श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| शहर व परिसरातील सोनापीर दर्गा.न्यायालय परीसरात काही दिवसांपासून हिंस्त्र प्राणी बिबट्या, सकाळी फिरायला जाणाऱ्या काही नागरीकांच्या निर्देशनात आला व त्याचे व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाले असल्याने वनविभागाने खबरदारीची उपाय योजना म्हणून रात्रीची गस्त वाढविली आहे.


गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत असून, आधुनिक यंत्राच्या साह्याने आवाज करून वन्य प्राण्यांना लोकवस्ती पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी दिली आहे.


आठवड्या पासून शहराच्या काही भागात सकाळी व रात्री बिबट्याचे अधुन मधून वावर वाढला आहे. चारी बाजूनी डोंगर व शहरात वाढलेली मोकाट कुत्री व चिकन मटण मांसाचे उघड्यावर टाकलेले तुकड्या मुळे बिबट्या हा शहराकडे धाव घेत असल्याचे बोलल्या जात आहे.


शहरात येणाऱ्या बिबट्या मुळे नागरीकात भीतीचे वातावरण असल्याने उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक किरण चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी दि .८ पासून वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत वन परिमंडळ माहूरात दिवसा व रात्री सामूहिक गस्त करून गावकऱ्यांमध्ये व शहरामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच आधुनिक यंत्राच्या साह्याने आवाज करून वन्य प्राण्यांना लोकवस्ती पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.




