nidhan : उमाकांत वाघमारे आष्टीकर यांचे वृद्धापकाळाने निधन

IMG 20251106 WA0013 nidhan : उमाकांत वाघमारे आष्टीकर यांचे वृद्धापकाळाने निधन

नांदेड l हदगाव तालुक्यातील आष्टी येथील ज्येष्ठ नागरिक माजी ग्रामपंचायत सदस्य उमाकांत विठोबा वाघमारे यांचे आज ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता वृद्धापकाळाने नांदेड येथील हर्षनगर निवासस्थानी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.

नांदेडच्या पंचशील हायस्कूलचे मुख्याध्यापक साहेबराव वाघमारे यांचे तसेच ज्येष्ठ आंबेडकरी गायक प्रकाश वाघमारे आणि अशोक वाघमारे, अजय वाघमारे, लताबाई गायकवाड (मुलगी) यांचे ते वडील होत. उमाकांत विठोबा वाघमारे यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. हदगाव तालुक्यातील मौजे आष्टी या त्यांच्या मूळ गावी दिवंगत उमाकांत वाघमारे यांच्या पार्थिवावर उद्या दि. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top