HomeनांदेडDr. Ankush Devasarkar joined the Shiv Sena : डॉ.अंकुश देवसरकर यांचा शिवसेनेत...

Dr. Ankush Devasarkar joined the Shiv Sena : डॉ.अंकुश देवसरकर यांचा शिवसेनेत प्रवेश; हाती शिवधनुष्य घेतले; काँग्रेसला मोठा धक्का-NNL

नांदेड,अनिल मादसवार| काँग्रेसचे नेते डॉ.अंकुश देवसरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासात्मक धोरणावर प्रभावित होऊन हिंगोली लोकसभा शिवसेनेचे माजी खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. प्रवेशानंतर पहिल्यांदा नांदेड रेल्वेस्थानकावर त्यांच आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेला शिवसेनेतील पक्ष प्रवेश हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघात नवीन चेहरा देण्यासाठी आणि निवडणूक आखाड्यात उतरण्यासाठी तर नाही ना..? अशी चर्चा राजकीय गोटात होऊ लागली आहे. दरम्यान डॉ अंकुश देवसरकर यांचा प्रवेश हदगाव विधानसभा लढविण्यासाठी अगोदरपासून तयारीत असलेल्या इछुकांच्या आशेवर पाणी फिरविणारा असल्याचे बोलले जात आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक लढविण्याची तयारी करून काँग्रेसचे नेते डॉ.अंकुश देवसरकर यांनी मतदार संघात पकड मजबूत केली होती. त्यातल्या त्यात हदगाव – हिमायतनगर विधानसभेत त्यांनी कार्यकर्त्यांची एक मोठी फळी निर्माण केली होती. मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीच्या उबाठा गटाला सुटल्याने डॉ.अंकूश देवसरकर यांचे निवडणूक लढविण्याचे स्वप्न भंगले होते. राजकीय क्षेत्रात पाय ठेवलेले डॉ. अंकूश देवसरकर यांनी माघार न घेता आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच हदगाव – हिमायतनगर मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे हेरून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या संकल्पनेला पूर्ण करण्यासाठी सध्याचे शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विविध विकास कामे सुरु आहेत. त्यांच्याकडून घेतले जाणारे सर्व सामान्य, गोर गरिबांसाठीचे निर्णय नक्कीच पुढील पाच वर्षात विकसित भारत करण्यासाठी उपयोगी पडतील. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासात्मक निर्णय व धोरणाला प्रेरित होऊन शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करून शिव धनुष्य हाती घेतल असल्याचे डॉ अंकुश देवसरकर यांनी सांगितले आहे.

हिंगोलीसह हदगाव हिमायतनगरवर सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे मोठे नेते डॉ.अंकुश देवसरकर यांनी मोठी पकड निर्माण केल्यानंतर शिंदेसेनेत जाहीर प्रवेश करून शिव धनुष्य हाती घेतल आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला हाथ दाखवून त्यांनी एक मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाने राजकीय गोटात खळबळ उडाली असून, शिंदे गटाकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेक इच्छुकांची मात्र झोप उडाली आहे. डॉ.अंकुश देवसरकर यांनी पक्ष जे आदेश देईल त्यावर ठाम राहून पक्ष वाढीसाठी कार्य करणार असल्याची सावध प्रतिक्रिया दिली आहे. मात्र डॉ.अंकुश देवसरकर यांचा पक्ष प्रवेश म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे. येणाऱ्या सण – उत्सवाच्या काळात ते हदगाव – हिमायतनगर मतदार संघात भेटी देण्यासाठी आले तर नवल वाटायला नको. एकूणच डॉ.अंकुश देवसरकर यांच्या रूपाने हदगाव हिमायतनगर मतदार सांगला नवा चेहरा मिळणार आहे असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर डॉ.अंकुश देवसरकर हे  नांदेड रेल्वे स्थानकावर उतरले असता कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं, तसेच त्यांच्या निवासस्थानी फटाक्याची आतिषबाजी आणि पुष्पवृष्टी करत डॉ.अंकुश देवसरकर यांना त्यांच्या पुढील राजकिय कारकीर्दीस शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली असल्याचे पाहावयास मिळाले आहे. यावेळीं शिवराज बोंढारे महानगर संघटक, शंकर पिनोजी जिल्हा संघटक, बिल्लू यादव उप जिल्हाप्रमुख, अशोक देशमुख कामगार सेना जिल्हाध्यक्ष, विकास देशमुख युवासेना उपजिल्हाप्रमुख, रवी नरवाडे शहर प्रमुख कामगार सेना, कृष्णा वानखडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments