ सी.एस. आर. ग्रँड २०२३-२४ अंतर्गत गरजू शाळकरी विद्यार्थिनींना २० सायकलींची वाटप रविवारी (दि. १८) करण्यात आले. रोटरी च्या माजी प्रांतपाल स्वाती हेरकल यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पातून एकूण प्रांत 3132 मध्ये एकूण 1000 सायकली वाटल्या तर नांदेडमधून रोटरी क्लब नांदेड व रोटरी क्लब नंदिग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षण घेतांना विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. शाळेचे अंतर दूर आहे. अशा विद्यार्थिनींना मदत करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब नांदेड व रोटरी क्लब नंदीग्राम यांनी जिल्हा परिषद शाळा दुगाव (ता. बिलोली), जि. प. शाळा पासदगाव, जि.प.शाळा नांदुसा, जि.प.शाळा कवठा या शाळेतील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी दै. ...
women doctors ; कला संचलनालय व महिला डाॅक्टर हत्त्येचा गुरु रविदास समता परिषदेतर्फे जाहिर निषेध – NNL

women doctors ; कला संचलनालय व महिला डाॅक्टर हत्त्येचा गुरु रविदास समता परिषदेतर्फे जाहिर निषेध – NNL

Blog, नांदेड, सोशल वर्क
नांदेड | "बूट पाॅलिश करणारा चांभार !" या विषयावर चित्रकला स्पर्धा घेणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या कला संचलनालयाचा अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेतर्फे जाहिर निषेध करण्यात आला असून याबाबतचे निवेदन शासनास सादर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोमवार दि. १९ ऑगस्ट २०२४ रोजी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे एक निवेदन सादर केले. कला संचलनालयाच्या जातीयवादी अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या कला संचलनालयाच्या वतीने ९ ते १२ वर्ष वयोगटासाठी दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा परिक्षा घेण्यात आली, त्यात "बूट पाॅलिश करणारा चांभार" हा विषय देण्यात आला होता. बालवयात विद्यार्थांमध्ये जातीयवाद रुजविण्याचा हा जातीयवादी...
Laxman Hake  ; नांदेड दक्षिण मध्ये ओबीसी नेते लक्षमण हाके आयलवाड यांच्या निवासस्थानी मुक्काम, आगामी विधानसभा सह अनेक विषयावर चर्चा – NNL

Laxman Hake ; नांदेड दक्षिण मध्ये ओबीसी नेते लक्षमण हाके आयलवाड यांच्या निवासस्थानी मुक्काम, आगामी विधानसभा सह अनेक विषयावर चर्चा – NNL

Blog, नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| ओबीसी नेते लक्षमण हाके यांनी भोकर येथील जाहीर सभा झाल्यानंतर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सिडको परिसरातील मोढा प्रकल्प अंतर्गत असलेल्या नामदेव रायलवाड यांच्या निवासस्थानी भेट देऊन पदाधिकारी सह कार्यकर्ते यांच्याशी आगामी विधानसभा व आगामी अनेक विषयावर चर्चा केली. रात्री मुक्काम केला, यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. राज्यात ओबीसी नेते लक्षमण हाके यांनी मराठा आरक्षण स्वतंत्र दयावे यासाठी अमरण ऊषोषण केले होते यानंतर राज्यातील अनेक भागामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, यानंतर प्रथमच मराठवाडयात नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समन्वयक नेते नामदेवराव आयलवाड यांच्या प्रत्यानातुन मराठवाड्यात प्रथम नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात १८ आगस्ट रोजी लक्षमण हाके यांच्यी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, रात्री उशिरा सभा संपल्यानंतर उशिरा सिडको येथील नामदेव ...
Celebrating Raksha Bandhan ; सप्तरंग सेवाभावी संस्था तर्फे पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरा – NNL

Celebrating Raksha Bandhan ; सप्तरंग सेवाभावी संस्था तर्फे पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरा – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड | येथील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी सप्तरंग सेवाभावी संस्था वेगवेगळ्या उपक्रमाने नांदेड येथे प्रचलित आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सदरील संस्थेने रक्षाबंधन आपली रक्षा करणारे व कानून चे रखवाले म्हणून पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरा केले. आम्हा सर्व बहिणींचे रक्षा करणारे बांधव पोलीस आहेत व पोलीस मुळे आम्ही सुरक्षित रित्या घरी राहू शकतो म्हणून खरे बंधू व राखीचे हकदार पोलीस बांधव असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष डॉ सान्वी जेठवाणी यांनी सांगितले. सदरील उपक्रमामध्ये संस्थेने शिवाजीनगर पोलीस ठाणे, एसपी ऑफिस, वजीराबाद पोलीस स्टेशन, अनाथ आश्रम या सर्व ठिकाणी भेट देऊन सर्व बांधवांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरा केली. या उपक्रमामध्ये संस्थेचे साक्षी मणियार, ज्योती पाटील, इशा जैन, देवयानी जोशी यांनी सहभाग नोंदवला....
सिडकोत ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

सिडकोत ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

नांदेड, सोशल वर्क
नविन नांदेड| भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको येथिल स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विश्वनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे तथा फेस्कॉमचे सचिव जयवंत सोमवाड,पंढरीनाथ मोटरगे,निळकंठ कल्याणकर, देविदास कदम,एस.के. उदंडे,गणपत कौशल्य, मोहम्मद नुरुद्दीन, युसुफ शहाबुद्दीन, प्रीतम लिंबेकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते....
शेख असलम मित्र मंडळ यांच्या वतीने प्रभातफेरी मधील विधार्थी यांना खाऊचे वाटप -NNL

शेख असलम मित्र मंडळ यांच्या वतीने प्रभातफेरी मधील विधार्थी यांना खाऊचे वाटप -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको परिसरात काढण्यात आलेल्या विविध शाळेतील प्रभातफेरी मधील विधार्थी यांना शेख असलम मित्र मंडळ यांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शेख असलम मित्र मंडळ यांच्या वतीने सिडको परिसरातील राज कॉर्नर परिसरातील भागात नांदेड दक्षिण तालुका अध्यक्ष शेख असलम यांच्या मार्गदर्शनाखाली शेख मुकरम, शेख युनूस, ईम्रानखान, आकाश कदम, शेख निजाम, शेख ऊसमान खान, दिनेश मिरासे, आकाश राऊत, शिवम घोरबांड, मोईनखान, अनिकेत राक्षसमारे,वैभव धोत्रे,शेख सिकंदर, तफरोज पठाण, यांच्या सह मित्र मंडळ यांनी खाऊचे वाटप केले. यावेळी माजी नगरसेविका डॉ. करूणा जमदाडे यांनी भेट देऊन ऊपकमाचे स्वागत केले. वसरणी येथील निवासी अंध विघालय, धनेगाव येथील अंध विघालय येथे फळे व खाऊचे वाटप करण्यात आले....
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याणच्या चित्ररथास हिरवी झेंडी -NNL

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याणच्या चित्ररथास हिरवी झेंडी -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने 15 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनांची प्रचार व प्रसिद्धीसाठी तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करून योजनांची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी करण्यात येत आहे. याअनुषंगाने भोकर येथे राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी फिरत्या चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून 17 ऑगस्ट रोजी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,  खासदार डॉ. अजित गोपछडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदी उपस्थित होते.   इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनांची प्रचार व प्रसिद्धीचे आवाहन यावेळी करण्यात आले. इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक शिवानंद मिनगिरे, समाज कल्याण निरीक्षक आर. डी. सूर्यवंशी, माधव दौंड, अनिल कंध...
error: Content is protected !!