Thursday, May 14

लाइफस्टाइल

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

nidhan : उमाकांत वाघमारे आष्टीकर यांचे वृद्धापकाळाने निधन

nidhan : उमाकांत वाघमारे आष्टीकर यांचे वृद्धापकाळाने निधन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l हदगाव तालुक्यातील आष्टी येथील ज्येष्ठ नागरिक माजी ग्रामपंचायत सदस्य उमाकांत विठोबा वाघमारे यांचे आज ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता वृद्धापकाळाने नांदेड येथील हर्षनगर निवासस्थानी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. नांदेडच्या पंचशील हायस्कूलचे मुख्याध्यापक साहेबराव वाघमारे यांचे तसेच ज्येष्ठ आंबेडकरी गायक प्रकाश वाघमारे आणि अशोक वाघमारे, अजय वाघमारे, लताबाई गायकवाड (मुलगी) यांचे ते वडील होत. उमाकांत विठोबा वाघमारे यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. हदगाव तालुक्यातील मौजे आष्टी या त्यांच्या मूळ गावी दिवंगत उमाकांत वाघमारे यांच्या पार्थिवावर उद्या दि. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत....
Shivanand Surkutwar ; उत्कृष्ट कलाकृतींचे निर्माते शिवानंद सुरकूटवार यांचे निधन

Shivanand Surkutwar ; उत्कृष्ट कलाकृतींचे निर्माते शिवानंद सुरकूटवार यांचे निधन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l जाहिरात डिझाईन हेच विश्व मानणारे आणि कलासक्त व्यक्तिमत्त्व असलेले उत्कृष्ट कलाकृतींचे निर्माते, ग्राफिक्स डिझायनर तथा यशश्री क्रिएशन्सचे संचालक शिवानंद सुरकूटवार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजता निधन झाले. नांदेडच्या जाहिरात क्षेत्राला एक वलयांकित ओळख प्राप्त करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. जाहिरात निर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. साध्या डीटीपीच्या मर्यादेपलीकडे जाऊन ब्रँड प्रमोशन, लोगो डिझाईन, ट्रेडमार्क, ब्रँडिंग स्ट्रॅटेजी, मार्केट अ‍ॅनालिसिस आणि व्यवसाय वृद्धीसाठी सूक्ष्म नियोजन या संकल्पना त्यांनी नांदेडसारख्या शहरात रुजवल्या. जाहिरातीसाठी स्वतंत्र बजेट आणि नियोजित ब्रँड विकास याबाबत त्यांनी व्यावसायिकांना नवे भान दिले. दैनिक सत्यप्रभाच्या दिवाळी अंकासह इतर...
Poor quality work : सिरंजनी–पळसपूर सिमेंट रस्त्याच्या कामात धांदल! निकृष्ट दर्जाचे काम, अभियंता–ठेकेदार मिलीभगत उघड

Poor quality work : सिरंजनी–पळसपूर सिमेंट रस्त्याच्या कामात धांदल! निकृष्ट दर्जाचे काम, अभियंता–ठेकेदार मिलीभगत उघड

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील सिरंजणी येथून पळसपूरकडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता, अंदाजपत्रकाला बगल आणि निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी या कामाच्या तक्रारींमुळे काम बंद ठेवण्यात आले (Siranjani-Palaspur Cement Road work rigged! Poor quality work) होते. मात्र संबंधित अभियंता व ठेकेदाराने मिलीभगत करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत पुन्हा काम सुरू केले असून, केवळ दिखाव्यासाठी काही भागावर थातुरमातुर काँक्रीट टाकून काम पूर्ण करण्याचा सपाटा सुरू केला आहे. तक्रारदार धम्मपाल मुनेश्वर यांनी या संदर्भात थेट संबंधित अभियंत्याला दूरध्वनीवर संपर्क साधून रस्त्याच्या गुणवत्तेबाबत चौकशी केली असता, अभियंत्याने उडवा-उडवीची उत्तरे देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे मुनेश्वर यांनी सांगितले. एवढेच नव्हे,...
Lakshmibai Koturwar passes away : ज्येष्ठ नागरिक श्रीमती लक्ष्मीबाई कोटूरवार यांचं निधन

