Homeनांदेडजिल्हाधिकारी कार्यालया समोर डीवायएफ आणि माकपच्या वतीने शहिद राजगुरू यांची जयंती साजरी...

जिल्हाधिकारी कार्यालया समोर डीवायएफ आणि माकपच्या वतीने शहिद राजगुरू यांची जयंती साजरी -NNL

नांदेड। २४ ऑगस्ट हा क्रांतिकारक शहीद शिवराम हरी राजगुरू यांचा जन्मदिवस.त्यांची जयंती डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदेड तालुका कमिटीच्या वतीने उपोषणाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि.२४ रोजी साजरी करण्यात आली.

शहीद राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड येथे झाला असून ते देशासाठी हसत हसत बलिदान देणारे महाराष्ट्रातील एकमेव क्रांतिकारक आहेत. ते शहीद भगतसिंग यांच्या क्रांतिकारी आंदोलनाचे प्रमुख क्रांतिकारक होते. त्यांची २४ ऑगस्ट रोजी जयंती. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय येथे शहीद भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रांतिकारी घोषणा देऊन शहिदांच्या जीवनावर विचार मांडण्यात आले.

माकप,सीटू,जमसं आणि डीवायएफआय चे मागील २०० पेक्षा अधिक दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर विविध प्रलंबीत मागण्यासाठी साखळी उपोषण सुरु असून या उपोषणाच्या ठिकाणी अनेक महामानवांच्या जयंत्या आणि स्मृतिदिनाचे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. यावेळी माकप तालुका सचिव कॉ. गंगाधर गायकवाड,डीवायएफआय तालुका निमंत्रक कॉ.जयराज गायकवाड, सुभाषचंद्र गजभारे, सोनाजी कांबळे,माधव दूधकावडे, बंटी दूधकावडे, गौस उर्फ बबलू खुरेशी,यासिन भाई आदींची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments