श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| दि.६ जानेवारी २०२५ रोजी नागपूर येथील वसंतराव नाईक सभागृहामध्ये पत्रकार दिनानिमित्त युवा ग्रामीण पत्रकार संघ, महा.राज्यचे राष्ट्रीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा सर्वप्रथम राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार व मंच्यावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांबेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरवात झाली.
नागपूर येथील वसंतराव नाईक सभागृहामध्ये पत्रकार दिनानिमित्त युवा ग्रामीण पत्रकार संघ, महा.राज्यचे राष्ट्रीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यात अनेक मान्यवराचे भाषण झाले. त्यानंतर राष्ट्रीय अध्याक्ष्यांनी आपल्या भाषणातून पत्रकारांना मार्गदर्शन करतांना पत्रकारिता ही केवळ स्वताच्या स्वार्तासाठी नसून सर्व पत्रकारांनी समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी लढायला पाहिजे, आपल्या लेखणीतून सामाजिक जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करायला पाहिजे.
अन्यायावर मात करायला पाहिजे असे त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला तेव्हा युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या युवा आघाडी माहूर तालुका अध्यक्ष पदी असलेले युवा पत्रकार आदेश बेहेरे आपल्या कार्यातून उत्कृष्ट कामगिरी केल्याने राष्ट्रीय अध्यक्ष्यांनी त्यांच्या कामाची दाखल घेत त्यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.