Wednesday, May 13

नागपूर

Music expresses feeling and thought, without language. It was below and before speech, and it is above and beyond all words.

Floor of Nagpur, BSF, SGPC, Indian Army and Customs Mumbai teams : नागपुर, बीएसएफ, एसजीपीसी, इंडियन आर्मी आणी कस्टम मुंबई संघांची मजल -NNL

Floor of Nagpur, BSF, SGPC, Indian Army and Customs Mumbai teams : नागपुर, बीएसएफ, एसजीपीसी, इंडियन आर्मी आणी कस्टम मुंबई संघांची मजल -NNL

नांदेड, नागपूर, मुंबई, स्पोर्ट्स
नांदेड| गुरुवारी पार पडलेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेत ऑरेंज सीटी नागपुर, बीएसएफ जालंधर, एसजीपीसी अमृतसर, इंडियन आर्मी जालंधर आणी कस्टम मुंबई संघांनी मजल मारली असून उद्या आठ संघ उपांत्य पूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. आज सकाळी ऑरेंज सीटी नागपुर आणी पीएसपीसीएल पटिआला संघादरम्यान पहिला सामना खेळला गेला. नागपुर संघाने खेळाला जोरदार सुरुवात करतांना 25 मिनिटात तीन गोल केले. नियाज अहमद, साकिब रहीम आणी मोईस अब्दुल यांनी प्रत्येकी गोल करत मोठी आघाडी मिळवून दिली. पण खेळात परतण्याचा प्रयत्न करीत पटिआला संघाच्या मनबीरसिंघ ने 29 मिनिटास मैदानी गोल केला. तसेच 37 व्या मिनिटाला कुलविंदरसिंघ ने पेनल्टी स्ट्रोक मध्ये गोल करत आघाडी कमी केली. परन्तु 40 व्या मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा रूपांतरण गोल मध्ये करत नागपुरच्या नियाज रहीमने पुन्हा गोल संख्यचे अंतर वाढवले...
Extension of Nagpur Madgaon Pratiksha : नागपूर मडगांव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसला २८ फेब्रुवारी२०२५ पर्यंत मुदतवाढ -NNL

Extension of Nagpur Madgaon Pratiksha : नागपूर मडगांव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसला २८ फेब्रुवारी२०२५ पर्यंत मुदतवाढ -NNL

नागपूर, महाराष्ट्र
नागपूर| नागपुर जं ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या व्दितीय साप्ताहिक विशेष रेल्वे २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे खान्देश,विदर्भ ते कोकण चालणारी २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालवली जाणार आहे खान्देश,विदर्भातुन थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी उपलब्ध नसल्याने अशा रेल्वेची मागणी वारंवार रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात होती मकर संक्रांत,महाशिवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर ०११३९/०११४० नागपुर जं ते मडगाव ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी आता २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालवली जाणार आहे सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपुर जं ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे त्यानुसार ही गाडी नागपुर जं ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे त्यानुसार ही गाडी नागपुर जं येथून दर बुधवार,शनिवारी दु.०३.०५ वाजता सुटून गुरुवार,रविवारी मडगाव गोवा दुसऱ्या दिवशी सायं ०५.४५ वाजता पोहोचेल ...
Mla shrijaya chavhan ; पशुपालक -शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज दुग्धविकासासाठी ३ कोटीचा निधी द्यावा -आ. अ‍ॅड.श्रीजया चव्हाण -NNL

Mla shrijaya chavhan ; पशुपालक -शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज दुग्धविकासासाठी ३ कोटीचा निधी द्यावा -आ. अ‍ॅड.श्रीजया चव्हाण -NNL

कृषी, नागपूर, नांदेड
नांदेड/नागपूर। विदर्भ - मराठवाड्यातील शेतकऱ्यांना व पशुपालकांना शेतीशिवाय इतर उत्पन्नाचे खात्रीशीर स्त्रोत उपलब्ध व्हावे, यासाठी विदर्भ - मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट केलेल्या 19 जिल्ह्यांसाठी पुरवणी मागणीद्वारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघाच्या आमदार अ‍ॅड.श्रीजया चव्हाण यांनी केली आहे. भोकर विधानसभा मतदार संघातून विजयी झालेल्या आ. अ‍ॅड.श्रीजया चव्हाण यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पशुपालक -शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे. यावेळी आ. अ‍ॅड.श्रीजया चव्हाण यांनी पशुसंवर्धन विभागाच्या पुरवणी मागणीत बोलतांना पशुपालक -शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले आहे. यावेळी आ. अ‍ॅड.श्रीजया चव्हाण म्हणाल्या की,विदर्भ - मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट केलेल्या 19 जिल्ह्...
MLA Baburao Kohlikar’s demand in the session ; पीकविम्याची ५० टक्के मर्यादा जिल्हाधिकारी व 50 टक्के विमा कंपन्याकडे ठेवल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल – आमदार बाबूराव कोहळीकरांची अधिवेशनात मागणी -NNL

MLA Baburao Kohlikar’s demand in the session ; पीकविम्याची ५० टक्के मर्यादा जिल्हाधिकारी व 50 टक्के विमा कंपन्याकडे ठेवल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल – आमदार बाबूराव कोहळीकरांची अधिवेशनात मागणी -NNL