Lakshmibai Koturwar passes away : ज्येष्ठ नागरिक श्रीमती लक्ष्मीबाई कोटूरवार यांचं निधन

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर शहरातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती लक्ष्मीबाई बाबूराव कोटूरवार (रा. हिमायतनगर, जि. नांदेड) यांचे दिनांक 05 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी वृद्धकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक 06 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता बोरगडी रोड स्मशानभूमी, हिमायतनगर येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. स्वभावाने शांत, प्रेमळ आणि धार्मिक वृत्तीच्या असलेल्या लक्ष्मीबाई कोटूरवार या आपल्या कुटुंबाच्या तसेच परिसरातील अनेकांच्या जिव्हाळ्याच्या होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक निराधार मुलींना आपल्याकडे आसरा देऊन त्यांच्या शिक्षणासाठी मार्गदर्शन केले. यामुळे त्याना गावातील लोक अनाथांची आई अश्या नावानेही ओळखत होते. त्यांच्या निधनाने कोटूरवार परिवारावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांतही हळहळ व्यक्त होत आहे....
Rajput community : नांदेडला डिसेंबरमध्ये राजपूत समाजाचा राज्यस्तरीय उपवर वधु वर परिचय मेळावा

Rajput community : नांदेडला डिसेंबरमध्ये राजपूत समाजाचा राज्यस्तरीय उपवर वधु वर परिचय मेळावा

नांदेड, लाइफस्टाइल
भोकर, साईसिंह चौहान| राजपूत क्षत्रिय समाज समिती, नांदेड व महाराष्ट्र राज्य क्षत्रिय संघ, राणा ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने स्व. देविसिंह कुँवरसिंह चौहान यांच्या स्मृतीत राजपूत क्षत्रिय समाजातील उपवर युवक-युवती राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा (निःशुल्क) पुढील महिन्यात २१डिसेंबर रोजी नांदेड शहरातील कौठा येथील ओम गार्डनमध्ये आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. राजपूत समाजातील विवाहयोग्य मुला,मुलीचे लग्न जमवण्यासाठी नांदेड येथील समाजातील प्रमुख व्यक्तींनी पुढाकार घेत या मेळाव्याचे आयोजन केले.या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विवाहयोग्य वधू-वर आणि त्यांचे पालक एकत्र येऊन एकमेकांची ओळख करून घेण्यासाठी आणि स्थळांच्या देवाणघेवाणीसाठी हा एक महत्त्वाचा मंच ठरणार आहे.या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या लांब पल्ल्याच्या लोकांची व्यवस्था आयोजकाकडून करण्यात येणार आह...
Blood donation ; रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान – माजी पंचायत समिती सदस्य उमाकांत सोरगे

Blood donation ; रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान – माजी पंचायत समिती सदस्य उमाकांत सोरगे

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर, माणिक भिसे l समाजामध्ये वावरत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे दान करीत असतो. दानशुरांची संख्याही समाजात काही कमी नाही. पण रक्तदान देऊन आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो, तेव्हा तरूणांनी रक्तदान करून एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवावेत ,. कारण रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीरात कलंबर बुद्रुक ता. लोहा येथील सरपंच प्रतिनिधी तथा माजी पंचायत समिती सदस्य उमाकांत सोरगे यांनी केले. कलंबर बुद्रुक ता. लोहा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये क्रिकेट स्पर्धा , अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे परिसर भक्तीमय वातावरणात तल्लीन रमला होता. दि २४ रोजी श्री संत अगडंमबुवा यात्र...
Nidhan : जेष्ठ नागरिक दशरथ रामजी पा.वडजे यांच निधन

Nidhan : जेष्ठ नागरिक दशरथ रामजी पा.वडजे यांच निधन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| कंधार तालुक्यातील मसलगा येथील ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त माजी ग्रामविकास अधिकारी दशरथ रामजी पा.वडजे (वय-83) यांचे 24 ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी 4.00 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी शनिवारी (दि. 25) दुपारी 1 वाजता मसलगा येथे होणार आहे. दैनिक गांवकरीचे जाहिरात व्यवस्थापक भाऊसाहेब वडजे यांचे ते वडील होतं....
exposed just in time for Diwali! हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा ऐन दिवाळीत पर्दाफाश !

exposed just in time for Diwali! हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा ऐन दिवाळीत पर्दाफाश !

