Thursday, May 14

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत – हिंदु जनजागृती समिती – NNL

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत – हिंदु जनजागृती समिती – NNL

देश विदेश, मुंबई
मुंबई| बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे. जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे. या गोष्टींमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात बांगलादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल, तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न रहाता हिंदुं समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. बांगलादेशाती...
Majhi Ladki Bahin Yojana revolutionized financial self-reliance among women : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाची क्रांती : आदिती तटकरे – NNL

Majhi Ladki Bahin Yojana revolutionized financial self-reliance among women : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाची क्रांती : आदिती तटकरे – NNL

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड| अत्यल्प आर्थिक उत्पन्न गटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आर्थिक स्वातंत्र्याची नवी क्रांती आहे. स्वतःचे बँक अकाउंट, स्वतःच्या खात्यामध्ये स्वतःचे पैसे, या स्वावलंबित्वामुळे, सक्षमतेमुळे समस्त राज्यात महिला जगतामध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांनी आज येथे केले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव व भोकर येथील महिला मेळाव्यासाठी आज त्यांचे नांदेडच्या श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर दुपारी चार वाजता आगमन झाले. त्यानंतर जिल्ह्यातील दोन्ही मेळाव्यात बोलताना त्यांनी रक्षाबंधनपूर्वी 16 व 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील याची शाश्वती दिली. राज्यामध्ये एक कोटी 40 लक्ष अर्ज आजपर्यंत प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सव्वा कोटी अर्ज पात्र ठरले आहे. या सर्व पात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाला ...
Cabinet meeting : मंत्रिमंडळ बैठक : बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२४ एकूण निर्णय-१३ – NNL

Cabinet meeting : मंत्रिमंडळ बैठक : बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२४ एकूण निर्णय-१३ – NNL

महाराष्ट्र, मुंबई
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन महत्वाकांक्षी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  87 हजार 342 कोटी 86 लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असून विशेषत: मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला मोठा फायदा होणार आहे. प्रकल्पामुळे गोदावरीच्या उपखोऱ्यातून वैनगंगेतील पाणी बुलढाणा जिल्ह्यातील वैनगंगा प्रकल्पात आणण्यात येईल. यासाठी एकूण ४२६.५२ कि.मी.चे जोड कालवे बांधण्यात येतील. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, ...
Chief District and Sessions Judge Surekha Kosamkar : कायदे बदलाचे क्रांतीकारी पाऊल समजण्यासाठी मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन उपयोगी : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर – NNL

Chief District and Sessions Judge Surekha Kosamkar : कायदे बदलाचे क्रांतीकारी पाऊल समजण्यासाठी मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन उपयोगी : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर – NNL

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड| ब्रिटिश कालीन कायदे बदलविण्याची ही योग्य वेळ असून त्या दृष्टीने पडलेले पाऊल म्हणजे एक जुलैपासून नवीन कायद्याची सुरू झालेली अंमलबजावणी. विधीक्षेत्रातील हे क्रांतिकारी पाऊल असून अतिशय सोप्या शब्दात या प्रदर्शनामध्ये त्याची मांडणी केली आहे. सामान्य माणसासाठी हे प्रदर्शन उपयोगी असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती सुरेखा कोसमकर यांनी आज येथे केले. नवीन फौजदारी कायदे-2023 विषयी जिल्हा व सत्र न्यायालयात 7 आणि 8 ऑगस्ट रोजी मल्टीमिडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो,जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड आणि नांदेड जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवे फौजदारी कायदे- 2023...
Chief Minister Eknath Shinde: पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

Chief Minister Eknath Shinde: पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| पुण्यात नुकतीच आलेली पूर परिस्थिती वारंवार होऊ नये म्हणून तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला, एकतानगर, सिंहगड येथे पूर संरक्षक मजबूत भिंत बांधणे सुरु करा असे निर्देश देतांना निळ्या पूर रेषेतील (ब्ल्यू लाईन) नागरिकांचे कायमस्वरूपी पूनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका, जलसंपदा विभाग यांनी समन्वयाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने वर्षा येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले. विशेष दर्जा द्या एकतानगर, सिंहगड याठिकाणी निळ्या पूर रेषेत सुमारे 3 लाख घरे असून ती अनेक वर्षांपासून आहेत अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली. याठिकाणी एफएसआय मिळत नसल्याने विकासक पुनर्विकासासाठी पुढे येत नाहीत, अस...
Relief and Rehabilitation Minister Anil Patil : जानेवारी ते मे २०२४ मधील अवकाळीमुळे झालेल्या शेती नुकसानीपोटी ५९६ कोटी रुपये वाटपास मंजुरी -NNL

Relief and Rehabilitation Minister Anil Patil : जानेवारी ते मे २०२४ मधील अवकाळीमुळे झालेल्या शेती नुकसानीपोटी ५९६ कोटी रुपये वाटपास मंजुरी -NNL

कृषी, मुंबई
मुंबई| राज्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना ५९६ कोटी २१ लाख रुपये नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे, याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. केंद्र शासनाने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्त...
error: Content is protected !!