Wednesday, May 13

नागपूर

Music expresses feeling and thought, without language. It was below and before speech, and it is above and beyond all words.

Dr. Vijayakumar Village : आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, सोयीसुविधांनीयुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न – डॉ. विजयकुमार गावित -NNL

Dr. Vijayakumar Village : आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, सोयीसुविधांनीयुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न – डॉ. विजयकुमार गावित -NNL

नागपूर, महाराष्ट्र
नंदुरबार| गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात आदिवासी बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात ३ हजार ७५० कोटींच्या आश्रमशाळा, वसतीगृहांच्या इमारती बांधून आदिवासी विद्यार्थ्यांना या इमारतींमधून गुणवत्तापुर्ण आणि सोयीसुविधांनीयुक्त शिक्षण देण्याचे काम आदिवासी विकास विभागाने केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी केले. आज नंदुरबारमधून राज्यातील १२० आश्रमशाळा, वसतीगृहांच्या इमारतींचे लोकार्पण, भूमीपूजन आणि पायाभरणी कार्यक्रमात श्री. गावित बोलत होते. शहरातील पटेलवाडी स्थित असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहाच्या प्राणंगणातून आदिवासी विकासमंत्री यांच्या हस्ते राज्यातील २ हजार ३०० कोटी रुपये किमतीच्या १२० इमारतींचे दृरदृश्य प्रणालीद्वारे राज्यभरात भुमीपुजन, पायाभरणी आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. स...
Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 7600 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी -NNL

Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 7600 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी -NNL

देश विदेश, नागपूर
मुंबई| महाराष्ट्रात दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून राज्याची आरोग्यसेवा अधिक बळकट होणार आहे. यामुळे राज्यातील एकूण वैद्यकीय जागांची संख्या 6000 होणार आहे. विकासाचा प्रत्येक प्रकल्प हा  सामान्य जनतेसाठी असून, नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरणाने आणि शिर्डी विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे व्यापार वाढणार आहे. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 7600 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरणाची पायाभरणी आणि शिर्डी विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचा समावेश आहे. प्रधान...
Nagpur agreement ; नागपूर करार मराठवाड्याच्या हिताचा-प्रा.डॉ.अभय दातार -NNL

Nagpur agreement ; नागपूर करार मराठवाड्याच्या हिताचा-प्रा.डॉ.अभय दातार -NNL

नांदेड, नागपूर, महाराष्ट्र
नांदेड। संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्यापूर्वी झालेला नागपूर करार तत्कालिन कॉंग्रेस अंतर्गत असला तरी तो मराठवाड्याच्या हिताचाच होता असे मत पीपल्स महाविद्यालयाचे प्रा.डॉ.अभय दातार व्यक्त केले. मराठवाडा जनता विकास परिषद, नागरी विकास कृती समिती आणि पीपल्स महाविद्यालय राज्यशास्त्र विभागाच्यावतीने नागपूर कराराच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा.डॉ.अभय दातार यांचे व्याख्यान आयोजित केेले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मजवीपचे केंद्रीय अध्यक्ष माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे हे होते. यावेळी बोलतांना डॉ.दातार म्हणाले की, स्वातंत्र्याच्या दीड वर्षानंतर मोठ्या संघर्षातून हैद्राबाद संस्थान आणि मराठवाड्याचा भूभाग स्वतंत्र भारतात सामील झाला. स्वातंत्र्यानंतर मराठवाडा हा आंधप्रदेशात सामील होता. हैद्राबाद राज्यातील मराठी भाषीकांना स्वतःचे राज्य असावे अशी अपेक्षा होती. हैद्राबाद...
Extension of Nagpur Madgaon Nagpur : नागपुर मडगांव नागपुर प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्सप्रेसला ३० डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ -NNL

Extension of Nagpur Madgaon Nagpur : नागपुर मडगांव नागपुर प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्सप्रेसला ३० डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ -NNL

नागपूर, महाराष्ट्र
अमरावती| नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीला २९ डिसेंबर २४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली विदर्भ,खान्देश ते कोकण प्रांत जोडणारी ही गाडी आता २९ डिसेंबर २०२४पर्यंत धावणार आहे. विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार रेल्वे व प्रवासी संघटनांकडून मागणी होत होती.नवरात्र-दिपावली-नाताळ- गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन मध्य ते कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. नवरात्र,दिवाळी व नाताळच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव (गोवा) (०११३९/०११४०) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, या नागपुर मडगाव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक गाडीची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी २९ डिसेंबर २०२४ पर्यंत विस्तारित करण्याचा निर्ण...
Nagpur Madgaon Pratiksha Second Weekly Express : विदर्भ खान्देश ते कोकण प्रांत जोडणाऱ्या नागपुर मडगाव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसला २९ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ -NNL

Nagpur Madgaon Pratiksha Second Weekly Express : विदर्भ खान्देश ते कोकण प्रांत जोडणाऱ्या नागपुर मडगाव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसला २९ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ -NNL

नागपूर, महाराष्ट्र
नागपूर/कोकण/विदर्भ/खान्देश| नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीला २९ डिसेंबर २४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली विदर्भ,खान्देश ते कोकण प्रांत जोडणारी ही गाडी आता २९ डिसेंबर २०२४ पर्यंत धावणार आहे. विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार रेल्वे व प्रवासी संघटनांकडून मागणी होत होती.नवरात्र-दिपावली-नाताळ- गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन मध्य ते कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. नवरात्र,दिवाळी व नाताळच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव (गोवा) (०११३९/४०) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी २९ सप्टेंबर२०२४पर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, या नागपुर मडगाव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक गाडीची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी २९ डिसेंबर २०२४ पर्यंत विस्तारित...
Prof. Kiran Kumar Johare : प्रा. किरणकुमार जोहरे यांना “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर -NNL

