Wednesday, May 13

देश विदेश

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Prime Minister Narendra Modi : मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Prime Minister Narendra Modi : मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नांदेड, देश विदेश, महाराष्ट्र, मुंबई
नवी दिल्ली| भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात. मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य केले आहे, असे गौरवोद्गार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले. भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नव्हता. येथील सर्व भाषांनी एकमेकांना समृद्ध केले असून भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित करणे ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ....
Ayodhya pilgrims accident : अयोध्याला जाणाऱ्या भाविकांचा उत्तर प्रदेशात अपघात; नांदेडचे ३ तर वसमतच्या एकाचा मृत्यू

Ayodhya pilgrims accident : अयोध्याला जाणाऱ्या भाविकांचा उत्तर प्रदेशात अपघात; नांदेडचे ३ तर वसमतच्या एकाचा मृत्यू

नांदेड, देश विदेश
नांदेड| प्रयागराज येथे कुंभमेळ्यात स्नान करून अयोध्याला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा टेम्पो ट्रॅव्हल्स रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बसवर आदळून झालेल्या भिषण अपघातात नांदेडचे ३ तर वसमतच्या एक अश्या चार भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी आहेत. हि दुर्घटना रविवारी पहाटे बाराबंकी जिल्ह्यातील पुर्वांचल एक्सप्रेस रस्त्यावर घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सध्या उत्तरप्रदेशातील प्रयागराज कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शाही स्नानासाठी जात आहेत. नांदेड शहरातून अनेक भाविक कुंभमेळ्या साठी गेले होते. यात शहरातील छत्रपती चौकातील काही भाविक गेल्या अनेक दिवसांपुर्वी प्रयागराजला गेले होते. कुंभमेळा येथे स्नान करून नांदेडच्या भाविकांसह अन्य भाविक अयोध्या येथे राम मंदीराच्या दर्शनासाठी एका टेम्पो ट्रॅव्हल्स बसने निघाले होते. रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी पहाटे ५:...
Chief Minister Devendra Fadnavis : दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला, महाराष्ट्र भविष्यात डेटा सेंटरचे कॅपिटल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला, महाराष्ट्र भविष्यात डेटा सेंटरचे कॅपिटल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देश विदेश, मुंबई
मुंबई| दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहिला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात १५ लाख ९८ हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच दावोस (Davos) मधील इकॉनॉमी फोरममध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राच्या जनतेचेही आभार मानले. दावोस मध्ये गुंतवणूकीचे ५४ आणि धोरणात्मक सहकार्याचे ७ असे एकूण ६१ सामजंस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्र आता डेटा सेंटरचे कॅपिटल होईल. डेटा हे नव्या युगाचे ‘ऑईल’ आहे. त्यामुळे या क्षेत्राची वाढ वेगाने होईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस ...
Prime Minister Narendra Modi : भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Prime Minister Narendra Modi : भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

देश विदेश, मुंबई
मुंबई| निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सांगितले. भारतात (India Made) निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) या तीन महत्वाच्या नौका मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नौसेना प्रमुख दिनेशकुमार त्रिपाठी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थि...
Chief Minister Devendra Fadnavis : पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

Chief Minister Devendra Fadnavis : पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

देश विदेश
नवी दिल्ली| मराठ्यांनी राष्ट्र संरक्षणार्थ पानिपतच्या युध्दात जीवाची बाजी लावून लढा दिला. या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल,अशी ग्वाही महाराष्ट्र्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnvis) यांनी दिली. पानिपत युध्दाला (Panipat War)२६४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पानिपत येथील कालाआम परिसरात मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. येथे उपस्थित होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा वीर योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी गत १९ वर्षांपासून शौर्य समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पानिपत कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा तथा युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खास...
additional stop at Ujjain : काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा एक्स्प्रेसला उज्जैन येथे अतिरिक्त थांबा -NNL

additional stop at Ujjain : काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा एक्स्प्रेसला उज्जैन येथे अतिरिक्त थांबा -NNL

नांदेड, देश विदेश, धार्मिक
नांदेड| पश्चिम रेल्वेने ट्रेन क्र. 07053/07054 काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा एक्स्प्रेसला उज्जैन येथे अतिरिक्त थांब्या देण्यात आल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याचा प्रवाश्याना लाभ होणार आहे. सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे: दिनांक  11/01/2025 ला काचीगुडा येथून सुटणाऱ्या गाडी क्र. 07053 काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेस  ला उज्जैन येथे  पुढील सूचनां प्राप्त होई पर्यंत तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. दिनांक 14/01/2025 ला बिकानेर येथून सुटणाऱ्या गाडी क्र. 07054  बिकानेर काचीगुडा एक्स्प्रेस ला उज्जैन येथे पुढील सूचना प्राप्त होई पर्यंत तात्पुरता थांबा देण्यात आला आहे.   उज्जैन  येथील थांब्यासह वेळापत्रक: 07053 काचीगुडा - बिकानेर एक्स्प्रेस स्थानक 07054 बिकानेर- काचीगुडा एक्स्प्रेस दिवस आगमन प्रस्थान आगमन प्रस्थान दिवस रविवार 23.4...
Sankranti Special Trains : नांदेड विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी संक्रांती विशेष गाड्यांची सुविधा -NNL

