नांदेड| भ्रमिष्ट, अपंग, भिकारी आणि अनाथ बालकांना सुशिक्षित महिलांनी ओवाळणी करून या वर्षीची भाऊबीज संस्मरणीय केली. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी सुमन बालगृहातील अनाथ मुलींकडून ओवाळणी करून घेऊन त्यांना भाऊबीजेची अनोखी भेट दिली.आयुष्यात पहिल्यांदाच भाऊबीज साजरी करण्याची संधी मिळालेल्या या उपेक्षितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. ठाकूर यांच्या या कल्पक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या कल्पनेतून उपेक्षित, अपंग आणि अनाथ मुलींना आयुष्यातील पहिल्यांदाच अनोखी भाऊबीज साजरी करता आली असून, नांदेडचा हृदयस्पर्शी उपक्रमाँचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे.


या भावनिक क्षणांनी सगळ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणले!
भाऊबीज हा भाऊ-बहीणीच्या पवित्र नात्याचा सण असला तरी समाजातील अनेकांना त्याचा कधी अनुभवच आलेला नव्हता. दिवाळीच्या प्रारंभी फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष धनराज मंत्री आणि ॲड. दिलीप ठाकूर यांच्या वतीने अनाथ मुला-मुलींना फटाके, नवीन कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी एका मुलीने “आम्ही कधी कोणाला ओवाळलेच नाही” अशी खंत व्यक्त केली होती. या भावनेतूनच हा अभिनव उपक्रम साकारला गेला.
भाऊबीजेच्या दिवशी सकाळी “भाऊच्या माणुसकीच्या फ्रिज” येथे आयोजित कार्यक्रमात राजस्थानी महिला मंडळाच्या शांता काबरा, गायत्री तोष्णीवाल, मीना काबरा, संध्या छापरवाल, सविता काबरा तसेच जयश्री ठाकूर, सुषमा हुरणे आणि मंगल करडखेले यांनी भ्रमिष्ट, अपंग व कचरा वेचणाऱ्या व्यक्तींना तिलक लावून, राखी बांधून ओवाळले. त्यानंतर फटाके फोडले गेले व मिठाई, जेवणाचे डबे वाटप करण्यात आले. या दृश्याने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले.



यानंतर सुमन बालगृहात दिलीप ठाकूर यांनी मुलींकडून ओवाळणी करून घेतली आणि त्यांना रोख रक्कम, मिठाई व फटाके दिले. वासवी क्लबच्या सदस्यांनी मुलींना वही-पेन आणि गोड जेवण दिले. “आयुष्यात पहिल्यांदाच भाऊबीज साजरी करताना आम्ही कसे ओवाळायचे हेच शिकलो.दिलीपभाऊ सारखा मोठा भाऊ मिळाला ,” असे सांगताना मुलींच्या डोळ्यांत भावनांचे अश्रू तरळले.


या उपक्रमात उपेक्षितांची दिवाळी साजरी करण्यासाठी रुपेश वट्टमवार ,स्नेहलता जायस्वाल, अविनाश चिंतावार मुंबई , सुरेश पळशीकर, सुरेखा राहाटिकर, योगेश जायस्वाल , सतीश सुगनचंदजी शर्मा, चंद्रकांत गंजेवार , मोहित आणि रेणुका सोनी प्रांश अक्षय गोधमगांवकर, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, ज्योती रामेश्वर वाघमारे , शोभा नंदलवार,अशोक गंजेवार, प्राचार्य सुधीर शिवणीकर ,दुसऱ्यांदा रुपेश वट्टमवार,धनराज मंत्री व दोन अज्ञात दात्यांचे यांचे योगदान योगदान लाभले.उपक्रम यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, अरुण काबरा, सुरेश शर्मा, संतोष भारती, प्रभुदास वाडेकर यांनी परिश्रम घेतले. नांदेडमध्ये समाजातील उपेक्षित घटकांना प्रेम, आपुलकी आणि सणाची अनुभूती देणारा हा उपक्रम मानवतेचा खरा उत्सव ठरला आहे.


