Thursday, May 21

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Shri Hanuman ; श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त 12 एप्रिल रोजी शोभायात्रा चे आयोजन

Shri Hanuman ; श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त 12 एप्रिल रोजी शोभायात्रा चे आयोजन

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l श्री हनुमान जन्मोत्सव हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू एकतेच प्रतीक मानला जातो, आपल्या धर्मातील जाती पंथ यामधील भेदभाव विसरून फक्त हिंदू म्हणून व आपल्या धर्मातील सगळे जाती पंथ एकत्रित येऊन हा हनुमान जन्मोत्सव हिंदू एकता दिवसच्या रूपात साजरा करत असतो श्री हनुमान जन्मोत्सव व हिंदू एकता दिवस निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको हडको आयोजित भव्य शोभायात्राचे आयोजन 12 एप्रिल रोजी करण्यात आले आहे. या शोभा यात्रेमध्ये प्रभू श्री रामचंद्र,पवनसुत हनुमान, यांची, सुंदर अशी मूर्ती, सुंदर अशा भजनाचा, संच, सुप्रसिद्ध जगदंबा ढोल पथक नांदेड यांचा वाद्य संच, लहान लहान बालकांना वानरांच्या वेशभूषेत देखावा, वारकरी संप्रदाय महिला, यांच्यासह रामभक्त हनुमान भक्त यांची उपस्थिती राहणार आहे. शोभायात्रा ही 12 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता बजरंग बलीची आरती करून विठ...
H.B.P. Prabodhan Maharaj ; भगवंताचे “नामस्मरण” हा भक्तीचा सोपा मार्ग आहे…. ह.भ.प. प्रबोधन महाराज पाळेकर

H.B.P. Prabodhan Maharaj ; भगवंताचे “नामस्मरण” हा भक्तीचा सोपा मार्ग आहे…. ह.भ.प. प्रबोधन महाराज पाळेकर

धार्मिक, नांदेड
उस्माननगर l एकाच ठिकाणाल जाण्यासाठी जसे अनेक मार्ग असतात. तसेच पायी चालताना आपण जवळचा आणि सोपामार्ग निवडतो. तसेच परमेश्वराची भक्ती धर्मपंथाप्रमाणे वेगवेगळ्या पध्दतीने आपण करतो, परंतु सगळ्यात सोमा मार्ग (देवाचे ) भगवंताचे नामस्मरण हा आहे. आपण प्रभुरामाचे सतत नामस्मरण करावे असे प्रतिपादन ह.भ.प . प्रबोधन महाराज पाळेकर यांनी केले. (more…)...
Shri ram ; शिवनगर अयोध्या चौक येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सव उत्साहात संपन्न

Shri ram ; शिवनगर अयोध्या चौक येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सव उत्साहात संपन्न

नांदेड, धार्मिक
नांदेड। शिवनगर येथील अयोध्या चौक येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.दुपारी ठीक 12 वाजता भगवा ध्वजा रोहन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाआरती नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला होता यात शेकडो राम भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.या सोहळ्यास प्रामुख्याने महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता महिलांनी महाआरती करून प्रभू श्रीरामाचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार बालाजी कल्याणकर यांचे बंधू एकनाथ कल्याणकर हे उपस्थित होते. शिवनगर येथील श्रीराम भक्त मागील 4 वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन करत करत आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी पत्तेवार,वैजनाथ स्वामी कार्यकारी संपादक दैनिक श्रमिक लोकराज्य, साई मंठाळकर,सचिन स्वामी,मोहन पाटील इंगळे,बालाजी पल्लेवाड,सुनील सोनटक्के,देविदास मठपती, कृष्णा मठपती,गणेश सोनटक्के,श्रीकांत रामपटवार, गजानन इंगळे,राजू पल्ले...
Ram Navami ; रामनवमीनिमित्त पतंजलीच्यावतीने ठिकठिकाणी योग शिबिरांसह विविध कार्यक्रम

Ram Navami ; रामनवमीनिमित्त पतंजलीच्यावतीने ठिकठिकाणी योग शिबिरांसह विविध कार्यक्रम

नांदेड, धार्मिक
नांदेड l मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांची जयंती दि.६ एप्रिल रोजी सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने पतंजली योग समितीच्यावतीने ३, ५, ७ दिवसीय योग शिबिरे घेतली जाणार असून या दरम्यान विविध कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत. चैत्र महिन्याच्या शुक्लपक्ष नवमी तिथी ला प्रभु श्रीरामजीचा जन्मोत्सव साजरी केल्या जातो. यावर्षी दि. ६ एप्रिल रोजी प्रभु श्रीराम जन्मोत्सव म्हणजे अंधारातून - प्रकाशाकडे, असत्याकडून - सत्याकडे, वाईटातून - चांगल्याकडे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. मर्यादा पुरुषोत्तम अशी श्रीरामांची ओळख असल्याने त्यांच्या ठायी असलेली करुणा, दया, सत्य, सदाचार, सहनशीलता, धैर्य आदि गुण आपल्या अंगी बाणविण्याच्या उद्देशाने पतंजली योग समितीच्यावतीने जिल्हाभरात ३, ५, ७ दिवसीय योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य कार्यक्रम चंदगीराम अ‍ॅन्ड सन्स, रजिस्ट्री ऑफिस शेजारी, स्...
Ram Gita : प्रभू श्री रामचंद्रांच्या राम गितांची मंगलमय सुरमयी प्रभात ६ एप्रिल रोजी सकाळी साडेपाच वाजता कुसूम सभागृहात

Ram Gita : प्रभू श्री रामचंद्रांच्या राम गितांची मंगलमय सुरमयी प्रभात ६ एप्रिल रोजी सकाळी साडेपाच वाजता कुसूम सभागृहात

धार्मिक, नांदेड
नांदेड| कलांगण प्रतिष्ठाण, श्रीराम भक्त मंडळ व दैनिक प्रजावाणी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या तीन वर्षापासून श्री.गोविंद गिरी देवजी महाराज, किशोरजी व्यास यांच्या कृपाआशिवार्दाने प्रभू श्री रामचंद्रांच्या श्री रामनवमीनिमित्त राम पहाट या कार्यक्रमाचे आयोजन दि.६ एप्रिल रोजी सकाळी साडेपाच वाजता कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. राम गितांची मंगलमय सुरमयी प्रभात हा राम गितांचा कार्यक्रम गेल्या तीन वर्षापासून सातत्याने होत आहे. या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती, निवेदन प्रख्यात निवेदक अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे यांची असून, निर्मिती सहाय्य पत्रकार विजय जोशी यांचे आहे. कलांगण प्रतिष्ठाण, श्रीराम भक्त मंडळ यांच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून हा कार्यक्रम होत आहे. यावर्षी पुणे येथील प्रख्यात गायक संजीव मेहंदळे, प्रख्यात गायिका आरती दिक्षीत, प्रख्यात आसावरी जोशी-rबोधनकर, सुप्रसिध्द गायिका प्रणोती ...
Ramadan Eid ; रमजान ईद निमित्ताने मुख्य ईदगाह येथे पोलीसा सोबत पोलीस पाटील यांनी बंदोबस्त भुमिका बजावली

Ramadan Eid ; रमजान ईद निमित्ताने मुख्य ईदगाह येथे पोलीसा सोबत पोलीस पाटील यांनी बंदोबस्त भुमिका बजावली

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या मुख्य ईदगाह मैदानावर नमाज पठण अदा करण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधव यांच्या बंदोबस्त साठी पोलीससह यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या ग्रामीण भागातील पोलीस पाटील यांनी सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जोपासली. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या देगलूर नाका येथील मुख्य ईदगाह मैदानावर नांदेड दक्षिण व उत्तर परिसरातील व सिडको हडको भागातील मुस्लिम समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित राहुन नमाज पठण अदा करत असतात, यावेळी मोठ्या प्रमाणात होणारया गर्दी वर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार , अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरज गुरूव, पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिल‌ कुमार नायक, यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली 15अधिकारी,128 पोलीस अंमलदार,62, होमगा...
Preacher Gonewad : सदगुरूंच्या सानिध्यात राहून भक्ती केल्यास जिवन फलदायी ठरते – प्रवचनकार गोणेवाड

Preacher Gonewad : सदगुरूंच्या सानिध्यात राहून भक्ती केल्यास जिवन फलदायी ठरते – प्रवचनकार गोणेवाड