Prof. Kiran Kumar Johare : प्रा. किरणकुमार जोहरे यांना “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर -NNL

नागपूर, करियर, देश विदेश
नाशिक| मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेच्या नाशिक येथील पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविदयालयातील इलेक्ट्रॉनिक सायन्स व कॉम्प्युटर सायन्स विभागात कार्यरत असलेले प्रा. किरणकुमार जोहरे यांना मुंबई व नांदेड येथील महात्मा कबीर समता परिषद यांचा शैक्षणिक व वैज्ञानिक संशोधन कार्याबद्दल सन २०२३-२४ चा मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार म्हणजे "महाराष्ट्रभूषण जीवन गौरव " पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना विनामोबदला हवामान अलर्ट व माहिती प्रा. जोहरे हे पुरवतात. मान्सून, चक्रीवादळ, विजा, गारा, ढगफुटी, महापूर, दुष्काळ आदी हवामानविषयक माहिती तातडीने देत पीक नियोजनाने कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फायदा त्यांनी हजारो शेतकऱ्यांना आतापर्यंत करून दिला आहे. गेल्या २० वर्षांपासून ग्रामीण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतीने राष्ट्रीय उत्...
Chief Minister Eknath Shinde : आर्थिक सक्षमीकरणासोबतच महिलांच्या सुरक्षिततेचा निर्धार  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : आर्थिक सक्षमीकरणासोबतच महिलांच्या सुरक्षिततेचा निर्धार  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

नागपूर, महाराष्ट्र
नागपूर| मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी करतांनाच त्यांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील असून त्यासाठी सर्व पातळ्यांवर कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी  आज नागपूर येथे 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या लाभ वितरण कार्यक्रमात दिली. रेशीमबाग मैदानावर आज मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्यातील लाभाचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशा...
bhajan movement of the folk artist : लोकपारंपारिक कलावंताच्या भजन आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणली -NNL

bhajan movement of the folk artist : लोकपारंपारिक कलावंताच्या भजन आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणली -NNL

नागपूर, नांदेड
नांदेड| वृद्ध कलावंतांच्या मानधनाची सन् २०२३- २४ रखडलेली निवड यादी जाहीर करण्यासह त्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अभिवचन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा,मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिल्याने बहुजन टायगर युवा फोर्स च्यावतिने लोकपारंपारिक कलावंतांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरु केलेले आंदोलन तुर्त स्थगित केले.लोकपारंपारिक कलावंतांनी भजन आंदोलन करुन आज क्रांतीदिनी जिल्हा परिषद दणाणून सोडली होती. अधिक माहिती अशी की,राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत सन् २०२३- २४ या वर्षातील निवड यादी तत्कालीन समितीच्या मान्यतेनंतरही गत अनेक महिन्यांपासून संबंधित विभागाने जाहीर केली नाही.त्यामुळेच तत्कालीन जिल्हास्तरीय समितीच्यावतिने आज आंदोलनाची हाक दिल्यानंतर त्यांना पाठींबा देऊन बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र च्या पदाधिक...
Himayatnagar taluka ; हिमायतनगर तालुक्यातील वडगाव शिवारातून विद्युत वापराचा जरमन तार चोरीला ; अज्ञातावर गुन्हा दाखल – NNL

Himayatnagar taluka ; हिमायतनगर तालुक्यातील वडगाव शिवारातून विद्युत वापराचा जरमन तार चोरीला ; अज्ञातावर गुन्हा दाखल – NNL

Blog, क्राईम, नागपूर
हिमायतनगर। तालुक्यातील वडगाव शिवारातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने सात पोलचे नुकसान करून विद्युत वापराचा जरमन तार चोरून नेला आहे. हि घटना दि. ५ च्या मध्यरात्री घडली असून दि. ६ मंगळवारी सकाळी ही चोरीची उघडकीस आली आहे. तालुक्यातील वडगाव शिवारात विद्युत महावितरण कंपनीकडून पोल उभारणीचे काम सुरू आहे. या दरम्यान कामांसाठी पोल जरमन तार व इतर साहित्य घटनास्थळी टाकण्यात आले होते. व काहिं उभारण्यात आले होते. या दरम्यान रात्री अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सात पोलचे नुकसान करून, विद्युत कंपनीचे पोलवरील जरमन वायर अंदाजे किंमत २५ हजारांचा माल चोरून नेला आहे. सकाळी हि चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर हिमायतनगर येथील विद्युत महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता शुभम सुरेश कळसकर वय ३० वर्ष व्यवसाय महावितरण कंपनीत नौकरी यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीवरून गुरन. २०४/२०२४ कलम ३०३, ( २ ), ३२...
‘Chief Minister Annapurna Yojana’ | ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ राज्यातील महिलांना मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत – NNL

‘Chief Minister Annapurna Yojana’ | ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ राज्यातील महिलांना मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत – NNL

नागपूर, लाइफस्टाइल
मुंबई| केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वर्षाला 3 गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी "मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना" लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेचे पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत : या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे. एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल. तसेच फक्त 14.2 किलेग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल. या योज...
error: Content is protected !!