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर (अनिल मादसवार) ऐन दिवाळीच्या पर्व काळतही शहरातील मुख्य रस्त्यांसह अनेक भागांत कचऱ्याचे ढिगारे साचले असून, त्यातून दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढत आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या तरीही नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही, दरम्यान आमदार बाबुराव कदम कोळेकर यांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले असता दुर्गंधी सह घनकचऱ्याच्या ढिकाऱ्याचा सामना करावा लागला आहे. अनेक नागरिकांनी आमदार महोदयाच्या निदर्शनास ही बाब आणून देत नगरपंचायतीच्या नाकर्तेपणा बाबत नाराजी व्यक्त केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, शहरातील नागरिकांचा प्रश्न आहे “रस्त्यांवर साचलेला कचरा, घाण आणि दुर्गंधी प्रशासनाच्या नजरेत का येत नाही?” हिमायतनगर नगरपंचायतीवर सध्या प्रशासनाचा आहे प्रशासक असताना देखील त्यांचेही याकडे जाणीवपूर्वक होत असल्याने शहरातील न...
Unique Bhaubij : नांदेडमध्ये अनोखी भाऊबीज : उपेक्षित, अपंग आणि अनाथांना मिळाला सणाचा आनंद

Unique Bhaubij : नांदेडमध्ये अनोखी भाऊबीज : उपेक्षित, अपंग आणि अनाथांना मिळाला सणाचा आनंद

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| भ्रमिष्ट, अपंग, भिकारी आणि अनाथ बालकांना सुशिक्षित महिलांनी ओवाळणी करून या वर्षीची भाऊबीज संस्मरणीय केली. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी सुमन बालगृहातील अनाथ मुलींकडून ओवाळणी करून घेऊन त्यांना भाऊबीजेची अनोखी भेट दिली.आयुष्यात पहिल्यांदाच भाऊबीज साजरी करण्याची संधी मिळालेल्या या उपेक्षितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. ठाकूर यांच्या या कल्पक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या कल्पनेतून उपेक्षित, अपंग आणि अनाथ मुलींना आयुष्यातील पहिल्यांदाच अनोखी भाऊबीज साजरी करता आली असून, नांदेडचा हृदयस्पर्शी उपक्रमाँचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे. या भावनिक क्षणांनी सगळ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणले! भाऊबीज हा भाऊ-बहीणीच्या पवित्र नात्याचा सण असला तरी समाजातील अनेकांना त्याचा कधी अनुभवच आलेला नव्हता. दिवाळीच्या प्रारंभी फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष धनरा...
कर्णबधिर,मूकबधिर दिव्यांगांसोबत अध्यक्षांनी दिवाळी केली साजरी

कर्णबधिर,मूकबधिर दिव्यांगांसोबत अध्यक्षांनी दिवाळी केली साजरी

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l दिवाळिचा सण म्हटलं की सर्वत्र आनंदोत्सव साजरा होतो परंतु दिव्यांग बांधवांमध्येही मोठ्या प्रमाणात दिवाळी या सणाचा आनंद द्विगणित व्हावा या उद्देशाने सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष यांनी कर्णबधिर,मूकबधिर दिव्यांगांना आपल्या घरी बोलावून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. जागतिक कर्णबधिर दिन नुकताच साजरा करण्यात आला परंतु शहरासह जिल्ह्यातील काही दिव्यांग शाळेने तो साजरा केला तर काहींना विसर पडला याचेच औचित्य साधून व दिवाळीच्या निमित्ताने सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी मूकबधिर कर्णबधिर अशा 40 ते 50 जणांना घरी बोलाऊन दिवाळीनिमित्त त्यांना फराळ व मिठाई भरवून फटाके फोडुन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. या उत्सवामुळे मूकबधिर कर्णबधीर दिव्यांगांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद फुललेला दिसत होता. संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी हा उपक्रम राबवून कर्णबधिर, मूकबधिर दिव्यांगांना दिव...
error: Content is protected !!