Wednesday, May 13

देश विदेश

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Yoga ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच योग संस्कृतीचा जगभर प्रचार

Yoga ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच योग संस्कृतीचा जगभर प्रचार

नांदेड, देश विदेश
नांदेड l योगविद्या ही मानवी जीवनात शांतता, संयम, शिस्त व शारीरिक आणि मानसिक मजबूती देणारी आहे. योगविद्या ही भारताने जगाला दिलेली देण आहे. योग संस्कृतीचा जागतिक पातळीवर प्रसार करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिंहाची भूमिका असल्याचे मत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज येथे व्यक्त केले. जागतिक योगदिनाचे औचित्य साधत भाजपच्या नांदेड महानगर शाखेच्या वतीने व शारदा कंस्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन, लोकमत व नमस्ते नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुद्वारा परिसरातील श्री ग्रंथसाहिब हॉल यात्रीनिवास येथे आयोजित केलेल्या योग शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी आ.श्रीजयाताई चव्हाण, भाजपाचे महानराध्यक्ष तथा संयोजक माजी आ.अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाश...
doing yoga together : १६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम

doing yoga together : १६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम

नांदेड, देश विदेश
मुंबई| आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा करत हॅबिल्‍ड या भारतातील पहिल्‍या हॅबिट-बिल्डिंग प्‍लॅटफॉर्मने उल्‍लेखनीय जागतिक टप्‍पा गाठला आहे, जेथे ‘जागतिक स्‍तरावर ऑनलाइन योग क्‍लासमध्‍ये सर्वाधिक उपस्थिती' शीर्षकासाठी नवीन जागतिक विक्रम रचला आहे. २१ जून रोजी सकाळी अधिकृत वर्ल्ड रेकॉर्डच्या अध्यक्षतेखाली हॅबिल्डचे सौरभ बोथरा यांनी आयोजित केलेल्या समक्रमित, मार्गदर्शित सत्रात १६९ देशांमधील ७,५२,०७४ पेक्षा जास्त सहभागी व्हर्च्युअल पद्धतीने योगा करण्यासाठी एकत्र आले. नागपूरहून लाइव्‍ह स्ट्रिमिंग करण्‍यासह जगभरात उपलब्‍ध करून देण्‍यात आलेल्‍या या ४५ मिनिटांच्या सत्रात १०० हून अधिक देशांतील योगसाधक एकत्र आले, ज्यामुळे हा सर्वात सर्वसमावेशक व दूरगामी योग इव्‍हेण्‍ट ठरला. हा हॅबिल्डचा आतापर्यंतचा पाचवा जागतिक विक्रम आहे. जानेवारी २०२४ मध्ये २,४६,२५२ प्रेक्षकांसह यूट्यूबवर योग लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी...
Indian Border Management Authority : भारतीय सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन होणार – खा. डॉ अजित गोपछडे यांच्या मागणीस केंद्रीय गृहमंत्रालयाचा सकारात्मक प्रतिसाद

Indian Border Management Authority : भारतीय सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन होणार – खा. डॉ अजित गोपछडे यांच्या मागणीस केंद्रीय गृहमंत्रालयाचा सकारात्मक प्रतिसाद

नांदेड, देश विदेश
नांदेड| दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर भारताच्या सीमांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्याच्या अनुषंगाने भारतीय सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन व्हावे यासाठी खा.डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते शिवाय राज्यसभेतही यासाठी निवेदन केले होते. या अनुषंगाने खा. डॉ. गोपछडे यांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी पत्र लिहून दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर सीमा सुरक्षा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकार योग्य ती तपासणी करीत असल्याचे लेखी कळवले आहे. गृह मंत्रालया अंतर्गत भारतीय सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री मंत्री अमितभाई शाह यांना खा. डॉ अजित गोपछडे यांनी दि. 28 एप्रिल 2025 रोजी एक प्रस्ताव सादर केला होता. पत्र क्रमांक AMG/450 नुसार भारतीय सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थ...
Goa and Telangana : राजभवन येथे गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा

Goa and Telangana : राजभवन येथे गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा

मुंबई, तेलंगणा, देश विदेश, नांदेड
गोवा,नांदेड | राज्याच्या मूळ लोकसंस्कृतीचे संगीत व लोककलेच्या माध्यमातून उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी गोवा राज्य स्थापना दिवस (३० मे) तसेच तेलंगणा राज्य स्थापना दिवस (२ जून) संयुक्तरित्या साजरा करण्यात आला, उभय राज्यांचे राज्य स्थापना दिवस हे भारत सरकारच्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमाचा भाग म्हणून साजरे करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. प्रत्येकाने आपल्या राज्याचा, धर्माचा व आपल्या भाषेचा अभिमान अवश्य बाळगला पाहिजे, परंतु सर्वाधिक अभिमान मातृभूमीचा बाळगला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. उभय राज्यांचे राज्य स्थापना दिवस हे भारत सरकारच्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक...
Six dignitaries from Maharashtra honored with Padma Awards : महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

Six dignitaries from Maharashtra honored with Padma Awards : महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

मनोरंजन, देश विदेश, मुंबई
नवी दिल्ली| विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणा-या 68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते दुस-या व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण व केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या पुरस्कार समारंभात राज्यातील सहा मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष डॉ .मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ (मरणोत्तर) तर अशोक सराफ, अच्युत पालव , अश्विनी भिडे-देशप...
MLA T. Rajasingh, Telangana : हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत – आमदार टी. राजासिंह, तेलंगणा

MLA T. Rajasingh, Telangana : हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत – आमदार टी. राजासिंह, तेलंगणा

महाराष्ट्र, तेलंगणा, देश विदेश, मुंबई
फोंडा, गोवा, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी| संत-गुरुजन नेहमी सांगायचे, ‘आगामी काळ युद्धाचा आहे. त्या युद्धात विजय मिळवण्यासाठी, ते युद्ध लढण्यासाठी प्रत्येक हिंदूने तयार होण्याची आवश्यकता आहे.’ पहेलगामच्या हल्ल्यात धर्म विचारून माणसे मारली गेली. पूर्वीही औरंगजेब असो, अकबर असो किंवा इतर अनेक शत्रूंनी हिंदूंचे नाव विचारून, धर्म विचारून त्यांचे धर्मांतर केले. जे धर्मांतर करत नव्हते, त्यांना मारले गेले. आज त्याचेच बिघडलेले वंशज त्यांच्याच मार्गदर्शनावर चालत आहेत. अशा प्रवृत्तीचे लोक केवळ पहेलगाममध्येच नाही, तर प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात लपलेले असू शकतात. त्यामुळे हिंदूंनी आपल्या मुलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण द्यायला हवे. जो लढेल तोच वाचेल. जो लढणार नाही त्यांच्यासाठी येणारा काळ खूप कठिण आहे. त्यामुळे येथून जाण्यापूर्वी समस्त हिंदूंनी एक असा संकल्प घ्या की, आगामी काळात भारताला...
Cm Pramod Sawant ; गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या  कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात !  – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

Cm Pramod Sawant ; गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

नांदेड, देश विदेश
गोवा सरकारच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा विशेष सन्मान फोंडा, गोवा/सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी। पूर्वी गोव्यात लोक समुद्र, तसेच अन्य गोष्टी पहाण्यासाठी येत होते; याउलट गोव्यात सनातन संस्थेचे कार्य चालू झाल्यावर नागरिक भारतीय संस्कृती आणि मंदिरे पहाण्यासाठी गोव्यात येतात. गोवा भोगभूमी नसून ही देवभूमी आहे. सनातन संस्कृती आणि शंखनाद महोत्सव यांमुळे येथील अर्थकारण आणि सांस्कृतिक पर्यटन वाढेल. गेल्या २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदु धर्माचा प्रसार करण्याचे मोठे कार्य करत असून सनातनने केलेली आध्यात्मिक ग्रंथनिर्मिती युवक यांना प्रेरणा देणारी आणि पुढील १०० वर्षांपर्यंत दिशादर्शक आहे. सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे गौरवोद्गार गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आ...
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पहेलगाम हल्ल्याचा बदल भारताने घेतला

