Thursday, May 21

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग 18(लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग 18(लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

धार्मिक, नांदेड, लेख
अमरनाथच्या गुहेतून ही लेखमाला दररोज प्रसिद्धी देण्यात येत होती. या लेखमाले ला वाचकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. ही लेखमाला वाचून वाचकांनी दिलेल्या असंख्य प्रतिक्रिया पैकी जागेअभावी निवडक प्रतिक्रिया या भागात प्रसिद्ध करण्यात येत आहे. - संपादक ज्येष्ठ पत्रकार विश्वास गुंडावार - "‘अमरनाथ गुहेतून’ वाचताना माझ्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष यात्रा उभी राहिली. शब्दांचा सुगंध, अनुभवांची गंधस्पर्शी रचना आणि हिमालयाचे हृदयात वितळणे – हे केवळ लेखन नाही, तर हे एक आध्यात्मिक पुनर्जन्म आहे." विकास रेनगुंटवार - "सहज, सरळ, पण परिणामकारक! संवादी शैली आणि ठिकाणांची समर्पक मांडणी. ओघवते पण त्रोटक नाही, पाल्हाळ नाही – म्हणूनच रसाळ आणि वाचनीय." डॉ. द्वारकादास नखाते - "१६ भाग एकाच दमात वाचले आणि जणू प्रत्यक्ष यात्रेत होतो. तुमची लेखणी हीच हिमालयाची ताकद आहे. बाबा भोलेनाथचं आशीर्वाद तुम...
four-faced Ganesha idol : एक दुर्मीळ व प्राचीन चतुरमुखी गणेश मूर्ती माहूर येथे खोदकामादरम्यान आढळून आली

four-faced Ganesha idol : एक दुर्मीळ व प्राचीन चतुरमुखी गणेश मूर्ती माहूर येथे खोदकामादरम्यान आढळून आली

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
चतुरमुखी गणेश मूर्ती म्हणजेच चार मुख असलेली गणपतीची मूर्ती, ही एक दुर्मीळ व विशेष धार्मिक महत्वाची रूप आहे. या प्रकारातील गणपतीला चार तोंडे असतात आणि ती चार दिशांकडे पाहणारी असतात. या मूर्तीला “चतुर्मुख गणपती” असेही म्हणतात. नांदेड| एक दुर्मीळ व प्राचीन चतुरमुखी गणेश मूर्ती नुकतीच माहूर स्थानिक खोदकामादरम्यान आढळून आली आहे. चार मुखांची ही अद्भुत मूर्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, भक्त, आणि पुरातत्त्वप्रेमींनी गर्दी केली आहे. अनेकांनी हे दैवी चिह्न समजत पूजा-अर्चा सुरू केली आहे. या घटनेची छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरातील पौराणिक भोजंता तलावा शेजारी असलेल्या पुरातन भगवान शिव शंकराच्या मंदिरा च्या पायथ्याशी पावसामुळे एक दगड वर आलेले काही नागरिकांना दिसले असता त्यांनी तेथे कुतूहलापोटी खोदकाम केले. त्या खोदकामात चतुर्थ ...
Ganeshotsav : राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

Ganeshotsav : राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

धार्मिक, उमरखेड, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे, मुंबई, लातूर
मुंबई| शेकडो वर्षाची घरगुती गणेशोत्सव परंपरा व अनेक वर्षापासूनची सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक समरसतेचे मानबिंदू आहे. त्यामुळे राज्यात आता गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे केली. मंत्री ॲड. शेलार म्हणाले, गणेशोत्सवाचे महत्त्व व ओळख संपूर्ण जगभर व्हावी, आपल्या परंपरेची आधुनिकतेशी सांगड व्हावी, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे गणेशोत्सव हे व्यासपीठ आणखी मजबूत व्हावे, गणेशोत्सवासंबंधी सर्व घटक एकत्र जोडले जावेत, पर्यटन वाढावे, आपल्या समृद्ध परंपरा रितीरिवाजांचे जतन-संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राचे स्थान जगाच्या नकाशावर ठळक व्हावे, यासाठी गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्याच्या आर्थिक, ...
Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग 16(लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग 16(लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

