दिल्ली। देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिनांक २६ डिसेंबर रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्यत मालवली. त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त एम्स रुग्णालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
मनमोहन सिंग यांना रात्री ८ वाजता आपत्कालीन परिस्थिती दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री ९.५१ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याचा पाया रचणारा नेता म्हणून परिचित असणारे, सतत 10 वर्ष पंतप्रधान म्हणून सेवा देणारे, केंब्रिजमध्ये प्रशिक्षित माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने, देशाचे मोठे नुकसान झाले आसून, राजकारणीपणा, सचोटी आणि शांत शक्ती यांनी परिभाषित केलेल्या युगाचा आज अंत झाला.
नव्या औद्योगिक धोरणांची पायभरणी करणारा नेता आज हरपला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी १९९१ साली पी. व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये ज्या परिस्थितीत अर्थ मंत्रालयाचा कारभार हाती घेतला, तो कालखंड देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा अडचणींचा होता.या अडचणीच्या काळात देशाची विकसनशीलता कायम ठेवली. आपण केलेल्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आजही दिशा मिळत आहे. *भारतासह जगामध्ये आपली छाप सोडणारे, अर्थशास्त्राचे व्याख्याते, तत्कलीन भारत सरकारचे मुख्य अर्थ सल्लागार आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिलेल्या या नेत्याला, मातीच्या खऱ्या सुपुत्राला विनम्र भावपूर्ण आदरांजली!!