Thursday, May 14

लाइफस्टाइल

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Food and Drug Administration : अन्नऔषध प्रशासनाच्या आशीर्वादाने हिमायतनगरात भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री

Food and Drug Administration : अन्नऔषध प्रशासनाच्या आशीर्वादाने हिमायतनगरात भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर | नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारी चिंताजनक बाब समोर आली आहे. हिमायतनगर शहरात अन्नऔषध प्रशासनाच्या आशीर्वादानेच भेसळयुक्त खाद्यतेलाची खुलेआम विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर करडई, शेंगदाणा आणि सूर्यफूल तेलाच्या वाढत्या मागणीचा फायदा घेत निकृष्ट व भेसळयुक्त तेल बाजारात बिनधास्तपणे विकले जात आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा २०११ नुसार खुल्या खाद्यतेल विक्रीवर बंदी असतानाही शहरातील किराणा दुकाने व होलसेल बाजारात खुले तेल, पॅकेजवर नमूद नसलेले ब्रँड आणि लेबल लावून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. एवढेच नव्हे तर तेलाच्या डब्यावर नमूद केलेल्या वजनापेक्षा कमी तेल विकून ग्राहकांची सर्रास फसवणूक होत आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांकडून घाईगडबडीत तपासणी व पाहणी न तेलाची खरेदी केली जात असल्याने भेसळखोरांचे मनोबल वाढले आहे. आर...
Diwali : आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिवाळीच्या दिवशी साईनाथ महाराजांनी दिली वस्त्र अन्नधान्याची भेट

Diwali : आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिवाळीच्या दिवशी साईनाथ महाराजांनी दिली वस्त्र अन्नधान्याची भेट

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर l माहुर तालुक्यातील पाचुंदा येथे शेतकरी गौतम किसन पाटील यांची कर्जबाजारीपणा व नापीकीला कंटाळून आत्महत्या केली होती सदरील दुखद घटनेमुळे परिवारासह गावावर शोक कळा पसरली होती घटना कळतात माहूर येथील आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधीश राष्ट्रसंत तथा राज्याचे स्वच्छता दूत ब्रँड अँबेसिडर साईनाथ महाराज वसमतकर यांना कळतात त्यांनी दि 21 रोजी दिवाळीच्या दिवशी मौजे पाचुंदा येथे जाऊन पाटील परिवाराला वस्त्र अन्नधान्याची किट दिली माहूर तालुक्यातील अति दुर्गम भागात असलेल्या मौजे पाचुंदा येथील गौतम पाटील यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती त्यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना साईनाथ महाराज वसमतकर यांना ही बाब कळल्याने त्यांनी तात्काळ मौजे पाचुंदा गाठून पाटील परिवाराच्या सदस्यांना वस्त्र आणि अन्नधान्य देऊन धीर दिला यावेळी साईनाथ महाराज वसमतकर यांनी सांगि...
Traffic congestion : हिमायतनगर शहरात रस्त्यांवरील अतिक्रमण व अरुंद रस्त्यांमुळे दिवाळीत ट्रॅफिक कोंडी नागरिक व व्यापारी त्रस्त

Traffic congestion : हिमायतनगर शहरात रस्त्यांवरील अतिक्रमण व अरुंद रस्त्यांमुळे दिवाळीत ट्रॅफिक कोंडी नागरिक व व्यापारी त्रस्त

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर (अनिल मादसवार) दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरात वाहतुकीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहरातील अरुंद रस्ते आणि रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण यामुळे दररोज ट्रॅफिक जामची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. शहराचा मुख्य प्रवेशमार्ग असलेला परमेश्वर मंदिर कमान ते पळसपूर रस्ता, तसेच सराफा लाईन, बाजार लाईन सह इतर प्रमुख रस्त्यांवर शाळा–कॉलेज सुटण्याच्या वेळेस आणि सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक, व्यापारी, वाहनधारक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांना अडथळे वाहतुकीच्या कोंडीत अनेकदा अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका अडकत असून, वेळेत रुग्णालयात पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत. वाहतुकीतील तणाव आणि गोंधळामुळे अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. दिवाळीच्या गर्दीमुळे ही परिस्थिती...
Forest  : बिबट्यासाठी वनविभागाने वाढविली गस्त आधुनिक यंत्राच्या साह्याने आवाज करून वन्य प्राण्यांना लोकवस्ती पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

