The people’s election! ; लोकांनी आपल्या हाती घेतलेली लोकनिवडणूक – NNL
लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल जाहीर झाला आणि ही निवडणूक लोकांनीच हाती घेतली होती, अशी चर्चा रंगू लागली. भाजप आणि मित्रपक्षांच्या पराभवाची कारणमीमांसा होऊ लागली; मात्र निवडणूक निकालापूर्वीच कोण येणार आणि कुणाला घरचा रस्ता दाखवला जाणार यांचे आडाखे मोठ्या प्रमाणावर बांधले जाऊ लागले होते. मिडियाच्या एक्झिट पोलचे सगळे अंदाज फोल ठरले असले तरी पारावरच्या, चावडीवरच्या आणि चौका चौकातल्या सर्वसामान्यांच्या गप्पा इतक्या रंगल्या होत्या की लोकांनी आपले स्वतःचे एक्झिट पोल तयार केले होते.
भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात पूर्णांशाने लोकशाही नांदावी, तिची पाळेमुळे खोलवर रुजावीत अशी लोकशाहीप्रेमीची धारणा असते. लोकशाहीची व्याख्याही आपण तशा प्रकारचीच करतो. एकमेकांना सांगत असतो. मात्र, गेल्या काही दशकांत लोकशाहीप्रणीत आणि लोकशाहीप्रधान निवडणूक ही लोकांची राहिलेली नाही. ही खूपच गंभीर बाब आहे. येनकेन प्रकारे...









