Launch of Festive Celebration Sale : विजय सेल्सद्वारे फेस्टिव्ह सेलिब्रेशन सेलची सुरुवात; टेक उत्पादनांवर ७०% पर्यंत सवलत -NNL
मुंबई| सणासुदीचा मोसम सुरू झाला आहे आणि विजय सेल्स ही भारतातील आघाडीची इलेक्ट्रॉनिक ओम्नी-चॅनल रिटेल चेन आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आली आहे आपली जीवनशैली उंचावण्याची आणि फेस्टिव्ह सेलिब्रेशन सेलचा लाभ घेऊन जास्तत जास्त बचत करण्याची संधी! या सेलमध्ये ग्राहकांना नानाविध इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणांवर तब्बल ७०% पर्यंत सवलतीसह त्यांचा टेक शॉपिंग अनुभव अविस्मरणीय करण्याची हमी आहे.
विजय सेल्सचे संचालक श्री. निलेश गुप्ता म्हणाले, “आमच्या फेस्टिव्ह सेलिब्रेशन सेलचे उद्घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. या सेलमध्ये कधीच न अपेक्षिलेल्या किंमतीत लेटेस्ट टेक्नॉलॉजी ऑफर करण्यात येत आहे. तुम्हाला तुमचा फोन अपग्रेड करायचा असो किंवा घरातील मनोरंजन वाढवायचे असो किंवा तुम्ही श्रेष्ठ कम्प्यूटिंग उपकरणाच्या शोधात असलात तरी आमच्याकडे प्रत्येकासाठी काही ना काही आहेच. आमच्या ग्राहकांसाठी नवीन कल्पक उपकरणांचा शोध घेऊ...









