नागपूर। कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपायोजना एकत्रितपणे राबविण्याकरता महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या चार बॉर्डर राज्यातील आरोग्य विभागातील किटकजन्य आजार कार्यक्रमातील अधिका-यांची व विविध संस्थांची एकत्रित सभा द प्राइड हॉटेल नागपूर येथे संपन्न झाली.


सहसंचालक, आरोग्य सेवा, किटकजन्य आजार पुणे महाराष्ट्र राज्य डॉ. बबीता कमलापूरकर, उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर डॉ. शशिकांत शंभरकर, राज्य कीटक शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप, PATH ते सहसंचालक , डॉ.अमरेश कुमार,छत्तीसगड डॉ.चिन्मय दास, मध्यप्रदेश डॉ.भावना दुबे, तेलंगना डॉ.विजयकुमार, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) डॉ. विवेक खतगावकर, डॉ. बंडू, डॉ.रामटेके नागपूर, डॉ.रेखा भंडारी, डॉ.वैशाली ताभांळे लातुर, डॉ.संजय रणवीर कोल्हापूर व महाराष्ट्रातील इतर अधिकारी यांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. राज्याच्या सीमेवरील उच्च जोखीम असलेल्या भागात कीटकजन्य आजारांचा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी समन्वय वाढविणे आणि धोरणे मजबूत करण्याकरीता बैठक आयोजित करण्यात आली होती.

सन 2027 पर्यंत स्थानिक स्तरावरील हिवताप मुक्त करून 2030 पर्यंत भारतातून हिवतापाचे रुग्ण शुन्य करून निर्मूलन करण्याचे मुख्य लक्ष्य ठेवून सदरील आढावा सभा घेण्यात आली. सहसंचालक, आरोग्य सेवा, किटकजन्य आजार महाराष्ट्र राज्य डॉ.बबीता कमलापुर यांनी महाराष्ट्रातील किटकजन्य आजार व प्रतिबंधात्मक उपायोजना या विषयी माहिती देऊन आंतरराज्य सभा घेण्यामागील आंतरराज्य समन्वयाने हिवताप निर्मुलनाचा उददेश स्पष्ट केला.

शेजारील चार राज्यामधील राज्यांमधील किटकजन्य आजार विषयक समन्वय सुलभ करण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि राज्यामध्ये प्रभावी नियंत्रण उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मदत होणार आहे. सीमापार समन्वयाबाबत आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आले.
या चार राज्यातून आलेल्या जिल्हा हिवताप अधिकारी तसेस हिवताप निर्मूलनात काम करणा-या विविध संस्था यांनी हिवताप निर्मूलनात येणारे अडथळे यावर करावयाची कार्यवाही, आंतरराज्य समन्वय याबाबत सादरीकरण केले तसेच चर्चा करून यात प्रामुख्याने पुढील प्रमाणे विषयावर चर्चा होऊन धोरण ठरविण्यात आले. सदरील सभेमुळे पुढील प्रमाणे विषयावर चर्चा होऊन SOP ठरवण्यात आली.

१. राज्यातील इतर राज्यात जनतेच्या स्थलांतरासाठी मार्ग्दर्शक सुचना (SOP) कार्यान्वीत करणे.
२. स्थलांतरासाठी चाचणी, उपचार आणि ट्रॅकिंग चा वापर करणे.
३. आवश्यकतेनुसार कर्मचा-यांसाठी प्रशिक्षण तथा क्षमता बांधणी.
४. राज्य सीमावर्ती भागातील लोकांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती
५. गंभीर किटकजन्या आजाराचे प्रामुख्याने हिवतापाचे व्यवस्थापन करणे
६. राज्य सीमावर्ती भागातील अधिका-यांचे समन्वयाने कामकाज
७.विविध शासकीय, निमशासकीय विभागाशी तसेच सामाजीक संस्था, सेवाभावी संस्था यांची योग्य पध्दतीने समन्वयाने मदत घेणे.
८. आप आपल्या राज्यातील स्थानिक हिवतापाचा प्रसार थांबवा आणि हिवतापाचे रुण्ग शुन्यावर आण्याकरीता स्थानिक स्तरावर प्रयत्न करणे.
९.सीमापार अधिका-यांच्या भूमिका आणि जबाबदा-या निश्चीत करणे
या बैठकीला Godrej, PATH CHIR, JCPL, VDD, TECHNICAL REPORT UNIT महाराष्ट्र कडून सहकार्य मिळाले. वर्ष २०२७ पर्यंत एकत्रित प्रयत्नांनी मलेरिया निर्मूलन साध्य करण्यासाठी ही बैठक खूप महत्त्वाची ठरणार आहे. यावेळी महेंद्र दि. वाघमारे जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी जिल्हा परिषद नागपूर. डॉ.संजय रणवीर सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) कोल्हापूर यांनी सभेस आलेल्या अधिकारी कर्मचारी वर्गाचे आभार मानले.