Saturday, May 16

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Rauf zamindar Ncp ; नांदेड उत्तर विधानसभेसाठी रऊफ जमीनदार यांनी केली राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची मागणी -NNL

Rauf zamindar Ncp ; नांदेड उत्तर विधानसभेसाठी रऊफ जमीनदार यांनी केली राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची मागणी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। आगामी विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाकडून आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षाच्या युवक आघाडीचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी पक्षश्रेष्ठीला केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने मतदारसंघनिहाय ईच्छूकांकडून अर्ज मागणी सुरु असल्याने पक्षाच्या युवक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी आपला मागणी अर्ज पक्षश्रेष्ठीला दिला आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्याकडून पुरोगामी विचारांचा वारसा जोपासला जात असल्यानेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ.जयंत पाटील व युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्याशी समन्वय साधून पक्षाचे स्थानिक जेष्ठ नेते व माजी मंत्री कमलकिशोर कदम यांचे खंदे समर्थक म्हणून सुपरिचित...
Dhanegaon and Sonkhed : धनेगाव व सोनखेड येतील तीन वर्षांपासून रखडलेल्या कामासाठी राष्ट्रीय महामार्गाचे काम नवीन प्रस्तावानुसार करा -NNL

Dhanegaon and Sonkhed : धनेगाव व सोनखेड येतील तीन वर्षांपासून रखडलेल्या कामासाठी राष्ट्रीय महामार्गाचे काम नवीन प्रस्तावानुसार करा -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| धनेगावमधून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्र.361 मुळे या परिसरातील रहिवाशीयांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागणार असून कायमस्वरूपी अडचणी सोडवण्यासाठी महामार्गाच्या उर्वरित कामास स्थगिती देऊन नवीन प्रस्तावानुसार महामार्गाचे काम करण्यासर संबंधित प्राधिकरणाला आदेशीत करावे अशी मागणी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. आ. मोहनराव हंबर्डे यांनी निवेदनात नमुद केले की,या महामार्गामुळे येणार्‍या अडचणींबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वेळोवेळी लक्ष वेधले असतानाही संबंधित अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. संबंधित अधिकारी ग्रामस्थांची दिशाभूल करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.धनेगाव येथील स्मशान भूमी ही राष्ट्रीय महामार्ग 361 च्या उत्तरेस आहे आणि गाव पूर्ण दक्षिणेस आहे,त्यामुळे अंत्यव...
Satish Deshmukh : काँग्रेसने सतीश देशमुख यांना उमेदवारी द्यावी,निवडून आम्ही देऊ -NNL

Satish Deshmukh : काँग्रेसने सतीश देशमुख यांना उमेदवारी द्यावी,निवडून आम्ही देऊ -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मधून काँग्रेसने सतीश देशमुख तरोडेकर यांना उमेदवारी द्यावी, निवडून आम्ही देऊ असा विश्वास वाढदिसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या समर्थकांनी व्यक्त केला. माजी उपमहापौर तथा काँग्रेसचे नांदेड उत्तरचे विधानसभा निवडणुकीतील प्रबळ दावेदार श्री सतीश पुंडलिकराव देशमुख तरोडेकर यांचा वाढदिवस नांदेड येथे त्यांच्या मित्र परिवाराने मोठ्या स्वरुपात साजरा केला. शुभेच्छा देण्यासाठी नांदेड उत्तर मधील कार्यकर्ते, ग्रामीण व शहरी भागातील शुभ चिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर नांदेड उत्तर मध्ये सतीश देशमुख यांनी परिवर्तन संकल्प यात्रा काढली असून विकास व जन सामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नांदेड उत्तर मधून काँग्रेस कडे सतीश देशमुख तरोडेकर यां...
Mr. Mohanrao Hambarde built a toran made of Shree Phala ;आगामी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री होण्यासाठी गणपतीरायाल साकडे -NNL

