Rumor of a tiger falling : हिमायतनगर तालुका – सवना परिसरात वाघ विहिरीत पडल्याची अफवा; वनविभागाचा खुलासा
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना परिसरात मंगळवारी रात्री “वाघ विहिरीत पडला” अशी माहिती वाऱ्यासारखी पसरली. सामाजिक माध्यमांवर या चर्चेला वेग आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि रात्री अनेकांची झोप उडाली.
माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सवना परिसरातील सर्व विहिरींची सखोल तपासणी करण्यात आली. मात्र कोणत्याही विहिरीत वाघ आढळून आला नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले असून, ही चर्चा पूर्णपणे अफवा असल्याचा अधिकृत खुलासा वनपाल अमोल कदम यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना केला आहे.
वनविभागाने नागरिकांना स्पष्ट आवाहन केले आहे की, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. भीतीचे वातावरण निर्माण न करता माहितीची खात्री करूनच पुढे प्रसारित करावी. परिसरात वन्यप्राण्यांची हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा.
स...