नागपूर, नांदेड, राजकीय, व्हिडीओ
नागपूर/नांदेड। नांदेड जिल्ह्यातील विशेषतः हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे विमा भरूनही लाभापासून वंचित राहत आहे. सदर पीकविमा कंपन्यांवर प्रशासनाचा अंकुश नसल्याने कंपन्या आपल्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांना हक्काच्या विम्याच्या लाभापासून वंचित ठेवत आहेत. त्यामुळे शेतकरी निसर्गाच्या संकटाखाली अनिखण दाबला जातो आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने यावर लक्ष केंद्रित करून पिकविम्याची मर्यादा २५ टक्क्यांवरून ५० टक्के रक्कम देण्यात लचा अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे ठेवायला हवा. हा निर्णय घेतला तर नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल अशी मागणी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सत्रात हदगाव हिमायतनगर तालुक्यातील समस्या मांडताना सभागृहात केली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या सभागृहात आपली भुमिका मांडताना पुढे हदगाव विधानसभा मतदार संघा...
Cm devendra fadanvis ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सोशल मीडिया जिल्हा संयोजकाचा सन्मान -NNL

Cm devendra fadanvis ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सोशल मीडिया जिल्हा संयोजकाचा सन्मान -NNL

नागपूर, नांदेड, राजकीय
नागपूर/हिमायतनगर। विधानसभा 2024 निवडणूक काळात नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विधानसभेच्या सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि 19 डिसेंबर रोजी सिपी क्लब, नागपूर येथे आयोजित विशेष बैठकित मार्गदर्शन केले. तसेच नांदेड उत्तरचे सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, नांदेड महानगरचे उमेश सरोदे यांचा सन्मान केला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने फेक निरेटिव्ह पसरवून मतदारांची दिशाभूल केल्यामुळे महायुतीला फटका बसला होता. याचे सूक्ष्म निरीक्षण करून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया व आयटी सेलने संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभा क्षेत्रात प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सूचनांचे पालन केल्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार...
Chief Minister Devendra Fadnavis : बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

Chief Minister Devendra Fadnavis : बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

नागपूर, क्राईम
नागपूर| बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. बीड, परभणी घटनांमधील दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानुसार बीडमध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख आणि परभणीमधील घटनाक्रमात मृत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ही दहा लाखांची तर शांतता प्रस्थापित करणारे मृत विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे. बीड मधील प्रकरणाची न्यायालयीन व एसआयटी मार्फत चौकशी करण्याबरोबर जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली करण्यात येईल. या प्रकरणातील दोषींवर मकोका ...
Deputy Chief Minister Eknath Shinde : तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही -NNL

Deputy Chief Minister Eknath Shinde : तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही -NNL

नागपूर, राजकीय
नागपूर| महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. मागील अडीच वर्षात महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरूवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन आहे समृध्द महाराष्ट्राचं. आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, मागील अडीच वर्षात महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांचं ऐतिहासिक काम केले. मागील अडीच वर्षात विक्रमी कामे झाली. एकही दिवस सुटी न घेता आम्ही काम केलं. त्यामुळे या राज्याच्या निवडणूक निकालांत इतिहास घडला. अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचे वचन मागील अडीच वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केले. त्यामुळेच आ...
Principal Secretary Brijesh Singh : अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह -NNL

Principal Secretary Brijesh Singh : अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह -NNL

नागपूर, महाराष्ट्र
नागपूर| माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरित्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्यावतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार...
Governor CP Radhakrishnan : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनियतेची शपथ -NNL

Governor CP Radhakrishnan : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनियतेची शपथ -NNL

नांदेड, नागपूर, राजकीय
नागपूर| राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा झाला. समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची उपस्थिती होती. समारंभास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे- पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक ऊईके, शंभुराज देसाई, अॅड.आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंह भोसले, अॅड.माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय सिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद जाधव पा...
Rahul Gandhi : थेट हल्ला करण्याची हिंमत नसल्याने आरएसएस संविधानावर लपून हल्ला करते – राहुल गांधी -NNL

Rahul Gandhi : थेट हल्ला करण्याची हिंमत नसल्याने आरएसएस संविधानावर लपून हल्ला करते – राहुल गांधी -NNL

नागपूर, राजकीय
नागपूर/मुंबई| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर जगण्याचा मंत्र आहे. संविधानात भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रिबाई अशा महापुरुषांचा आवाज आहे. संविधानातील विचार हजारो वर्षांपूर्वीचे आहेत, संविधानात सर्व जाती, धर्माचा, प्रदेशाचा आदर आहे. याच संविधानावर भाजपा व आरएसएस सातत्याने हल्ले करत आहेत. आरएसएस संविधानावर थेट हल्ला करु शकत नाहीत, ते लपून हल्ला करतात, आरएसएसमध्ये हिंमत असती तर त्यांनी समोरुन हल्ला केला असता, असा घणाघाती हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. नागपूरमध्ये संविधान सन्मान संमेलनात बोलताना राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी हे स्वतःबद्दल बोलत नसत, ते ...
error: Content is protected !!