Sankranti Special Trains : नांदेड विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी संक्रांती विशेष गाड्यांची सुविधा -NNL

नांदेड, देश विदेश, सोशल वर्क
नांदेड। ररेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी संक्रांती सणानिमित्त विशेष गाड्यांची सुविधा करण्यात आली आहे. याचा सर्व प्रवाश्यानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने संक्रांतीच्या सणानिमित्त प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीला सामोरे जाण्यासाठी विशेष गाड्यांचे आयोजन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी 07487/07488 नांदेड-काकिनाडा-नांदेड विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 07487 (नांदेड-काकिनाडा): दिनांक: 06 जानेवारी आणि 13 जानेवारी (सोमवार), 2025 वेळ: दुपारी 02.25 वाजता नांदेड येथून सुटेल. मुख्य थांबे: मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, सिकंदराबाद, वारंगल, रायानपडू, राजमुंद्री, आणि सामलकोट. काकिनाडा येथे पोहोचण्याची वेळ: सकाळी 08.10 वाजता (मंगळवार). गाडी क्रमांक 07488 (काकिनाडा -नांदेड): दिनांक: 07 जानेवारी आणि 14 जानेवारी (मंगळवार), 2025 ...
A special train will run from Nanded  : 22 जानेवारी 2025 रोजी नांदेडहून महाकुंभ मेळाला विशेष रेल्वे जाणार -NNL

A special train will run from Nanded : 22 जानेवारी 2025 रोजी नांदेडहून महाकुंभ मेळाला विशेष रेल्वे जाणार -NNL

नांदेड, देश विदेश, धार्मिक
नांदेड| प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील कुंभ मेळाला जाण्याकरीता नांदेड-पटणा-नांदेड विशेष रेल्वे प्रयागराज चौकी आणि काचीगुड-पटणा-काचीगुडा नांदेड आणि प्रयागराज चौकी मार्गे चालविण्यात येत आहेत. याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे. गाडी क्रमांक 07721 नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी रात्री 23.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 07722 पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 04.30 वाजता पोहो...
Dr Manmohan Singh Death ; माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने, देशाचे मोठे नुकसान -NNL

Dr Manmohan Singh Death ; माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने, देशाचे मोठे नुकसान -NNL

देश विदेश, मुंबई
दिल्ली। देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिनांक २६ डिसेंबर रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्यत मालवली. त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त एम्स रुग्णालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. मनमोहन सिंग यांना रात्री ८ वाजता आपत्कालीन परिस्थिती दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री ९.५१ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याचा पाया रचणारा नेता म्हणून परिचित असणारे, सतत 10 वर्ष पंतप्रधान म्हणून सेवा देणारे, केंब्रिजमध्ये प्रशिक्षित माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने, देशाचे मोठे नुकसान झाले आसून, राजकारणीपणा, सचोटी आणि शांत शक्...
Smt. Harpalkaur Mann ; नानक-साई फाऊंडेशनची ‘मजबूत भाईचारा‘ हि संकल्पना पंजाब आणि महाराष्ट्रासाठी भूषणावह – श्रीमती हरपालकौर मान -NNL

Smt. Harpalkaur Mann ; नानक-साई फाऊंडेशनची ‘मजबूत भाईचारा‘ हि संकल्पना पंजाब आणि महाराष्ट्रासाठी भूषणावह – श्रीमती हरपालकौर मान -NNL

नांदेड, देश विदेश
नांदेड/हुजूर् साहिब। सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नानक-साई फाऊंडेशनची ‘मजबूत भाईचारा‘ हि संकल्पना पंजाब आणि महाराष्ट्रासाठी भूषणावह असल्याचे मत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंघ मान यांच्या मातोश्री श्रीमती हरपालकौर जी मान यांनी व्यक्त केले. तख्त सचखंड हुजूर् साहिब गुरुद्वारा दर्शना करिता श्रीमती हरपालकौर जी मान नांदेड येथे आलेल्या आहेत. हरपालकौर मान यांनी गुरुद्वारा दर्शन घेतले असून काल त्यांनी गुरुद्वारा चे प्रमुख पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ यांची यांनी भेट घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतले. गुरुद्वाराच्या निष्काम सेवेबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. येथील गुरुद्वारा लंगर साहिब चे मुखी संत बाबा नरेंद्रसिंग जी तथा संत बाबा बलविंदरसिंग जी यांच्या अखंड कार सेवेचे श्रीमती हरपाल कौर यांनी कौतुक केले. दरम्यान सहयोग lनगर (नांदेड) येथे नानक साई फाऊंडेशन ने आ...
error: Content is protected !!