Forest : बिबट्यासाठी वनविभागाने वाढविली गस्त आधुनिक यंत्राच्या साह्याने आवाज करून वन्य प्राण्यांना लोकवस्ती पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| शहर व परिसरातील सोनापीर दर्गा.न्यायालय परीसरात काही दिवसांपासून हिंस्त्र प्राणी बिबट्या, सकाळी फिरायला जाणाऱ्या काही नागरीकांच्या निर्देशनात आला व त्याचे व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाले असल्याने वनविभागाने खबरदारीची उपाय योजना म्हणून रात्रीची गस्त वाढविली आहे. गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत असून, आधुनिक यंत्राच्या साह्याने आवाज करून वन्य प्राण्यांना लोकवस्ती पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी दिली आहे. आठवड्या पासून शहराच्या काही भागात सकाळी व रात्री बिबट्याचे अधुन मधून वावर वाढला आहे. चारी बाजूनी डोंगर व शहरात वाढलेली मोकाट कुत्री व चिकन मटण मांसाचे उघड्यावर टाकलेले तुकड्या मुळे बिबट्या हा शहराकडे धाव घेत असल्याचे बोलल्या जात आहे. शहरात येणाऱ्या बिबट्या मुळे नागरीकात भीतीचे वातावरण...
gharkul : घरकुल लाभार्थी त्रस्त तात्काळ घरकुलाचे हप्ते टाका

gharkul : घरकुल लाभार्थी त्रस्त तात्काळ घरकुलाचे हप्ते टाका

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यामधील पंतप्रधान मोदी आवास योजना तसेच शबरी घरकुल आवास योजना यांचे हफ्ते घरकुल धारकांना वेळेवर मिळत नसल्याने ग्रामीण भागांतील घरकुल लाभार्थ्यातून प्रचंड संताप व्यक्त होत असून तालुक्यातील पानंद रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने तात्काळ घरकुलाचे हप्ते टाकून पानंदरस्त्याची डागडूजी करत रस्ते चालन्या योग्य बनवावेत अशी मागणी निवेदनाद्वारे पिंटू पाटील वायफनीकर यांचे सह मान्यवरांनी गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांच्याकडे दि 17 रोजी केली आहे माहूर तालुक्यात हजारो घरकुल मंजूर करण्यात आले असून एकही घरकुलाचे काम पूर्ण झाले नाही पावसाळ्यात वाळू न मिळाल्याने अनेकांना भाड्याच्या घरात मेन कापडाच्या राहुट्या बनवून दिवस काढावे लागले घरकुलाच्या रकमेचे हप्ते वेळेवर न दिल्याने तसेच अनेकांनी कर्जबाजारीपणा करून घर बांधल्याने हजारो नागरिक कर्जबाजारी झाले आहेत तसेच दिवाळी तोंडा...
Diwali : दिवाळीनिमित्त बाजारपेठेत गर्दी — धनत्रयोदशी निमित्त खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ

Diwali : दिवाळीनिमित्त बाजारपेठेत गर्दी — धनत्रयोदशी निमित्त खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर (अनिल मादसवार) दिवाळीचा सोहळा अवघ्या दारात आला असून, धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर शहरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. पूजासाहित्य, वही-खाते, रोजनामा लिहिण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे तसेच विविध दुकानांमध्ये नागरिकांची वर्दळ गर्दी दिसून आली. दिवाळी हा सर्वसामान्यांसाठी मोठा सण असल्याने कपडे, पूजेसाठी लागणारे साहित्य, दिवे, आकाश कंदील, सजावटीचे साहित्य, नाते गुंफणारे करदोडे, उटणे, मिठाई यांसह इतर आवश्यक वस्तूंच्या खरेदीला बाजारपेठेत जोरदार सुरुवात झाली आहे. व्यापाऱ्यांनी देखील दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक सवलती व ऑफर्स दिल्याने खरेदीचा उत्साह अधिक वाढला आहे. सणासुदीच्या वातावरणात बाजारपेठ उजळून निघाल्याने व्यापाराला चालना मिळत असून नागरिक दिवाळीच्या स्वागताची उत्साहाने तयारी करत आहेत. मात्र यंदा अतिवृष्टीच्या सावटामुळे काही प्रमाणात निराशा असली तरी ...
Nagar Panchayat : हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य – नागरिक त्रस्त, नगरपंचायतीवर नाराजी

Nagar Panchayat : हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य – नागरिक त्रस्त, नगरपंचायतीवर नाराजी

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर│ दिवाळीच्या तोंडावर संपूर्ण शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, नागरिकांना दुर्गंधीयुक्त वातावरणात राहण्याची वेळ आली आहे. गल्लीबोळात तसेच मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचल्याने स्वच्छतेचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे. तुकामाई मंदिरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर तर अक्षरशः घाण आणि तीव्र दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. पाय ठेवायलाही जागा नसल्याने रहिवाशांना घाणीतूनच ये-जा करावी लागत आहे. या भागात पंधरा दिवसांपासून कचरा न उचलल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, “आम्ही वारंवार नगरपंचायतीला घाण सफाईबाबत तक्रारी आणि सूचना केल्या, पण कोणतीही दखल घेतली गेली नाही. घरपट्टी आणि टॅक्स वसुलीकरिता मात्र नगरपंचायतीचे अधिकारी नियमित येतात, पण घाण साफ करण्यासाठी कोणीही येत नाही.” दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याची अप...
nidhan : पुंडलिकराव देशमुख तरोडेकर अनंतात विलीन

nidhan : पुंडलिकराव देशमुख तरोडेकर अनंतात विलीन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक तथा माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर व महेश देशमुख यांचे वडील श्री पुंडलिकराव बाबाराव देशमुख तरोडेकर शुक्रवारी अनंतात विलीन झाले. गुरुवार, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांची प्राणज्योत मावळली होती. तरोडा ( बु ) येथे त्यांच्या शेतात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचे मोठे चिरंजीव सतीश देशमुख यांनी त्यांना अग्नी दिला. यावेळी आमदार हेमंत पाटील, आ बालाजी कल्याणकर, आ आनंदराव बोंढारकर, माजी मंत्री डॉ माधवराव पाटील किन्हाळकर,माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, भाजपा चे अध्यक्ष तथा माजी आमदार अमर राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, कृषी उत्पन्न मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, जिल्हा कॉंग्रेस चे अध्यक्ष राजेश पावडे. कृषी उत्पन्न मार्केट कमिटीचे सभापती संजय देशमुख लहानकर,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धूळगुंडे,खा. रवींद्र...
Disaster management training : नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

Disaster management training : नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी किरण अंबेकर यांच्या नियंत्रणाखाली राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) 5 वी बटालियन, पुणे यांच्यामार्फत मौजे काळेश्वर, विष्णुपुरी येथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण व सराव सत्र बुधवार 15 ऑक्टोबर रोजी यशस्वीरीत्या पार पडले. या प्रशिक्षणासाठी कमांडर रविंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखालील 17 जणांच्या दलाने सहभाग घेतला. जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांतील तहसील, पंचायत, पोलीस, मनपा, नगरपरिषद, कृषी आदी विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. भूकंप, पूर आदी आपत्ती प्रसंगी स्वतःचा बचाव कसा करायचा तसेच शोध व बचाव का...
S.M. Deshmukh : ३ डिसेंबर रोजी राज्यातील १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करणार : एस.एम.देशमुख

S.M. Deshmukh : ३ डिसेंबर रोजी राज्यातील १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करणार : एस.एम.देशमुख

नांदेड, मुंबई, लाइफस्टाइल
मुंबई| अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी म्हणजे येत्या ३ डिसेंबर २०२५ रोजी राज्यातील १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प परिषदेने सोडला आहे.. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा हा विश्व विक्रम असणार आहे, असा दावा मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केला आहे. ३ डिसेंबर १९३९ रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची स्थापन झाली. गेली दहा वर्षे ३ डिसेंबर हा दिवस राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून पाळला जातो.. पहिल्या वर्षी ३००० पत्रकारांची आरोग्य तपासणी केली गेली..त्यानंतर ही संख्या क्रमश: वाढत गेली.. गेल्यावर्षी ८००० पत्रकारांची तपासणी केली गेली. वाढता प्रतिसाद पाहून यावर्षी १०,००० पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परिषदेशी संलग्न जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांनी स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि डॉक्टर...
error: Content is protected !!