Mr. Mohanrao Hambarde built a toran made of Shree Phala ;आगामी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री होण्यासाठी गणपतीरायाल साकडे -NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेडl आगामी होणा-या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री होण्यासाठी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी हडको भागातील नवसाला पावणारा शिव गणेश मंदिरात विधीवत पुजन करून श्री फळाचे तोरण बांधत साकडे घेतले यावेळी महाराणा प्रताप गणेश मंडळ येथे महाआरती केली. गणेशोत्सव निमित्ताने ११ सप्टेंबर रोजी नांदेड दक्षिण आमदार मोहनराव हंबर्डे यांनी हडको भागातील नवसाला पावणारा शिव गणेश मंदिरात विधीवत पुजन, महा अभिषेक,करून आगामी विधानसभा निवडणुकीत पुनश्च महा विकास आघाडीच्या मुख्यमंत्री होण्यासाठी गणपतीदेवाला साकडे घालून श्री फळाचे तोरण बांधले, यावेळी ॲड जे पी.पाटील,माजी नगरसेविका डॉ. करूणा जमदाडे,ज्योती कदम, भारतीय कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष ब्रिज लाल उगवे, गोल्डी जमदाडे, राम देशपांडे, संभाजी पाटील बेटमोगरेकर, एस.पी. कुंभारे,उपस्थित होते. महाराणा प्रताप गणेश मंड...
Hadgaon, Himayatnagar Assembly : हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडी नवा पर्याय देण्याच्या मार्गावर -NNL

Hadgaon, Himayatnagar Assembly : हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडी नवा पर्याय देण्याच्या मार्गावर -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदार संघात सत्ता परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. आजी माजी आमदाराच्या कार्यप्रणालीवर नाखूष जनता नव्या चेहऱ्याची वाट पाहत असून, वंचित आघाडीकडून अनेकजण अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करीत असले, तरी वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांची भुमिका निर्णायक ठरत असते. परवाच अँड. प्रकाश आंबेडकर हे नांदेड दौर्‍यावर असताना त्यांनी डाॅ. श्यामराव वाकोडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन अनेक विषयांवर चर्चा केली. त्यामुळे हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडी नवा पर्याय देण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. आता विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अँड. आंबेडकर यांची डाॅ. वाकोडे यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट आगामी विधान सभेची उमेदवारी त्यांना बहाल करण्यासाठीच होती अशी चर्चा रंगत असतानाच फक्त घोषणेची औपचारिकताच बाकी असल्याचे, त्यांच्या ...
Give financial assistance : शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजाराची, मनपा हद्दित 25 हजाराची आर्थिक मदत द्या -NNL

Give financial assistance : शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजाराची, मनपा हद्दित 25 हजाराची आर्थिक मदत द्या -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| मागील आठवड्यामध्ये नांदेड तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. तसेच नांदेड शहरात अनेक सकल भागात नागरिकांच्या घरात पाणी गेल्यामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये तर मनपा क्षेत्रात प्रती कुटूंबास 25 हजार रूपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्या नेतृत्वाखाली निवासी जिल्हाधिकारी महेशकुमार वडदकर यांना दि.10 सप्टेंबर रोजी निवेदन देवून करण्यात आली. नांदेड तालुक्यात अतिवृष्टीचा पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मुग, कापूस, ज्वारी इतर शेतीतील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांना तात्काळ हेक्टरी 50 हजार रूपये आर्थिक मदत द्यावी तसेच नांदेड महानगरपालिका हद्दित अतिवृष्टीच्या पावसाने घरांचे नुकसान...
Dr. Rekhatai Chavan : हिमायतनगर नगरपंचायत शहरातील सांडपाण्याचे नियोज करण्यात अपयशी – डॉ. रेखाताई चव्हाण -NNL

