Friday, May 15

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Balaji bacchewar ; नायगांवसह जिल्हाभरातील अतिवृष्टीची तातडीने पहाणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्या -NNL

Balaji bacchewar ; नायगांवसह जिल्हाभरातील अतिवृष्टीची तातडीने पहाणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्या -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। नायगांव विधानसभा मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यात गत दोन-तिन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून याबाबत तातडीने पहाणीसह नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश नांदेडचे जिल्हाधिकारी यांना द्यावेत असे साकडे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांना भाजपा नेते बालाजी बच्चेवार यांनी निवेदनातून घातले आहे. नांदेड जिल्ह्यातील गत तिन दिवसात मोठ्या प्रमाणात संततधार पावसाने झालेली व संभाव्य आपत्ती निवारणासाठी पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांना आज तातडीने ई-मेल द्वारे निवेदनातून भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी लक्ष वेधले आहे. गत दोन ते तिन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मूख्यत्वे नायगांव विधानसभा मतदारसंघात संततधार पाऊस सुरु आहे.परंतू,जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी पर्जन्यमान कमी असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. गत काही वर्षातील परिस्थिती पहाता अत...
Provide immediate financial assistance to the farmers  ; नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना तात्काळ आर्थिक मदत द्या – NNL

Provide immediate financial assistance to the farmers ; नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना तात्काळ आर्थिक मदत द्या – NNL

राजकीय, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना द्यावेत आणि शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. खासदार डॉ. गोपछडे यांनी निवेदनात नमूद केले आहे की. नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. नांदेड जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून पुराचे पाणी शेतात घुसल्यामुळे शेतीचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सततच्या पडणार्‍या पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी साचले आहे. शेतकर्‍यांचे नगदी पीक असलेले मुग  काढणीला आले असताना ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकर्‍यावर ही नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे. आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी या नैसर्गिक...
President Draupadi Murmu ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा बुधवारी नांदेड दौरा  उदगीर येथील बुद्धविहाराच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती – NNL

President Draupadi Murmu ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा बुधवारी नांदेड दौरा  उदगीर येथील बुद्धविहाराच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती – NNL

नांदेड, राजकीय, लातूर
नांदेड| लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बुद्ध विहाराचा उद्घाटन कार्यक्रम 4 सप्टेंबर 2024 रोजी होत आहे. या कार्यक्रमाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहेत. उदगीर येथे जाण्यापूर्वी त्यांचे नांदेड विमानतळावर बुधवार 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.25 वाजता आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10.35 वा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या हेलिकॉप्टरने उदगीर येथील बुद्धविहार उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रयाण करतील. बुद्ध विहाराच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान व शासन आपल्या दारी या संयुक्त अभियानात त्या सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध...
Nana Patole ; मराठवाड्यातील पूरस्थितीची गांभिर्याने दखल घेऊन तातडीने मदत पाठवा: नाना पटोले. – NNL

Nana Patole ; मराठवाड्यातील पूरस्थितीची गांभिर्याने दखल घेऊन तातडीने मदत पाठवा: नाना पटोले. – NNL

राजकीय, मुंबई
मुंबई|  मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते व पुल वाहून गेल्याने मराठवाड्यातील अनेक गावांचा इतर भागाशी संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्याने शेतातील उभे पिक वाहून गेल्याने खरीप हंगामही वाया गेला.  शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. नद्या, नाल्यांना पूर आला आहे. सरकारने इव्हेंटबाजी व जाहिरातबाजी बाजूला ठेवून मराठवाड्यातील पूरग्रस्त लोकांना तातडीने मदत पोहचवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मागील दोन दिवसापासून मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. हजारो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली, घरांची पडझडही झाली आहे. मराठवाड्याला पुराने वेढले आहे. पुरग्रस्त लोकांना मदतीची ...
Nitin Gadkari : नितीन गडकरींना राष्ट्रीय महामार्ग 361 संदर्भातील समस्या बाबत निवेदन -NNL

Nitin Gadkari : नितीन गडकरींना राष्ट्रीय महामार्ग 361 संदर्भातील समस्या बाबत निवेदन -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| केंद्रीय रस्ते व वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिनांक एक सप्टेंबर रोजी नागपूर येथे जानापुरी तालुका लोहा येथील शिष्टमंडळाने भेट घेत नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 361 वरील जाणापुरी येथील ओहर ब्रिज प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी श्री.गडकरी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत विनाविलंब संबंधित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.उपस्थित सामाजिक कार्यकर्ते मोतीराम काळे पांडुरंग कदम उत्तम कदम भुजंग कदम प्रभाकर कदम बालाजी कदम हे उपस्थित होते याबाबत सविस्तर वृत्त असे की, जानापूरी हे गांव राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वर आहे हे गाव तुळजापूर ते लातूर ते नांदेड ते बुट्टीबोरी या रस्त्यावर आहे. या गावची वस्ती हि दोन्ही बाजुने आहे तसेच या गावावरुन 10 ते 12 गावाची ये-जा तसेच शाळा, कॉलेज, बँकेला जाणे-येणे व पुर्वेकडे रत्नेश्वरी दे...
EVM voting machines ; विधानसभेसाठी ईव्हीएम मतदान यंत्रे तयार – NNL

EVM voting machines ; विधानसभेसाठी ईव्हीएम मतदान यंत्रे तयार – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या मतदार यंत्रांची तपासणी करून ते मतदानासाठी सज्ज करण्यात आले आहेत. दिनांक 1 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2024 या दरम्यान मतदान यंत्रे तयार करण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम ,MIDC, ढवळे कॉर्नर नांदेड येथील जिल्हा वेअर हाऊस येथे चालू होते. सदरील कामकाज दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी पूर्ण पूर्ण करण्यात आले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने BU 7010, CU 3922, VVPAT 4231 इतके मतदान यंत्रे जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघासाठी तयार करण्यात आली आहेत. सदरील कामकाज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने व त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांनी पार पाडले.त्यामध्ये नायब तहसीलदार भोसीकर मुखेड, नायब तहसीलदार विजयकुमार पोटे, ...
Dr. Ankush Devasarkar joined the Shiv Sena : डॉ.अंकुश देवसरकर यांचा शिवसेनेत प्रवेश; हाती शिवधनुष्य घेतले; काँग्रेसला मोठा धक्का-NNL

Dr. Ankush Devasarkar joined the Shiv Sena : डॉ.अंकुश देवसरकर यांचा शिवसेनेत प्रवेश; हाती शिवधनुष्य घेतले; काँग्रेसला मोठा धक्का-NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| काँग्रेसचे नेते डॉ.अंकुश देवसरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासात्मक धोरणावर प्रभावित होऊन हिंगोली लोकसभा शिवसेनेचे माजी खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. प्रवेशानंतर पहिल्यांदा नांदेड रेल्वेस्थानकावर त्यांच आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेला शिवसेनेतील पक्ष प्रवेश हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात नवीन चेहरा देण्यासाठी आणि निवडणूक आखाड्यात उतरण्यासाठी तर नाही ना..? अशी चर्चा राजकीय गोटात होऊ लागली आहे. दरम्यान डॉ अंकुश देवसरकर यांचा प्रवेश हदगाव विधानसभा लढविण्यासाठी अगोदरपासून तयारीत असलेल्या इछुकांच्या आशेवर पाणी फिरविणारा असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीपूर्व...
Pradeep Naik : तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह घरोघरी पोहचविण्यासाठी मा. आ. प्रदीप नाईकांचे कार्यकर्ते लागले कामाला; मतदारांकडून चांगला प्रतिसाद -NNL

Pradeep Naik : तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह घरोघरी पोहचविण्यासाठी मा. आ. प्रदीप नाईकांचे कार्यकर्ते लागले कामाला; मतदारांकडून चांगला प्रतिसाद -NNL

नांदेड, राजकीय
शिवणी, भोजराज देशमुख| यावर्षी दिवाळीच्या नंतर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होतील असे नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यावर यात विविध राजकीय पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले असून.किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या गाव तिथे बुथ व तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी चिन्ह घरोघरी पोहचविण्यासाठी अभियानाला सुरुवात केली असून मतदार संघातील प्रत्येक मतदारापर्यंत कार्यकर्त्यांनी जाऊन आपल्या निशाणीची ओळख करून द्यावे असे सूचना माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले आहे. त्याच अनुषंगाने किनवट तालुक्यातील ईस्लापुर जिल्हा परिषद सर्कल मध्ये मागील काही महिन्यांपासून माजी आमदार प्रदीप नाईक यांनी पक्ष वाढीसाठी व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद पवार गटाला नव्याने...
Nanded Model : माता व बाल संगोपन विषयात ’नांदेड मॉडेल’ देशपातळीवर यशस्वी करु -NNL

Nanded Model : माता व बाल संगोपन विषयात ’नांदेड मॉडेल’ देशपातळीवर यशस्वी करु -NNL

नांदेड, आरोग्य, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील नागरिकांच्या विशेषतः महिला व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुरेपूर काळजी घेण्याची गरज असून भविष्यात नांदेड जिल्हा आरोग्य संपन्न म्हणून देशपातळीवर ओळखला जावा, नांदेड मॉडेल विकसित करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणावी यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या सोबत प्रदीर्घ अभ्यासपूर्ण चर्चा केली. खा.डॉ.अजित गोपछडे यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नांदेड जिल्ह्यातील आरोग्याच्या विषयावर चर्चा करून सद्यस्थितीवर माहिती जाणून घेतली. देशात नांदेड जिल्हा हा आरोग्य संपन्न करण्यासाठी ’नांदेड मॉडेल’ विकसित करण्याबाबत योजना तयार करण्याच्या मुद्यावर विस्ताराने चर्चा झाली. जिल्ह्यातील महिलांचे आरोग्य, कुपोषित मुलांना सकस आहार, गर्भ ...
Vanchit Bahujan Aghadi marches : सर्व सामान्य जतनेच्या हिताच्या हिमायतनगरात वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा; नागरिकांचा प्रतिसाद -NNL

Vanchit Bahujan Aghadi marches : सर्व सामान्य जतनेच्या हिताच्या हिमायतनगरात वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा; नागरिकांचा प्रतिसाद -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील समाज हिताचे विविध प्रश्न घेवून हिमायतनगर तहसिलवर दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्षा श्रीमती रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने आणि प्रदेश उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, राजेश्वर हत्तीआंबोरे पालमकर (जिल्हा वं.ब.आ.) यांच्या उपस्थितीत हिमायतनगर तालुक्यचे उभारते नेतृत्व दिलीप आला राठोड यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी हिमायतनगर तालुका शाखेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला महिला पुरुष नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान तळपत्या उन्हात आंदोलनकर्ते निवेदन देण्यासाठी बसले असताना तहसीलदार हे आले नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठानी तहसीलदार यांचा निषेध करून निवेदन न देता मोर्चाचा समारोप केला आहे. दरम्यान पोलिसांनी मोर्चाच्या संदर्भाने चांगला बंदोबस्त लावला हो...
error: Content is protected !!