श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्याला उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेले किरण भोंडवे यांनी ईवळेश्वर रस्त्यावर अवैधरित्या अवैधरित्या कुठलीही परवानगी नसताना ट्रॅक्टर मध्ये वाळू भरून नेत असताना रात्रीला पाठलाग करून ट्रॅक्टर पकडत पोलीस ठाण्यात आणून जप्त केल्याची धाडसी कारवाईची घटना दि 16 रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडल्याने वाळू तस्करात खळबळ उडाली आहे


पावसाळा संपण्याआधीच वाळू तस्करांनी नांग्या वर काढून नदी नाले ओढ्यातून वाळू तस्करी सुरू केल्याची चर्चा होत असतानाच नव्याने रुजू झालेले तरुण तडफदार उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांना माहिती मिळाल्याने वानोळा परिसरात वस्तीवर असताना कुपटी ते इवळेश्वर रस्त्यावर एक ट्रॅक्टर लाईट बंद करून जातानाचा आवाज आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग केला.


इवळेश्वर जवळ त्यास अडवून तपासणी केली असता ट्रॅक्टर क्रमांक एम एच 29 बी व्ही 4115 आढळून आला त्यामध्ये वाळू भरून दिसल्याने त्यांनी सोबतच्या पोलिसांना त्यास माहूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्याचे सांगून पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या कार्यवाहीत उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांचे सह पोउपनी शरद घोडके सपोउपनी पालसिंग ब्राह्मण पोका अवधूत कावडे नवनाथ कोरडे परमेश्वर मामीलवाड दत्तात्रय सोनटक्के यांचे सह पोलिसांनी कारवाई सहभाग घेतला उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांनी आल्या आल्याच लपून-छपून सुरू असलेल्या अवध व्यवसायावर प्रहार करणे सुरू करून वाळू तस्करांनाही दणका दिल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांचे अभिनंदन होत आहे