Dr. Rekhatai Chavan : हिमायतनगर नगरपंचायत शहरातील सांडपाण्याचे नियोज करण्यात अपयशी – डॉ. रेखाताई चव्हाण -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपाच्या पेरणीतील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही घरांची पडझड झाली तर अनेकांच्या घरात चक्क पाणी शिरले. नैसर्गिक संकटाला आपण कोणीही रोखू शकत नाही. परंतु प्रशासनाने जर सुयोग्य नियोजन केलं तर नागरिकांची होणारी गैरसोय व तसेच हेळसांड मात्र रोखता येणं शक्य आहे. हिमायतनगर नगरपंचायत याबाबतीत मात्र अपयशी ठरली असून, शहरातील अनेक घरांमध्ये अतिवृष्टीच्या पावसाचे नाल्यातील दुर्गंधियुक्त ड्रेनेजचे पाणी घरात शिरून ग्रुपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. आठ दिवसानंतरही पाणी ओसरायचे काही नाव घेत नाही. यामुळे नागरी वसाहतीमध्ये दुर्गंधी पसरली आणि अनेक जण आजारी पडताना दिसून येत आहेत. महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्हा प्रभारी डॉ. रेखाताई चव्हाण या मतदार संघात दौरा करत आहेत. हा दौरा करत असताना त्यांनी...
Pranitatai Devare Chikhlikar : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लोहा – कंधार तालुक्यात १ लक्ष १८ हजार लाभार्थी – प्राणिताताई देवरे चिखलीकर -NNL

Pranitatai Devare Chikhlikar : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लोहा – कंधार तालुक्यात १ लक्ष १८ हजार लाभार्थी – प्राणिताताई देवरे चिखलीकर -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्ग लोहा तालुक्यात ६०हजार २७० तर कंधार तालुक्यात ५८हजार ६९२ असे एकूण १ लक्ष १८हजार ९६२ लाभार्थी पात्र ठरले आहेत या बैठकीत ४४ हजार १६४ पात्र लाभार्थ्यांना अपरोव्हल देण्यात आले आहे .जे अर्ज त्रुटीत आहे त्याची पूर्तता करण्यात यावी. तसेच य योजनेचा जास्तीत जास्त महिला भगिनींना लाभ मिळाला पाहिजे. असे सांगून अधिकारी ,कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लोहा विधानसभा अध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले आहे. लोहा तहसील कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लोहा विधानसभा अध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, बीडीओ डी के आडेराघो, कंधार नायब तहसीलदार रेखा चामनर, लोहा नायब तहसीलदार अशोक मोकल...
Planning committee ; किनवट तालुक्यातील नियोजन समितीवर चार भाजपा पदाधिकाऱ्यांची वर्णी -NNL

Planning committee ; किनवट तालुक्यातील नियोजन समितीवर चार भाजपा पदाधिकाऱ्यांची वर्णी -NNL

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे। नांदेड जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी किनवट तालुक्यातील चार भाजप पदाधिकाऱ्यांची नांदेड जिल्हा नियोजन समितीवर घेण्यासंदर्भात दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी नांदेड जिल्हा अधिकारी व सचिव यांना पत्र पाठवून सदरील चार पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासंदर्भात कळविले. आदिवासी दुर्गम भाग असलेल्या किनवट तालुक्यातील एकाच वेळी चार सदस्यांना नियोजन समिती घेण्याची ही पहिलीच वेळ असावी आतापर्यंत कुठल्याही शासनाने किनवट तालुक्याला या पद्धतीचा न्याय दिला नव्हता त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्येआनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यामध्ये खालील भाजप पदाधिकाऱ्यांचा समावेश असून महिला पैकी संध्याताई प्रफुल राठोड, दिनकर बाबुराव चाडावार, व बाळकृष्ण देवराव कदम, अशोक मुकुंदराव नेमानिवार या चौघांची नांदेड जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागली असून तालुक्याच्या व ग्राम स्तराव...
Darshan of Ganaraya : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन -NNL

Darshan of Ganaraya : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन -NNL

नांदेड, राजकीय
मुंबई| केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले. गृहमंत्री शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना 'शासन आपल्या दारी' पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे औक्षण करीत स्वागत केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री शाह यांनी...
error: Content is protected !!