श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यामधील पंतप्रधान मोदी आवास योजना तसेच शबरी घरकुल आवास योजना यांचे हफ्ते घरकुल धारकांना वेळेवर मिळत नसल्याने ग्रामीण भागांतील घरकुल लाभार्थ्यातून प्रचंड संताप व्यक्त होत असून तालुक्यातील पानंद रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने तात्काळ घरकुलाचे हप्ते टाकून पानंदरस्त्याची डागडूजी करत रस्ते चालन्या योग्य बनवावेत अशी मागणी निवेदनाद्वारे पिंटू पाटील वायफनीकर यांचे सह मान्यवरांनी गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांच्याकडे दि 17 रोजी केली आहे


माहूर तालुक्यात हजारो घरकुल मंजूर करण्यात आले असून एकही घरकुलाचे काम पूर्ण झाले नाही पावसाळ्यात वाळू न मिळाल्याने अनेकांना भाड्याच्या घरात मेन कापडाच्या राहुट्या बनवून दिवस काढावे लागले घरकुलाच्या रकमेचे हप्ते वेळेवर न दिल्याने तसेच अनेकांनी कर्जबाजारीपणा करून घर बांधल्याने हजारो नागरिक कर्जबाजारी झाले आहेत तसेच दिवाळी तोंडावर आल्याने दिवाळी कशी साजरी करावी या चिंतेने नागरिकात नैराश्याची भावना निर्माण झाली असून शेतात जाण्यासाठी असलेले पानंदरस्ते फुटल्याने चारी बाजूने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यातून कर्जबाजारी झालेल्या घरकुल लाभार्थ्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे या संतापाचा उद्रेक होण्याआधी गटविकास अधिकारी यांनी पानंद रस्ते दुरुस्ती करून घरकुलाचे थकीत हप्ते तात्काळ टाकावेत यासाठी निवेदन देण्यात आले


यावेळी पिंटू पाटील बाय फर्निचर यांचे सोबत नामदेव कातले मा सभापती संतोष जाधव सरपंच तांदळा शेख रफीकभाई सामाजिक कार्यकर्ते. ईश्वर देशमुख परेकर सचिन कलाणे बालाजी गायकवाड यांचे सह मान्यवर नागरिक उपस्थित होते