धार्मिक, नांदेड, लेख
प्रवासाचा शेवट … पण आठवणींची सुरुवात! रात्री साडेअकरा वाजता मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस गाठली. तिकिटं दोन महिने आधीच काढलेली होती, त्यामुळे मनावर कोणतंच टेन्शन नव्हतं. बर्थवर अंग टाकताच शरीर शांत झालं आणि मनही निवांत झोपेत गेलं. ( From Amarnath Cave – Part 16 (Author: Dharmabhushan Adv. Dilip Thakur)) सकाळी साडेसातला भोपाळ स्टेशनवर माझे स्नेही, उद्योगपती प्रदीप शुक्ला यांनी भव्य असा नाश्ता आणून दिला, एवढा चविष्ट की थेट एखाद्या फाइव्ह स्टार अमेरिकन ब्रेकफास्टची आठवण झाली. २४ वर्षांपूर्वी रेल्वे प्रवासात झालेली ओळख आजही अशीच घट्ट टिकून आहे! दरवर्षी ते स्वतः न चुकता स्टेशनवर हजेरी लावतात, नाश्त्याची व्यवस्था करतात. भेटीवेळी त्यांच्या हातून सत्कार स्वीकारला आणि त्यांच्या प्रेमाचा आशीर्वाद घेतला. शेवटचे क्षण, पण स्वादिष्ट आठवणी भुसावळ येथे बापू महाजन, ऍड. निर्मल दायमा, सरदार सुरज...
Rashtrasant Tukadoji Maharaj : हिमायतनगर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारकात गुरुपौर्णिमा साजरी

Rashtrasant Tukadoji Maharaj : हिमायतनगर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारकात गुरुपौर्णिमा साजरी

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर| येथील पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारकात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला- पूरूष भजनी मंडळी सभागी झाली होती. शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारकामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. प्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या परिमल पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. गोपाळराव महाराज मूरझळेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जिवण चरित्रावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जण जागरण भजन संग्रह लिहणारे कवी, लेखक विठ्ठलराव फुलके हे होते. त्यानंतर दिवसभर भजनी मंडळाचा कार्यक्रम रंगला यात रमेश मणिराम, गंगाधर वाघमारे, सौ.सविताबाई हरडपकर, पोतन्ना गड्डमवार, चांदराव बनसोडे, राजू राहुलव...
Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १५ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १५ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

धार्मिक, नांदेड, लेख
यात्रेचे अखेरचे क्षण... स्मरणरंजनाचा सोहळा अमरनाथ यात्रेचे शेवटचे दोन दिवस उजाडले होते. पहाटे तीनला वेक-अप कॉल... पण हॉटेल 'नय्यर' मधील विश्रांतीमुळे उठायला कोणालाही आळस वाटला नाही. प्रत्येकाने ₹२०० देऊन ऑटो केले, आणि वेळेत पोहोचलो अमृतसर रेल्वे स्थानकावर. पावणे पाचला शताब्दी एक्सप्रेस सुरू झाली. रेल्वेने दिलेला नाश्ता नुकताच संपला, इतक्यात लुधियानात कुलदीपसिंह सरदारजीने छोले-कुलचे प्रेमाने भरवले. त्यांचा आग्रह नाकारणं अशक्यच होतं! दिल्ली – उकाड्यातून थेट आदरातिथ्याच्या सजीव छायेत! सकाळी अकरा वाजता पोहोचलो दिल्लीला... प्लॅटफॉर्म १ वर उतरून, १६ वर असलेल्या पार्किंगपर्यंत पोहोचणं म्हणजे सामानाच्या युद्धात उतरणं! हमालांचे दर गगनाला भिडले, पण राजूभाऊंच्या हुशारीने "नाटक केले – बॅग उचलण्याचे" आणि दर गडगडले! वरुणराजाची कृपा झाली – पावसाच्या सरी कोसळल्या आणि दिल्लीचं वातावरण सुखावलं. लाल किल...
Balayogi Venkat Swami Maharaj : मंदिराची पवित्रता टिकवणे ही फक्त व्यवस्थापनाचीच नव्हे, तर प्रत्येक भाविकाचीही समान जवाबदारी  – बालयोगी व्यंकट स्वामी महाराज

Balayogi Venkat Swami Maharaj : मंदिराची पवित्रता टिकवणे ही फक्त व्यवस्थापनाचीच नव्हे, तर प्रत्येक भाविकाचीही समान जवाबदारी – बालयोगी व्यंकट स्वामी महाराज

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार | भक्तीमार्ग हि अंधश्रद्धा नाही हा विज्ञानाचा भाग आहे. कोणत्याही मंदिरामध्ये दर्शनासाठी जाताना भाविकांनी गर्भ ग्रहात थेट प्रवेश करू नये. कुणाला आतमध्ये जायचे असेल तर मंदिराचे पावित्र्य जपन्यासाठी ओल्या कपड्यात भगवंताचे दर्शन करावे. पावित्र्य जपता येत नसेल तर बाहेरूनच दर्शन करावे. मंदिराची पवित्रता टिकवणे ही फक्त व्यवस्थापनाचीच नव्हे, तर प्रत्येक भाविकाचीही समान जवाबदारी आहे, आणि ती कटाक्षाने पाळली गेली पाहिजे असे आवाहन परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी केले. ते हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात पवित्र श्रावण महिन्यात अखंडपणे महिनाभर चालणाऱ्या ॐ नमः शिवाय नाम जाप यज्ञाच्या अनुषंगाने मंगळवारी झालेल्या बैठकीत उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. मंदिरात आगमन होताच प्रथमत स्वामींजींनी श्री परमेश्वर मूर्तिच मनोभावे दर्शन घेतलं, त्यानंतर व्य...
Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग 14(लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग 14(लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