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पहेलगाम हल्ल्याचा बदल भारताने घेतला

देश विदेश
भारतीय हवाई दलाने मंगळवारी रात्री १:०५ मिनिटांनी पाकिस्तान आणि पीओकेमध्ये म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यानंतर देशभरातून भारतीय जवानांचे कौतुक होत असून, ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पहेलगाम हल्ल्याचा बदल भारताने घेतला असून, पाकिस्तानला आणखी धडा शिकविण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. एकूणच हवाई दलाने ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आहे. यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. भारताची ही प्रत्युत्तरात्मक कारवाई पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर करण्यात आली आहे आणि त्याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले आहे. 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव त्या महिलांना समर्पित आहे ज्यांचे पती २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मारले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरसाठी तिन्ही सैन्यां...
Nanded ; पहलगाम दहशतवादी हल्ला पार्श्वभूमी नांदेडच्या तीन डॉक्टरांची काश्मीर मधील दुर्गम भागात आरोग्य सेवा ; ४५०हुन अधिक शास्त्रकिया

Nanded ; पहलगाम दहशतवादी हल्ला पार्श्वभूमी नांदेडच्या तीन डॉक्टरांची काश्मीर मधील दुर्गम भागात आरोग्य सेवा ; ४५०हुन अधिक शास्त्रकिया

नांदेड, देश विदेश
नांदेड l काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हदरला. वेगवेगळ्या राज्यातून गेलेले पर्यटक आपापल्या घरी परतले असा काळात नांदेडचे भूमिपुत्र प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अनिल साखरे पोटविकार तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. जळबाजी मोरे, भूल तज्ज्ञ डॉ. करुणा पाटील. यांनी काश्मीर मधील डोडा, डोडा, किश्तवाड, भादरवाह या भागात आरोग्य शिबिरात रुग्ण तपासणी व शस्त्रक्रिया करत होते .दहा दिवसांच्या आरोग्यसेवे नंतर हे तिन्ही डॉक्टर २६ रोजी नांदेड मध्ये परतले . जम्मू काश्मिर सरकार व रोटरी क्लब इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते २४ एप्रिल २०२५ या काळात' शासकीय मेडीकल कॉलेज डोडा, जिल्हा रुग्णालय किश्तवार, उप जिल्हा हॉस्पिटल भादेरवाह या भागात "मेगा सर्जिकल "आरोग्य शिबीर घेण्यात आले. .या शिबिराचे उदघाटन राज्यपाल मनोजकुमार सिन्हा याच्या हस्ते करण्यात आले . ...
Delhi ; दिल्लीत आ भा मराठी साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी ; प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी घेतल्या साहित्यिकांच्या भेटी

Delhi ; दिल्लीत आ भा मराठी साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी ; प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी घेतल्या साहित्यिकांच्या भेटी

नांदेड, देश विदेश
नांदेड l दिल्ली येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता झाली शेवटच्या दिवशी रविवारी २३ रोजी दिल्लीत मराठीचा गजर होता.राजकीय क्षेत्रात वावर असतानाही सांस्कृतिक व मराठी साहित्यांची आवटी गोडी असणाऱ्या प्राणिताताई देवरे-चिखलीकर या दिवसभर संमेलनात रमल्या. परिसंवाद ,मुलाखत, चर्चासत्र त्यांनी श्रवण केले पुस्तके खरेदी केली साहित्यिकांच्या भेटीगाठी घेतल्या .वाचल तर वाचाल ही चळवळ गावोगावी गतिमान होणे आजच्या काळाची गरज आहे अशी प्रतिक्रिया प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी व्यक्त केली देशाच्या राजधानीत ९८वे साहित्य संमेलन पार पडले. समारोपाच्या दिवशी प्राणिताताई याना साहित्य संमेलनाचा आनंद घेता आला सारस्वतांच्या व्यासपीठावर देशाचे पंतप्रधान मोदी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार एकत्रित आले त्याची खूप चर्चा झाली. राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रभावी कार्य करणाऱ्या प्राण...
error: Content is protected !!