Thursday, May 21

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १२ (लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १२ (लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

धार्मिक, लेख
"श्रद्धा, राष्ट्रभक्ती आणि निःस्वार्थ सेवेचं उत्कट दर्शन!" माता वैष्णोदेवीचे यशस्वी दर्शन झाल्यानंतर सर्वजण भावनांनी ओथंबलेले! हॉटेल 'श्रीन ग्रँड'मधील आरामदायी वास्तव्यानंतर सकाळी ८ वाजता आम्ही आमच्या बसने जम्मूकडे रवाना झालो.अत्यंत हुशार आणि मनमिळावू असलेल्या शार्दूल वडजकर या तरुण इंजिनियरची सुट्टी संपत आल्यामुळे त्याला निरोप द्यावा लागला. प्रवास सुरू झाल्यावर लगेचच वसुबेन पटेल आणि शंकर मोरलवार यांनी घेतलेल्या तंबोला गेममुळे एक तास कसा गेला, ते कळलेच नाही. त्यात रोख बक्षिसेही होती. जम्मू बायपासवर दरवर्षीप्रमाणे आम्हाला प्रेमळ निमंत्रण देणारे मूळचे नांदेडचे, पण आता जम्मूत स्थायिक झालेले लेबर कॉन्ट्रॅक्टर ज्ञानोबा जोगदंड यांनी दिलेल्या गरमागरम दाल-चावल आणि तुपातला शिरा यांचा आस्वाद घेतला. फक्त २१ व्या वर्षी घरची गरिबी दूर करण्यासाठी कामगार म्हणून आलेल्या जोगदंड यांनी आपल्या कष्टातून आज ...
Giri Maharaj : शुद्ध ज्ञान तत्वचीअनुभवियांचा सार गुरु माझा – गिरी महाराज

Giri Maharaj : शुद्ध ज्ञान तत्वचीअनुभवियांचा सार गुरु माझा – गिरी महाराज

धार्मिक, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| आजकाल गुरुचा व्यवसाय करणारे ब्रॅन्ड गुरुचा सर्वत्र सुकाळ झाला असला तरी खरा गुरु ओळखणे फार कठिण आहे. " गुरु नव्हे हाडामासाचा, गुरु नव्हे कोण्या पंथ, धर्मांचा शुध्द् ज्ञान तत्वची अनुभवियांचा सार तुकडया म्हणे गुरु माझा"जगामध्ये व्यास मुनी, गौतम बुद्ध, संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम महाराज,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गुरु म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा ह्यालाच गुरु म्हणतात. असे उनकेश्‍वर येथील अ. ज्ञा. यो. सा. म. सेवाश्रम येथे गुरु ( व्यास ) पोर्णिमा निमित्त सत्संगात ह.भ.प. नंदकिशोर गिरी महाराज यांनी विचार मांडले. यावर पुढे बोलतांना गिरी म्हणाले की,गुरु पोर्णिमा हा उत्सव आपल्या हिन्दू धर्मातील हा प्राचीन काळापासून चालत आहे. यास व्यास पोर्णिमा म्हणतात. आपल्या समाजाचे समाज रक्षक व्यास हे महाभारत असा अमर महान ग्रंथ लिहला त्यांनी हा ग्रंथ लिहण्यासाठी आपले जीवन संपविले ...
Venkataswami Maharaj : मनाला स्थिर करण्यासाठी मोबाईल नव्हे भगवंताचा नामस्मरण आवश्यक – व्यंकटस्वामी महाराज

Venkataswami Maharaj : मनाला स्थिर करण्यासाठी मोबाईल नव्हे भगवंताचा नामस्मरण आवश्यक – व्यंकटस्वामी महाराज

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर| गृहस्थ आश्नमात राहुन संसारीक जीवन सार्थक करायचे असेल तर संस्कार जपणे महत्वाचे आहे. मनुष्याचा मन चंचल असते हे सर्वांनाच चांगल्याप्रकारे प्रकारें माहित आहे. मनाला स्थिर करण्यासाठी मोबाईल नव्हे भगवंताचा नामस्मरण करणे आवश्यक आहे. मोबाईल मुळे सर्वाधिक नुकसान हिंदू समाजाच होत आहे. आजुबाजुला काय चाललंय या बाबींकडे लक्ष ठेवून वागणे स्वतः सह जनहिताचे ठरु शकते असा मौलिक उपदेश परमपूज्य स्वामी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी दिला. ते पिंपळगाव येथील मठात गुरुपौर्णिमा उत्सव प्रसंगी उपस्थित झालेल्या सद्भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होते. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठ तिर्थक्षेत्र क्षेत्र पिंपळगाव येथे सकाळी ११ ते १२ या वेळात गुरूपुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पुढे बोलताना बालयोगी व्यंकटस्वामी महाराज म्हणाले की, मनुष्य जन्मा...
Pandharpur on Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीला पंढरपूरला प्रशासनासह पोलिस अलर्ट, भाविकांनी अलोर्ट गर्दीचा रेकार्ड मोडला

Pandharpur on Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीला पंढरपूरला प्रशासनासह पोलिस अलर्ट, भाविकांनी अलोर्ट गर्दीचा रेकार्ड मोडला

