Eng. Chabdraprakash honored ; संत कबीर राष्ट्रीय पुरस्काराने इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर सन्मानित !
नांदेड/नागपूर। येथील क्रांतीकारी संत कबीर राष्ट्रीय पुरस्काराने अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना नागपूर येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले.
क्रांतीकारी संत कबीर वाचनालय कामठी नागपूरच्या वतीने सिद्धार्थ बुद्ध विहार सभागृह कामठी नागपूर येथे संत कबीर यांच्या ६२७ व्या जयंतीनिमित्त मेगा फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते, त्यात साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याबद्दल इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचा संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
मेगा फेस्टिव्हलचे स्वागताध्यक्ष व सुप्रसिद्ध राष्ट्रीय कवी मधू बावलकर, सावित्रीमाई फुले यांचे वारस डाॅ. दिलीप नेवसे पाटील (सातारा), नॅशनल भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकेश कटारिया, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ. सुरेखा खंडारे, मानवाधिकार आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथ...