नांदेड, धार्मिक, लेख
अमृतसर दर्शन, उकाडा विरुद्ध उत्साह सकाळी निवांत ८ वाजता उठलो. विजया दत्ता खानसोळे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांना आग्रहाने नाश्ता दिला.काश्मीर मधील अंगाला झोंबणारी थंडीचा अनुभव घेतल्यानंतर अमृतसरची गर्मी असह्य झाली होती. तरी देखील उकाडा बाजूला टाकत सर्वांनी प्रखर श्रद्धेने "जलियानवाला बाग" पाहिलं., “अहिंसेचा मंत्र जपला… पण इथली हिंस्र सत्यकथा डोळ्यात पाणी आणणारी.” स्वर्ण मंदिर: आदराचे दर्शन प्रत्येक वर्षीप्रमाणे पगडी बांधायची परंपरा सुभाष देवकत्ते यांनी जपली.स्वर्ण मंदिर चे इन्फॉर्मेशन ऑफिस गाठलं. तिथे माझे स्नेही, ज्येष्ठ पत्रकार सरदार चरणजीतसिंघ अरोरा तसेच पीआरओ सरदार रणभिरसिंघ यांची भेट झाली. विशेष दर्शनाची सोय झाली. धार्मिक पुस्तकेही सर्वांना भेट म्हणून दिली गेली. स्वर्ण मंदिरात मस्तक टेकवून मन तृप्त आणि मनगट सजग! बहुतेक गोल्डन टेम्पल चे लंगर जगातले सर्वात मोठे लं...
Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १३ (लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १३ (लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

नांदेड, धार्मिक, लेख
योगायोगाने लाभलेले शक्तिपीठ दर्शन आणि भोलेबाबाच्या यात्रेचा सेवाभावी मंत्र आजच्या दिवशी अमृतसरमध्ये पोहोचणे एवढेच उद्दिष्ट होते, त्यामुळे सर्वांना निवांत उठण्याच्या सूचना रात्रीच दिल्या होत्या. तरीही काही जण लवकर उठून पुन्हा एकदा रघुनाथ मंदिराचे दर्शन घेऊन आले.साडे नऊच्या सुमारास प्रत्येकाने ₹५० भरून कुछवाणी चौकात थांबलेल्या मोठ्या बसेसपर्यंत पोहोचलो. तिथे श्री अमरनाथजी लंगरचे पदाधिकारी आमच्या वाटेकडेच पाहत होते. त्यांनी प्रेमाने आग्रह करून आम्हाला लंगरमध्ये नाश्तासाठी नेले. खरेतर नाश्ता म्हणण्यापेक्षा भरपेट गरमागरम जेवणच मिळाले चिची माता शक्तिपीठ दर्शन दोन्ही बसेस अमृतसरकडे निघाल्या. कोणतेही विशेष साईटसीन नसल्यामुळे ज्ञानोबा जोगदंड यांना विचारल्यावर त्यांनी "चिची माता मंदिर" सुचवले. हे मंदिर जम्मूपासून ३३ किमी अंतरावर सांबा जिल्ह्यात वसलेले असून एक प्राचीन शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आह...
Shri Parmeshwar Temple : पवित्र श्रावण मासानिमीत्त हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन

Shri Parmeshwar Temple : पवित्र श्रावण मासानिमीत्त हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| वाढोणा शहराचे जागृत देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात पवित्र श्रावण मासानिमित्त २७ जुलै ते २१ ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत संगीतमय भागवत कथा, संगीतमय संत चरित्र कथा आणि संगीतमय शिवपुराण कथा असे विविध धार्मिक सप्ताह कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वाढोणा येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंदिर कमिटीच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. याची सुरुवात संगीतमय भागवत कथेने दि.२७ जुलै रविवार पासून होणार आहे. भागवत कथेने प्रवचन हभप. भागवताचार्य परमपूज्य विदर्भ केशव स्वामी सारंग चैतन्यजी महाराज रा. अमरावती यांच्या मधुर वाणीतून होणार आहे. भगवान श्रीकृष्ण लीलांचे वर्ण...
error: Content is protected !!