नांदेड, धार्मिक
पंढरपूर/हिमायतनगर, परमेश्वर गोपतवाड| आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटकसह ईतर राज्यातुन भाविकांची अलोट गर्दी होऊन आजपर्यंतच्या ऊपस्थीतीचा रेकार्ड मोडल्याचे चित्र ६ जुलै रोजी दिसुन आले. प्रशासनासह पोलिस, रेल्वे पोलिस अलर्ट राहिल्यामुळे स्वच्छतेसह भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन दर्शन घेतले. (Police and administration on alert in Pandharpur on Ashadhi Ekadashi, devotees break the record for the number of people on alert) चरणस्पर्श दर्शनासाठी तब्बल २४ तास वेळ लागला तर मुख दर्शनासाठी जवळपास सहा तास वेळ लागला. रांगेत मध्ये कोणी घुसु नये म्हणून सुरक्षक जाळ्यात वाढ करण्यात आली होती. यावेळी चंद्रभागेच्या तीरावर घाण होणार नाही या बाबींची प्रकर्षाने प्रशासनाने काळजी घेतली होती. या भागात देखील भाविकांना मनमोकळेपणाने चंद्रभागेत जाता याव म्हणून सदैव पोलीसांचा फौजफाटा सारखा फिरत होते...
Vitthal Deshamwad : मणूष्य जिवनाचा उपयोग समाजकल्याणासाठी करा…समाजप्रबोधनकार विठ्ठल देशमवाड

Vitthal Deshamwad : मणूष्य जिवनाचा उपयोग समाजकल्याणासाठी करा…समाजप्रबोधनकार विठ्ठल देशमवाड

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर| मानवाने जन्माला आल्यानंतर जिवनाचा उपयोग हा समाजाच्या कल्याणासाठी केला पाहिजे म्हणून प्रत्येक माणसाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगे महाराज यांच्या विचारांचे पाईक होऊन समाज जागृती निर्माण व्हावी यासाठी पुढाकार घ्यावा आजच्या तरुणाईला लागलेली व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे. याकरिता प्रत्येकांच्या गुरूंनी शिष्याकडे लक्ष दिले तर भविष्याची पिढी सुधारल्याशिवाय राहणार नाही एकदा आलेला जन्म पुन्हा येणार नाही हे डोक्यात ठेवून जगायला शिका असे आवाहन गुरूदेव सेवा मंडळाचे समाजप्रबोधनकार विठ्ठल देशमवाड यांनी केले आहे. हिमायतनगर तालुक्यातील सरसम गावालगत असलेल्या मल्लीनाथ महादेव येथे गुरूपौर्णिमा निमित्ताने‌ हरी भजनाच्या कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान व्यसनमुक्ती समाजप्रबोधनकार विठ्ठल देशमवाड महाराज म्हणाले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज यां...
Gurupornima : माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानावर गुरु पौर्णिमा भक्तीभावात साजरी

Gurupornima : माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानावर गुरु पौर्णिमा भक्तीभावात साजरी

नांदेड, धार्मिक
श्रीक्ष्रेत्र माहूर राज ठाकूर| गुरु पौर्णिमेनिमित्त रविवार दि.१० जुलै रोजी हजारों भाविकांनी श्री दत्तशिखर,श्री देवदेवेश्वर मंदिरात जाऊन श्रीदत्तप्रभुचे दर्शन व प.पु.प.म.मधूसूदनजी भारती महाराज आणि मधुकरबाबा शास्त्री कवीश्वर यांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. गुरुपौर्णिमे निमित्त दत्त शिखर संस्थानचे प.पु.प. म.मधूसूदनजी भारती महाराज यांचे हस्ते स.७.३० वा.व्यासपूजा पार पडली. त्यानंतर श्रीदत्त प्रभूला अभिषेक व आरती करण्यात आली.यावेळी पूजनीय महंतांनी दत्तशिखर मंदिराभोवती असलेल्या महंतांच्या समाध्यांचे दर्शन घेतले.पुढे मंदिराच्या सभागृहातील परंपरागत गादीवर विराजमान होऊन शिष्य मंडळी व भाविक भक्तांना त्यांनी आशीर्वाद दिला. गुरु पौर्णिमेनिमित्त भर पावसात राज्यातील विविध भागातून तसेच शेजारच्या तेलंगणा राज्यातून आलेल्या आनंदमार्गी भक्तांसह दत्तभक्तांनी मंदिरात,व विविध ठिकाणी असलेल्या मठ...
🔱 ४ पानांच्या बिल्वपत्राचं महत्त्व: 🔱 Importance of 4-leaf Bilvapatra:

🔱 ४ पानांच्या बिल्वपत्राचं महत्त्व: 🔱 Importance of 4-leaf Bilvapatra:

नांदेड, धार्मिक
चार पानाचं (४ पानांचं) बिल्वपत्र हिंदू धर्मात विशेषतः शिव उपासनेत खूप महत्त्वाचं मानलं जातं. चला, त्याचं आध्यात्मिक, धार्मिक आणि प्रतीकात्मक महत्त्व समजून घेऊ: 🔱 ४ पानांच्या बिल्वपत्राचं महत्त्व: 1. शिवपूजेसाठी अत्यंत शुभ - बिल्वपत्र हे भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. सामान्यतः तीन पानांचं बिल्वपत्र वापरलं जातं, पण चार पानांचं बिल्वपत्र अत्यंत दुर्मीळ व पवित्र मानलं जातं. असं मानलं जातं की चार पानांचं बिल्वपत्र अर्पण केल्यास चार वेदांचा, चार युगांचा, किंवा चार पुरुषार्थांचा (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) आशीर्वाद मिळतो. 2. दुर्लभता आणि पुण्य - ४ पानाचं बिल्वपत्र सहज मिळत नाही, म्हणून ते मिळणं शुभ संकेत मानलं जातं. ते शिवलिंगावर अर्पण केल्यास दुर्लभ पुण्य फळ मिळतं. 3. धार्मिक ग्रंथांतील उल्लेख - काही पुराणांमध्ये वर्णन आहे की, "चतुर्दल बिल्वपत्र शिवाला अर्पण केल्याने सहस्र बिल्वप...
Ahilyadevi Holkar ; अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हरिपाठाचे तिनशे पुस्तके गोविंद गोरे यांच्या कडून वाटप

Ahilyadevi Holkar ; अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हरिपाठाचे तिनशे पुस्तके गोविंद गोरे यांच्या कडून वाटप

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l आषाढी एकादशीचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते गोविंद गोरे यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मातेच्या त्रिशताब्दी 300 व्या जयंती निमित्त हरिपाठाचे 300 पुस्तके जुना कौठा, नवीन कौठा भागात एका कार्यक्रमात 6 जूलै रोजी वाटप केली. नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर ,माजी नगरसेवक राजु गोरे,राजु पाटील काळे,जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे कौठ्याचे दानशूर व्यक्तिमत्व भगवानराव पाटील काळे, संजय पांडे डॉ.कळसकर लहान मोठे गावातील मित्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते.या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले. जुना कौठा गावांसह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात ही सामाजिक कार्यकर्ते गोविंद गोरे यांनी अनेक कार्यक्रम मध्ये सहभागी होत विविध उपक्रम अंतर्गत सहभागी होत व पुढाकार घेऊन मदत केली आहे....
Kanifnath Temple : कानिफनाथ देवस्थानच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी एकंबा ग्रामपंचायतीने दिला ठराव

Kanifnath Temple : कानिफनाथ देवस्थानच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी एकंबा ग्रामपंचायतीने दिला ठराव

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे एकंबा येथील कानिफनाथ महाराज देवस्थानच्या 60 एकर जागेवरील काही भागात अतिक्रमण झाले आहे. सदरचे अतिक्रमण हटवावे ( Ekamba Gram Panchayat passed a resolution to remove encroachment on the land of Kanifnath Temple) अशी मागणी एका निवेदनासह ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन सरपंच, ग्रामस्थांनी हिमायतनगरच्या तहसीलदार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथे कानिफनाथ देवस्थानाची 60 एकर जमीन आहे. दरवर्षी फाल्गुन दशमीच्या दिवशी नवनाथांपैकी एक असलेल्या कानोबा (कानिफनाथ) महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहाने भरविण्यात येते. याबाबत जुने जाणकार सांगतात कि, कानिफनाथ महाराजाने आपल्या सातशे शिष्यांसह धर्मप्रचाराचे काम निजामी राजवटीत केलं होते. तेंव्हापासुन दरवर्षी कान्होबाची काठी भ्रमंतीला निघते. विदर्भातील वेग...
Vasavi and Vanita Club CIDCO ; वासवी व वनिता क्लब सिडको यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने स्वरजंली प्रस्तुत गजर हरिनामाचा उत्साहात संपन्न

Vasavi and Vanita Club CIDCO ; वासवी व वनिता क्लब सिडको यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने स्वरजंली प्रस्तुत गजर हरिनामाचा उत्साहात संपन्न

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l वासवी व वनिता क्लब सिडको यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने स्वरजंली प्रस्तुत गजर हरिनामाचा भक्ती भाव गिताचा कार्यक्रमाला भाविक भक्तांनी ऊत्सफुर्त सहभाग घेत प्रतिसाद दिला या वेळी नावाजलेल्या मराठी भावगीते सादर करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे याही पंधराव्या वर्षी हडको येथील गोविंद गार्डन येथे 6 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता स्वराजंली प्रस्तुत गजर हरिनामाचा आयोजित करण्यात आला आहे. प्रारंभी माता कन्यका परमेश्वरी माता पुजन प्रमुख पाहुणे शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे,डॉ.नरेश रायेवार,हभप पिंटू महाराज, पत्रकार रमेश ठाकूर,दिगांबर शिंदे, छायाचित्रकार सारंग नेरलकर यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुर निरगांस हो गणपती,कानडा राजा पंढरीचा,विठु माऊली यासह भावगिते, भक्ती गायक व वादक कलाकार गोविंद कंधारे, नालंदा सांगविकर,मिरा रियाएईलवार,आकांक...
error: Content is protected !!