HomeकरियरSanskrit Week ; विविध उपक्रमांनी संस्कृत सप्ताह साजरा - NNL

Sanskrit Week ; विविध उपक्रमांनी संस्कृत सप्ताह साजरा – NNL

नांदेड| येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय माणिक नगर नवीन कौठा नांदेड मधील दोन्ही शाखेमध्ये संस्कृत दिवसानिमित्त संस्कृत सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. संस्कृत शिक्षिका डॉ.सौ. कविता तिर्थे यांनी श्लोक पाठांतर, भाषण, हस्ताक्षर व भित्तिपत्रक स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत विषयाची आवड निर्माण करत संस्कृत प्रदर्शनी सुद्धा भरवली होती.

या प्रदर्शनीमध्ये संस्कृत भाषेच्या वृद्धीसाठी विविध भित्तीपत्रके, ग्रंथ प्रदर्शनी, वस्तू प्रदर्शनी यांचा समावेश होता. या प्रदर्शनीचे उद्घाटन शाळेचे उपमुख्याध्यापक सदानंद नळगे यांच्या हस्ते झाले. त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे व संस्कृत शिक्षिकेचे विशेष अभिनंदन केले. या सप्ताहात प्रतिक पांचाळ, अक्षया मोरेवार, श्रद्धा जाधव, गणेश कोचार, शची देशपांडे, श्रावणी केंद्रे, कार्तिकी गायकवाड, विश्वश्री दिंडे, प्रिती शिखरे, सिध्दी मद्रेवार, प्रणवी गहलोत, धनंजय गावंडे इत्यादी विद्यार्थ्यांनी आपले संस्कृत भाषेविषयी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर कुरुडे, पर्यवेक्षक सत्यवान पारेकर, कौठा शाखा इन्चार्ज बालाजी टिमकीकर, परीक्षा प्रमुख शैलेश भांगे, सांस्कृतिक उपप्रमुख व्यंकटेश उपासे, योगेश भांगे तसेच ज्येष्ठ शिक्षिका सौ. विजयाताई कुरुडे, सौ. पद्मा वरवटकर, ज्येष्ठ शिक्षक आर.सी. गायकवाड, विजय कळणे सुरज यादव, सूर्यभान ताटे, सचिन गायकवाड, सचिन कळसे, गणेश मुधोळकर, गणेश दिनकर, नंदकिशोर देवकत्ते, सौ. पोले, सौ. दिनकर, सौ. स्वामी, कामेश्वरी पेठकर, सौ. कल्याणी पेठकर, सौ. कांबळे, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती यामध्ये सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments