Thursday, May 21

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Shri Hanuman Janmotsav : श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने वाढोणा शहरात २८ रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन

Shri Hanuman Janmotsav : श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने वाढोणा शहरात २८ रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर,अनिल मादसवार| वाढोणा (हिमायतनगर) जिल्हा नांदेड येथे सोमवार दिनांक २८ एप्रिल २०२५ दुपारी २.३० वाजता शहरातील पोलीस स्टेशन बाजुस असलेल्या बाजार चौक परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे भव्य हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शहरातील मुख्य रस्त्याने विविध प्रकारच्या झाकीसह भव्य शोभा यात्रा काढली जाणार आहे. ।। देव देश धर्म ।। टिकला पाहिजे आणि हिंदू संस्कृतीचे अबाधित राहिली पाहिजे हा उद्देश ठेऊन हिमायतनगर वाढोणा शहरात हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचे मुख्य आकर्षण भजन सम्राट श्री विकास भैय्या परदेशी श्री बागेश्वर धाम सत्संग भजन मंडळ, नांदेड हे राहणार असून, शोभा यात्रेत श्री हनुमान जन्मोत्सव समिती-वाढोणा तर्फे प्रभु श्रीराम लल्ला झांकी, बाहुबली हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, गौमाता राष्ट्रमाता झाकी, भजन मंडळ ट्रॉला आणि रिध्दम लाईव्ह...
Osmannagar ; उस्माननगर येथे अब्दुल रहेमान बाबा सैलानी सरकारच्याृ संदलाचे आयोजन

Osmannagar ; उस्माननगर येथे अब्दुल रहेमान बाबा सैलानी सरकारच्याृ संदलाचे आयोजन

धार्मिक, नांदेड
उस्माननगर l दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उस्माननगर ता.कंधार येथे हिंदू मुस्लिम बांधवांचे एकतेचे प्रतिक असलेल्या अब्दुल रहेमान बाबा सैलानी संदलाचे आयोजन दि.२१ एप्रिल रोजी आयोजन ( सरकार बाबा ) मुख्य आयोजक इस्माईल तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केले आहे. उस्माननगर ता.कंधार येथील ( सरकार )इस्माईल तांबोळी ( बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी होळी सण उत्सवास बुलढाणा येथे भक्तांना नेतात. होळीचा सण झाल्यानंतर उस्माननगर येथे सैलानी बाबा यांचा संदल हार्षउल्हासासध्ये भव्य संदल मिरवणूक काढण्यात येते. दि.२१ एप्रिल रोजी सोमवारी सायंकाळी येथील पुजारी इब्राहिम तांबोळी यांच्या घरापासून पुजा करुन प्रमुख रस्त्याने ढोल ताशा , फटाक्यांची आतिषबाजी करीत अश्व ( घोडे) यांच्या निनादात संदल मिरवणूक फजले मौला दर्गा येथे चादर चढून गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात येणार असून , घरी परत येऊन सायंकाळी महाप्रसादाचे...
Shri Parmeshwar Mandir ; श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या आजीव सदस्यपदी अनिल मादसवार व एड दिलीप राठोड यांची निवड

Shri Parmeshwar Mandir ; श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या आजीव सदस्यपदी अनिल मादसवार व एड दिलीप राठोड यांची निवड

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर,परमेश्वर काळे। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) येथील जाज्वल्य देवस्थान ट्रस्टमध्ये तात्पुरते सदस्य म्हणून कार्यरत असलेले अनिल मादसवार व एड दिलीप राठोड यांची आता आजीव सदस्य म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. हि निवड गुरुवार दिनांक 17 एप्रिल रोजी संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आली असल्याचे मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी जाहीर केले आहे. विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात हरिहर अवतारात श्री परमेश्वराची उभी मूर्ती आहे. सर्वांग सुंदर काळ्या पाषाणातील मूर्ती भारतात इतरत्र कुठेही आढळून येत नाही असे आत्तापर्यंत मंदिरास भेट दिलेल्या अनेक साधू, संत महंत व जुने जाणकार मंडळी सांगतात. श्री परमेश्वर मंदिराचा कारभार ट्रस्ट कमिटीच्या माध्यमातून परंपरेनुसार चालविला जात असून, सामाजि...
Shri Hanuman Temple ; श्री हनुमान मंदिर कलशारोहण सोहळ्याचे निमित्ताने तीन दिवशीय धार्मिक कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती

Shri Hanuman Temple ; श्री हनुमान मंदिर कलशारोहण सोहळ्याचे निमित्ताने तीन दिवशीय धार्मिक कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती

धार्मिक, नांदेड
किनवट परमेश्वर पेशवे l दिनांक 12 रोजी पासून तीन दिवसीय कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन इस्लापूर शहरात करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाची सांगता दिनांक 14 रोजी हजारो महिलांच्या पुरुषांच्या साक्षीने पूर्णत्वास गेली. त्यानंतर महाप्रसादाचा पंचक्रोशीतील हजारो महिला भक्त आणि पुरुषांनी लाभ घेतला. या कलशारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमाची औचित्य साधून हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर या यांनी आवर्जून भेट दिली असता गावातील ग्रामस्थांनी व स्थानिक च्या कार्यकर्त्यांनी त्यांना इस्लापूर येथील पाणी टंचाई संदर्भात लक्ष देण्याची मागणी केली असता तात्काळ इस्लापूर शहरासाठी तीन टँकर मंजुरी करण्याच्या प्रस्तावास संदर्भात तहसीलदार व गटविकास अधिकारी किनवट यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्याचबरोबर गावातील अनेक विकास कामा संदर्भात च्या चर्चा त्यांनी कार्यकर्त्या सोबत करून गावाती...
darshan of Maroti Raya of Borgadi : विदर्भ- मराठवाडा – तेलंगणा राज्यातील हजारो भक्तांनि घेतले बोरगडीच्या मारोतीरायाचे दर्शन

darshan of Maroti Raya of Borgadi : विदर्भ- मराठवाडा – तेलंगणा राज्यातील हजारो भक्तांनि घेतले बोरगडीच्या मारोतीरायाचे दर्शन

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| चैत्र शुद्ध नवमी दि.12 एप्रिल शनिवारी आलेल्या हनुमान जयंती निमित्ताने विदर्भ - तेलंगाना - मराठवाड्यातील ग्रामीण भागात प्रसीध्द असलेल्या बोरगडी येथील मारोती मंदिरात संकटमोचन श्री हनुमंत रायाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जय हनुमान.. जय श्रीराम.... बजरंग बली की जय... पवनसुत हनुमान की जय.. च्या जयघोषात भाविकांनी नारळ फोडुन श्रीचे दर्शन घेतले. तळपत्या उन्हात देखील मंदिर परिसरात नवसाला पावणाऱ्या हनुमंतरायाच्या दर्शनासाठी सकाळी 4 वाजेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले आहे. प्रभु श्री रामचंद्राचे परमभक्त श्री बजरंगबली हनुमान यांच्या जन्मोत्सव दिनी प्रतीमा तथा मुर्तीची पुजा अभीषेक केल्याने मणुष्य भयमुक्त होतो.....असे जुन्या जनकारातून सांगीतले जाते. यासाठी सर्वच गाव, वाडी, तांड्याच्या बाहेर श्री बजरंगबली मुर्तीची प्रतीष्ठापना...
Shri Hanuman Temple ; श्री हनुमान मंदिर कलशारोहण सोहळ्याचे निमित्ताने तीन दिवशीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

Shri Hanuman Temple ; श्री हनुमान मंदिर कलशारोहण सोहळ्याचे निमित्ताने तीन दिवशीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

धार्मिक, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे l दिनांक 12 रोजी इस्लापूर शहरामध्ये हनुमान जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ह भ प चिन्मय महाराज सातारकर यांचे भव्य प्रवचन झाले. त्या त्यामध्ये श्री हनुमान मंदिरात अभिषेक सोहळा संपन्न होऊन बाल स्वयंसेवकाच्या वतीने रामायणावर नाटिका सादर करण्यात आली व शेकडो महिलांनी पुरुषाने सामूहिक हनुमान चालीसाचे पठण केले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले . त्यातच आज सायंकाळी सौ. ह. भ. प. भगवती सातारकर यांच्या मधुर वाणीतून भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दिनांक 13 रोजी सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य कलश नगर प्रदक्षिणा व रॅलीचे आयोजन करण्यात आले असून रात्री आठ ते दहा ह भ प सुरेश महाराज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रम ठेवण्यात आला असून दिनांक 14 रोजी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी व आया बहिणींनी सकाळी 9 ते 11 वाजता श्री हनुमान मंदिर कलश...
hanuman : हनुमान जन्मोत्सव निमित्ताने भायेगाव येथे ग्रामस्थांना पुरणपोळीचा महाप्रसाद

hanuman : हनुमान जन्मोत्सव निमित्ताने भायेगाव येथे ग्रामस्थांना पुरणपोळीचा महाप्रसाद

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l हनुमान जन्मोत्सव निमित्ताने गावातील हनुमान मंदिर येथे अभिषेक व विधीवत पूजन केल्या नंतर ग्रामस्थांना पुरणपोळीचा महाप्रसादाचे आयोजन संयोजक यांच्या वतीने करण्यात आले होते. 12 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्ताने गावातील जाज्वल्य असलेल्या हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने पुजारी मन्मथ मठपती यांनी विधीवत पूजन अभिषेक करण्यात आले, यानंतर ग्रामस्थ व भाविक भक्त यांच्या साठी महाप्रसाद म्हणून यावेळेस पुरण पोळीचा महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. संयोजक तथा सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर ,यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील जेष्ठ नागरिक, ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठीत नागरिक, युवक महिला यांनी परिश्रम घेतले....
CIDCO HUDCO ; सिडको हडको परिसरातील विविध भागातील हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव साजरा

CIDCO HUDCO ; सिडको हडको परिसरातील विविध भागातील हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव साजरा

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l सिडको हडको भागातील विविध ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने महाअभिषेक, विधीवत पूजन, हनुमान चालीसा , हनुमान स्तोत्र पठण करुन महाआरती करण्यात आली व भाविक भक्तांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले. 12 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्ताने सिडको परिसरातील गुरूदेव दत्त मंदिर येथे महाअभिषेक, महापुजा व महाप्रसाद आयोजन माजी नगरसेविका ललिता शिंदे व गुरूदेव दत्त मंदिर महिला पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. दक्षिण मुखी काळा हनुमान मंदिर संभाजी चौक सिडको येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजन 5 ते 12 एप्रिल पर्यंत करण्यात आले होते.   यामध्ये हरि किर्तन,हरी पाठ ,भजन,गाथा आयोजन दैनंदिन करण्यात आले होते, हनुमान जन्मोत्सव निमित्ताने 12एपिल रोजी अखंड हरिनाम सप्ताह सांगता हभप आंनद महाराज अंतरगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता करण...

Dnyaneshwari Parayan ; असदवन येथे अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण कथा श्रीमत भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l असदवन येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण कथा ,श्रीमत भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन 12ते 19 एप्रिल पर्यंत आयोजन करण्यात आले असुन श्रीमद भागवत कथा प्रवक्ता हभप श्री प्रभाकर महाराज पुयड मिश्री पिंपळगाव दुपारी 1 ते 4 भागवत कथा आयोजित करण्यात आली असून 19 एप्रिल रोजी काल्याचे किर्तनाने सांगता होणार आहे. वर्ष चौथे असुन दैनंदिन पहाटे काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन, श्रीमद् भागवत कथा,हरिपाठ,हरि किर्तन व जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये रामायण चाय हभप बाबु किशन महाराज कुदळेकर,गुरू कृपा किंमत हभप शंकर महाराज सोनमांजरीकर,हभप कोंडीबा महाराज पासदगावकर, जोग महाराज, हभप संतोष महाराज, गुरुवर्य रूद्रगिर महाराज किवळेकर,हभप भगवान गुरूजी ढोणे,हभप शिवाजी महाराज करखेलीकर, यांच्ये हरि किर्तन होणार आहे. 19 एप्रिल रोजी हभप प्रभाकर महाराज ...
Shri Mahadev Yatra : नांदेड जिल्ह्यातील मरळक येथील श्री महादेव यात्रेला शनिवारपासून प्रारंभ

Shri Mahadev Yatra : नांदेड जिल्ह्यातील मरळक येथील श्री महादेव यात्रेला शनिवारपासून प्रारंभ

नांदेड, धार्मिक
नांदेड| जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेले प्राचीन हेमाडपंथी महादेवाचे मंदिर येथील श्री विमलेश्वराच्या यात्रेला दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी प्रारंभ होतो व ही यात्रा तीन दिवस चालते. यावर्षी दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी शनिवारी सकाळी गावकऱ्यांच्या सामूहिक महादेवाच्या अभिषेकाने यात्रेला प्रारंभ होतो मराठवाड्यातून तीन दिवसात श्री महादेवाच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्तगण येत असतात. पौर्णिमेच्या दिवशी रात्री मरळक गावाच्या परिसरातील अनेक गावातून महादेवाच्या काठ्या कावळ्या दर्शनासाठी भक्तगण घेऊन येत असतात. शनिवारी रात्री दहा वाजता मरळक येथील सर्व महिलांच्या वतीने महादेवाला ओवाळण्यासाठी सामूहिक आरत्यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रात्री बारा वाजता महादेवाची पालखी मिरवणूक यात्रेतून वाजत गाजत निघत असते. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 13 एप्रिल...
error: Content is protected !!