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर| सदगुरूंच्या सानिध्यात राहून मनोभावे भक्ती केली पाहिजे आपल्या सुखी जिवन जगण्याची प्रेरणा हि भक्ती मार्गातूनच मिळते म्हणून प्रत्येक भक्तांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी सांगितलेल्या मार्गाने भक्ती करावी त्यांच्या कृपेने जिवनातील संकटं दुर होतील प्रत्येक व्यक्तीने त्यांचे विचार अंगीकारले तर जिवन फलदायी ठरेल असे मत सत्संग सोहळ्यात सेवानिवृत्त शिक्षक जयराम गोणेवाड यांनी भाविकांशी बोलतांना केले आहे. कारला येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संतसंग सेवा केंद्र समितीच्या वतीने लिलाअमृत पारायण , दिवसभर हरिनामाचा गजर सायंकाळी हनुमान मंदिर सभागृहात प्रवचनकार जयराम गोणेवाड यांचे प्रवचन झाले उपस्थित भक्तांना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या सानिध्यात राहून भक्तांनी जिवन सफल करून घेतले पाहिजे अशा संतांच्या सहवासामुळे आपल्या पिढीचा उध्दार नक्कीच होतो हिंदू धर्मातील प्रत्...
Maruti Raya temple in Borgadi : हनुमान जन्मोत्सवा निमित्त बोरगडी येथील मारुतीरायाच्या मंदिरात उसळणार भक्तांची मांदियाळी

Maruti Raya temple in Borgadi : हनुमान जन्मोत्सवा निमित्त बोरगडी येथील मारुतीरायाच्या मंदिरात उसळणार भक्तांची मांदियाळी

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी (देवाची) येथील मारुतीरायाच्या मंदिरात श्रीराम जन्मोत्सव आणि हनुमान जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात चैत्र शुद्ध नवमी दि.०६ एप्रिल रविवार पासून होणार आहे. तर मारोतीरायाचा जन्मोत्सव सोहळा दि.१२ एप्रिल शनिवारी पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मंत्रोच्चार वाणीत सकाळी ५ ते ६.३० या वेळेत होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत हभप योगेश महाराज अग्रवाल वसमत यांचे कीर्तन संपन्न होणार आहे. सप्ताहाचा समारोप दि.१३ एप्रिल रविवारी कुस्त्यांची दंगल व महाप्रसादाने होणार आहे. उत्सव काळात पंचक्रोशीतील भाविक - भक्तांनी उपस्थित राहून हनुमंतरायाचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमेटी आणि गावकऱ्यानी नांदेड न्युज लाईव्हच्या ...
Ramadan Eid in full swing : हिमायतनगरात रमजान ईद उत्साहात… देशात शांतता आणि सर्वांच्या सुख समृद्धीची कामना

Ramadan Eid in full swing : हिमायतनगरात रमजान ईद उत्साहात… देशात शांतता आणि सर्वांच्या सुख समृद्धीची कामना

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यात एकतेचा संदेश देणाऱ्या हिमायतनगर शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली असून, त्या निमित्ताने येथील मुस्लिम समाज बांधवानी शहराबाहेरील इदगाह मैदानात सकाळी ९.३० वाजता सामुहिक नमाज अदा केली. यावेळी देशात शांतता नांदावी यंदाचा खरीप हंगाम चांगला येऊ दे.... आणि सर्वांच्या घरात सुख समृद्धी नांदावी अशी विनवणी (दुवा) करण्यात आली. त्यानंतर लहान थोरांनी एकमेकांना गळा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी मुस्लिम समाज बांधवाचा महत्वपूर्ण रमजान ईद उत्सव गेल्या महिन्याभराच्या उपवासानंतर दि.31 सोमवारी आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी इदगाह मैदानावर जमलेल्या समाज बांधवाना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या ईदच्या देशात शांतता नांदावी.... हिमायतनगर शहरातील भाईचाऱ्याची परंपरा कायम ठेऊन अल्लाहने दाखविलेल्या भक्...
Iftar party ; सदभावना मंच आयोजित इफ्तार पार्टीस प्रतिसाद !

Iftar party ; सदभावना मंच आयोजित इफ्तार पार्टीस प्रतिसाद !

नांदेड, धार्मिक
नांदेड l विविध जाती धर्माचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सदभावना मंच नांदेडच्या वतीने रमजान निमित्त भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले, त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. ज्ञानमाता शाळेसमोरील के. पी. मोटर्स येथे पवित्र रमजान निमित्त सदभावना मंचच्या वतीने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मंचचे जिल्हाध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार हे यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आज सामाजिक व राजकीय परिस्थिती एवढी बिकट होत चालली की, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जोपासणे ही काळाची गरज झाली आहे. सदभावना मंच त्यादृष्टीनेच काम करीत असल्याचे मत यावेळी प्रास्ताविकातून सदभावना मंचचे सहसचिव मोहसीन खान यांनी व्यक्त केले. त्यानुसार सर्व वक्त्यांनी आपले विचार मांडले. मंचावर भंते पय्याबोधी, आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम, लक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. हनुमंत ...
error: Content is protected !!